द एक्स्पेन्डेबल्स - अनावश्यक निर्मिती
>> Sunday, August 22, 2010
कुरोसावाने जेव्हा सेव्हन सामुराई केला, तेव्हा आपण किती अजरामर फॉर्म्युला तयार करतोय हे त्याच्या लक्षात आलं नसेल. मात्र सर्व वयाच्या प्रेक्षकांसाठी असणारे अन् दर्जामधेही पाराकोटीचा चढउतार असणारे अनेक चित्रपट या एका चित्रपटाने जन्माला घातले. द एक्स्पेन्डेबल्स हा या फॉर्म्युलाचाच एक मध्यम दर्जाचा अवतार. एक्स्पेन्डेबल्सकडे सर्वाधिक लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे त्याचा स्टार लाईनअप. विन डिझेलचा अपवाद वगळता अॅक्शनपटांमधले यच्चयावत स्टार्स इथे हजेरी लावतात. मात्र एका परीने ही दिशाभूल आहे. कारण ब्रूस विलीस, मिकी रोर्कसारखी नावं असूनही इथे प्रत्यक्ष काम फक्त तिघांना आहे. लेखक, दिग्दर्शक, आणि स्टार या तीनही भूमिकांतला सिल्व्हेस्टर स्टलोन, जेसन स्टॅथम आणि जेट ली. उरलेल्यांचं स्थान एकतर पाहुण्या कलाकारांसारखं आहे, किंवा पडद्यावर दिसत राहूनही त्यांच्या भूमिकेत फारसा दम नाही.
वरवर पाहता `एक्स्पेन्डेबल्स` हे नावही, खूपंच चांगलं. हे नाव स्वतःकडे कमीपणा घेणारं, नकारात्मक आहे. नायकांना सामान्य पातळीवर आणणारं, जे या प्रकारच्या अॅक्शनपटाला उपयुक्त ठरू शकतं. मात्र प्रत्यक्षात या नावाच्यआ साधेपणाचा इथे कोणताच उपयोग करण्यात आलेला दिसत नाही. इथे सर्व नायक मंडळी आपण नायक आहोत, हे ठाऊक असल्याप्रमाणे गुर्मीत असलेली दिसतात. एकदा का त्यांचं हे नायकपण गृहीत धरलं गेलं,की पुढे काय होणार याला अर्थ उरत नाही. फॉर्म्युलाप्रमाणे टप्पे घेणं एवढंच चित्रपट करू शकतो.
एखादी छोटी वस्ती. तिथल्या लोकांवर अन्याय अन्याय करणारे कर्दनकाळ. मदतीला पाचारण करण्यात आलेले नायक. शक्य तर परस्परविरोधी व्यक्तिमत्त्वांचे पण कामगिरीसाठी एकत्र येणारे. नायकांचं कर्दनकाळांच्या पुढ्यात उभं ठाकणं, आणि शत्रूचा नायनाट . हा फॉर्म्युला आपण सिप्पींच्या शोलेपासून, डिस्नेच्या बग्ज लाईफपर्यंत सतत पाहिलेला. यात रचनेच्या दृष्टीने महत्त्वाचे नसले, तरी प्रेक्षकांनी समरस होण्याच्या दृष्टीने महत्वाचे टप्पे म्हणजे नायकांची ओळख आणि त्यांचं वस्तीतल्या लोकांशी होणारं बॉन्डींग. सेव्हन सामुराईपासून स्फूर्ती घेणा-या बहुतेक चित्रपटांचे नायक हे सर्वगुणसंपन्न नाहीत. किंबहुना, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातले दोष अन् नायकांनी त्यावर केलेली मात, हा चित्रपटातल्या नाट्याचा एक महत्त्वाचा पैलू. त्याचप्रमाणे ते ज्या लोकांसाठी लढताहेत त्यांना समजून घेणं, त्यांनी या नायकांच्या बाजूने वा विरोधात उभं राहणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं. एक्स्पेन्डेबल्सला मात्र तसं वाटत नाही. कारण तो या दोन्ही गोष्टी जवळजवळ काढून टाकतो.
या प्रकारच्या बहुतेक चित्रपटात व्यक्तिरेखांचं मुळात एकत्र येणं, हे एखादी `ओरीजिन फिल्म` असल्याप्रमाणे दाखवलं जातं. शोलेसारख्या चित्रपटात ही क्लृप्ती न वापरताही विविध प्रसंग अन् संवादांच्या मदतीने ही मंडळी कोण आहेत याची आपल्याला ओळख करून दिली जाते. एक्स्पेण्डेबल्सच्या कर्त्यांना बहुदा हा भाग एक्स्पेण्डेबल वाटला असावा. इथले प्रसंग आणि संकट हे यातल्या कोणाहीबद्दल काहीही सांगत नाहीत. ख्रिसमस (स्टेथम)ची मैत्रिण आणि यिन यान्ग (जेट ली)चं पगारवाढ मागणं यापलीकडे इतरांच्या व्यक्तिरेखांच्या व्यक्तिगत गरजा , व्यक्तिमत्त्वाचे पैलू, भूत/वर्तमानकाळ यांकडे कामगिरीच्या चौकटीपलीकडे जाऊन पाहीलं जात नाही.हा स्वतंत्रपणे दोष नसला, तरी ज्या चित्रपटातल्या इतरही कुठल्या बाबतीत नावीन्य नसेल, तिथे तो खचितच जाणवतो. चित्रपटातले संवाद थोडेसे विनोदी, चटपटीत लिहिण्याचा क्षीण प्रयत्न दिसतो. मात्र तो इतका क्षीण आहे की तो धड ना विनोदनिर्मिती करत, ना तो या व्यक्तिरेखांविषयी काही माहिती देत.
एक्स्पेन्डेबल्सला वर सांगितलेल्या फॉर्म्युलापलीकडे जाऊन, किंवा खरं तर तितकीही कथा नाही. बार्नी (सिल्व्हेस्टर स्टलोन) हा इथला गटप्रमुख. खलनायकांपुरते दोघे बाकी ठेऊन उरलेले सगळे त्याच्या `एक्स्पेन्डेबल्स`नावाने ओळखल्या जाणा-या गटात सामील. ब्रूस विलीस आणि अरनॉल्ड श्वारत्झनेगर असलेल्या एकुलत्या एका प्रसंगात गटावर कामगिरी सोपविली जाते, ती एका बेटावरला हुकूमशहा अन् त्याच्या मदतीने अमली पदार्थाचा धंदा करणारा अमेरिकन यांचा नायनाट करण्याची. यासाठी बार्नी एक मोठी रक्कम मागतो. मात्र तो हुकूमशहाच्या मुलीच्या प्रेमात पडल्यावर, एक्स्पेन्डेबल्स ही कामगिरी धर्मादाय असल्यासारखी फुकटात पार पाडतात.
इथली पटकथा इतकी सरधोपट पद्धतीने, ओळखीच्या रस्त्य़ाने पुढे सरकते, की चित्रपटाला `प्रेडिक्टेबल्स` असं नाव देखील चाललं असतं. प्रेमासाठी धोका पत्करणारे नायक. जनतेच्या भल्यासाठी बापाच्या विरोधात जाणारी नायिका, दुष्ट खलनायकाचं मुलीवरच्या प्रेमाने होणारं ह्दयपरिवर्तन, मदतीला धाऊन जाणारी मित्रमंडळी, एकही प्रसंग वा व्यक्ती इथे अनपेक्षित काही साधून आपल्याला चकित करू पाहत नाही.
आता इथे एक उघड प्रश्न असा संभवतो, की जर चित्रपट अॅक्शनपटाच्या वर्गात बसणारा असेल, तर निदान त्याबाबतीत तरी , तो त्याच्या चाहत्यांना खूष करेल का? याला माझं व्यक्तिगत उत्तर हे नकारार्थीच आहे. काही स्टंट्स अन् अॅक्शन प्रसंग इथे लक्षात राहण्याजोगे आहेत, नाही असं नाही. खासकरून त्यांचा वेग, वेळोवेळी दिसणारं क्रौर्य, पूर्वी टाळण्यात येणारं पण हल्ली चालणारं रक्त अशा घटकांचा वापरही त्यात्या वेळेपुरता प्रभावित करणारा आहे. पण हा परिणाम टिकून राहणारा नाही. अॅक्शन ही अनेकदा लक्षात राहते, ती प्रसंग ज्या प्रकारे तिला कथानकात गुंफतात, तिच्या आधारे. इथे आपली इतक्या प्रमाणात अॅक्शन हवी ना, मग घालू कशी तरी, अशी वृत्ती दिसते. त्यामुळे ज्या प्रकारचा सेट-अप आवश्यक आहे, तोच तयार होऊ शकत नाही. साहजिकच चित्रपटाच्या संदर्भापलीकडे ती परिणाम करणार नाही, हे आलंच.
एक्स्पेन्डेबल्स प्रभावी न ठरल्याचं वाईट वाटतं, ते या प्रकारची उत्तम पात्रयोजना वाया जाते म्हणून, अर्थातच यातले बरेच जण दिग्दर्शक स्टॅलनच्या पुण्याईने उभे आहेत हे उघड आहे. मात्र या प्रकारच्या फसलेल्या प्रयत्नानंतर, ते एकत्र येणं कठीण. पुन्हा एकदा `डर्टी डझन` सारखा यशस्वी प्रयत्न करण्यात आला असता (जे ओशन्स मालिकेने काही प्रमाणात केलं, पण अॅक्शन चित्रप्रकारासाठी नाही.) तर मुळातच मर्यादित आवाका असणा-या या चित्रप्रकाराचा त्यातून फायदाच झाला असता. सध्या तरी तसं होणं संभवत नाही.
-गणेश मतकरी.

7 comments:
ha chitrapat mhanje Bhikarchotpanacha kalas aahe
एकुणएक वाक्य पटलं...
ऍक्शन दृष्ये देखिल 'ब' दर्जाची वाटली.
i am totally agree with respected matkari sir
फारश्या न आवडलेल्या चित्रपटाबदंदल लिहिणं अवघड वाटतं का गणेश ? :-)
vikram, i agree with ur capsule review, but language is a bit politically incorrect. anand ,mukesh, thanks.
Sushma tai, on the contrary. i have always found that there r lot of interesting things u can write about terrible films. and u dont have to write too seriously in most cases. this must be universal ,as lot of reviewers enjoy writing these. i have a very funny collection of bad reviews of roger ebert called 'i hated ,hated ,hated this movie '. u must read it if u get it anywhere. there r sm very good bad reviews by pauline kael, andrew sarris , berardinelli , and many other prominent reviewers which consistently make good reading.
चित्रपटात कथा नाहीच आहे. असलीच तर ती चक्क हिंदी चित्रपट कथा आहे. पण हा चित्रपट मला दबंग सारखा वाटला. स्टोरी काय आहे या कडे प्रेक्षकांनी लक्ष देण्यापेक्षा आत मसाला किती भरला आहे, हे बघावं असा. फारसा चालेलसं वाटत नाही. इतके प्रतिथयश कलाकार या चित्रपटात असणं हेही दबंगशी असलेलं साम्य. उगाच बनवला आपला.
स्टारकास्ट एवढी जबरदस्त असताना फिल्म फारशी प्रभावी वाटली नाही... नायकाची टीम SUPERMAN असल्यासारखी वावरते ... action पण जवळपास अशक्य कोटीत मोडणारी आहे... निराशा झाली.
Post a Comment