आवर्जून पाहावीशी बीपी

>> Sunday, January 6, 2013


मराठी चित्रपटांमधे जी तथाकथित नवचित्रपटांची लाट आली आहे , ती टिकेल अथवा नाही हे बहुतांशी एका विशिष्ट घटकावर अवलंबून राहील आणि ते म्हणजे चांगली निर्मितीमूल्य आणि विषय असणारे आशयघन चित्रपट देण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दिग्दर्शकांच्या कामातलं सातत्य . पोस्ट - श्वास म्हणजे गेल्या नऊ दहा वर्षांच्या कालावधीतलं काम पाहता लक्षात येईल की एखाद दुसरा उत्तम चित्रपट करणारी मंडळी बऱ्यापैकी आहेत , पण नेमाने मराठी चित्रपटात टिकून राहून स्वतःचा प्रेक्षक तयार करणारे फार जण नाहीत . अपेक्षा असणाऱ्या दिग्दर्शकांपैकीही निशिकांत कामत , मंगेश हाडवळे आणि गेल्या काही दिवसात सचिन कुंडलकर यांनी हिंदी चित्रपटांत पदार्पण केल्याने ही यादी अधिकच छोटी व्हायला लागली आहे . या परिस्थितीत रवी जाधवने ' नटरंग ' आणि ' बालगंधर्व ' नंतर तिसरा मराठी चित्रपट करणं , हे त्याला मराठी चित्रपटांत नियमितपणे आणि अमुक एक दर्जा संभाळून काम करणारा दिग्दर्शक ठरवायला पुरेसं आहे .
खरं सांगायचं तर नटरंग किंवा बालगंधर्व हे दोन्ही आपल्या परीने महत्वाकांक्षी आणि अवघड वळणाचे चित्रपट असले , तरी मला वैयक्तिकदृष्ट्या फार आवडलेले चित्रपट नव्हेत . त्यांच्या विषयांचा अवाका , गांभीर्य आणि तपशील पाहता त्यांना वेळाच्या , प्रेक्षक पसंतीच्या आणि न्याय्य पटकथेच्या गणितात बसवताना थोडी अधिक कसरत झाल्याचं जाणवतं , ज्यामुळे ते थोडे अवजड झालेले आहेत . तरीही त्यांनी या दिग्दर्शकाचं एका विशिष्ट प्रकारचे ( गंभीर , भव्य , चरित्रात्मक , स्टार पॉवर्ड ... इत्यादी ) चित्रपट बनवणारा दिग्दर्शक म्हणून केलं आणि प्रेक्षक त्याच्याकडून काही विशिष्ट अपेक्षा ठेवायला लागला , हे खरंच . सामान्यतः साहित्यिक वा कलावंतांचा , मग ते चित्रकारापासून अभिनेत्यांपर्यंत आणि लेखकांपासून चित्रपट दिग्दर्शकांपर्यंत कोणीही असोत , असा कल दिसून येतो की एका प्रांतात यश मिळालं की ते तो सोडायचं नाव घेत नाहीत आणि ते पुढलं सारं काम , त्या एके काळी मिळालेल्या यशाच्या पुनरावृत्तीत घालवतात . रवी जाधवच्या नव्या प्रयत्नाचं मला कौतुक यासाठीच वाटतं की , तो आधीच्या चित्रपटांनी प्रेक्षकांमधे तयार केलेल्या संभाव्य अपेक्षांचं ओझं डोक्यावर घेत नाही आणि अगदीच वेगळ्या पध्दतीच्या चित्रपटाला हात घालतो . हा प्रयत्न म्हणजे अर्थात ' बी पी ', ऊर्फ ' बालक - पालक '.
बी पी , हा या दिग्दर्शकाच्या आधीच्या चित्रपटांहून संपूर्णपणे वेगळा आहे . त्यामागची मूळ कल्पना , ही काहीशी गंभीर असली , तरीही तो जवळजवळ पूर्णपणे विनोदी आहे . त्याचा भार कोणा एका नामांकित कलावंतावर नसून ( जरी त्यात छोट्या भूमिकांमधे असे कलावंत जरूर पाहायला मिळतात ) पाच शाळकरी ( वा निदान शाळकरी दिसणाऱ्या ) मुलांवर आहे . प्रबोधन हा जरी चित्रपटाच्या हेतूंमधला एक भाग असला , तरी अगदी शेवटच्या पाचदहा मिनिटांखेरीज तो कुठेही स्वतःकडे अनावश्यक मोठेपणा घेण्याचा प्रयत्न करत नाही , वातावरण सतत खेळकर ठेवतो .
' बीपी ' हा अंबर हडप आणि गणेश पंडित यांनी लिहिलेल्या आणि महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमधे गाजलेल्या एका याच नावाच्या एकांकिकेवर सैलसा बेतला असल्याचं मी ऐकून आहे . ही एकांकिका मी पाहिलेली नाही . त्यामुळे ती आणि चित्रपट यांमधे नक्की काय बदल आहेत , हे मी छातीठोकपणे सांगू शकणार नाही . मात्र एकांकिका त्या मानाने हल्लीची असल्याने एक बदल त्यात नक्की असावा , असं मला वाटतं आणि तो म्हणजे काळाचा बदल . बीपी जरी हल्लीच्या काळातली मुलं आणि त्याच्या पालकांमधे आवश्यक असणाऱ्या सुसंवादाविषयी बोलत असला , तरी त्यातलं कथानक हे गेल्या पिढीत १९८० च्या दशकाच्या आसपास घडणारं , पालकांना त्यांच्या बालपणीचे दिवस आठवायला लावणारं आहे . अशी पिढी , जी आज बालकांच्या नसून पालकांच्या स्थानी आहे , ज्यांच्या अनेक कडूगोड आठवणी या संवेदनशील विषयाशी जोडलेल्या आहेत , आणि अर्थातच , ज्यांना ' बीपी ' या शब्दप्रयोगाचा खरा अपेक्षित अर्थ माहीत आहे .
ब्लू फिल्म्स ना ' बीपी ' का म्हंटलं जात असे , हे मला अजिबात सांगता येणार नाही . पण मी स्वतः आठवी - नववीत असताना हा एक फार जिव्हाळ्याचा (!) विषय होता हे खरं . या लपून पाहाण्याच्या चित्रपटांमधे कोणी दर्जा शोधत नाही हे खरं असलं तरी , नवे रंगीत टिव्ही आणि नव्याने घरात दिसू लागलेले व्हिसीआर यांच्या काळात त्यातल्या त्यात बऱ्या फिल्म्स मिळवणे आणि पालकांच्या नकळत पाहणे , हा त्याकाळी एक धाडसाचा विषय होता . आज इन्टरनेटने जे - ते उपलब्ध करून देऊन ज्या अनेक गोष्टींमधला चार्म घालवलाय , त्यातलीच ही देखील एक म्हणता येईल . बीपी मधल्या कालबदलामागे हे हरवलेलं धाडस पालकवर्गाच्या मनात पुन्हा जागृत करणं , हा एक हेतू असू शकतो . मात्र असं असतानाही चित्रपटाला आजच्या काळाविषयी जे सत्य मांडायचय त्याची अपरिहार्यता कमी होत नाही . मी तर म्हणेन की केवळ सेक्सच का , घाऊक उपलब्धतेमुळे आजच्या पिढीत जो संवेदनशीलतेचा ऱ्हास होताना दिसतोय , त्याची एक नोंद घेण्याचं काम बी पी ने केलेलं आहे .
बीपी मधलं प्रमुख टोळकं आहे , ते चौघांचं . अव्या ( रोहीत फाळके ), चिऊ ( भाग्यश्री सकपाळ ), भाग्या ( मदन देवधर ) आणि डॉली ( शाश्वती पिंपळीकर ). एका चाळीत राहाणाऱ्या या चौघांना आपल्या परिचित विश्वापलीकडलं काहीतरी पालकांनी आपल्यापासून दडवून ठेवल्याचा सुगावा लागतो आणि हे नक्की काय ते जाणून घेण्याचा ते सपाटा लावतात . या कामात त्यांच्या मदतीला धावून येतो , तो या विषयाचा विश्वकोश असणारा विशू ( प्रथमेश परब ). उरलेला चित्रपट हा प्रामुख्याने दोन भागात विभागला जातो . या चौकडीच्या जिज्ञासेची पूर्तता करणारा पूर्वार्ध , तर त्या पूर्ततेमुळे त्यांच्या मानसिकतेत होणारे बदल दाखवणारा उत्तरार्ध . चित्रपटाचा पूर्वार्ध हा अधिक एकजिनसी आहे , कारण त्यात या मुलांचा एका विशिष्ट दिशेने होणारा प्रवास हा चढत्या आलेखाप्रमाणे येतो . याउलट उत्तरार्ध हा व्यक्तिरेखांच्या स्वतंत्र वाढीला वाव देणारा आणि अधिक आशयपूर्ण असूनही किंवा त्यामुळेच काहीसा एपिसोडिक आहे . हे टोळकं टोळकं न राहता इथे त्यांच्या तीन सुट्या गोष्टी होतात आणि विशू हा बराचसा बाजूला पडतो . मात्र तरीही एकूण परिणामात चित्रपट कच्चा वाटत नाही हे विशेष !
या दिग्दर्शकाची शैली ही कदाचित त्याच्या अॅडव्हर्टायजिंग पार्श्वभूमीमुळे असेल , पण छोट्या छोट्या जागा भरत नेण्याची , प्रसंग खुलवत नेण्याची आहे . त्यामुळे तो प्रत्येक प्रसंग शक्य तितका पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो . त्यामुळे कथाकल्पनेचा जीव छोटा असला तरी काहीतरी थातूर मातूर पाहिल्यासारखं वाटत नाही . चित्रपट भरगच्च वाटतो . फॅशन , दबंग , बालगंधर्व यांसारख्या विविध प्रकारच्या चित्रपटातून त्याच तोलाचं काम करणारा महेश लिमये , हा सध्याच्या महत्वाच्या छायाचित्रकारांतला एक मानला जातो . अशा छोटेखानी पण महत्वाच्या चित्रपटाला आलेल्या वजनात त्याचाही हात असणं साहजिक आहे . मात्र सर्वाधिक श्रेय जायला हवं , ते यातल्या मुलांकडे . मदन देवधर एक गुणी अभिनेता म्हणून परिचित आहेच . पण इतर , आजवर पडद्यावर न चमकलेली ही सारीच मुलं या गंभीर आणि गंमतीदार भूमिकांमधे आपला तोल सावरत कमालीच्या सफाईने वावरली आहेत . त्यांच्यासाठी आणि या आज प्रत्येकच घरात पालकांना संभ्रमित करून सोडणाऱ्या विषयासाठी ' बीपी ' पाहणं आवश्यक ठरावं !

- गणेश मतकरी (महाराष्ट्र टाइम्समधून) 

17 comments:

lalit January 7, 2013 at 3:27 AM  

chitrapat avadala. mulancha kaam khupah chhan ahe. ani tyancha abhinay natural watato.
pan tyatil ek gosht samajali nahi ti mhanje. tyani ( mulani ) cinema pahilya nantar . pratham dolly ata he sarv pure mahnun bhandun nighun jate. tar ti sheavati parat to cinema baghyala parat kashi kay tayar hotana dakhavi ahe?

Digamber Kokitkar January 7, 2013 at 5:11 AM  

Cinema chaan aahe.

1 gosht patil ti mhanje marathitun kahi changle directors hindit jat astana RAVI JHADHAV maybhashet ajun pay rovun ubha aahe. ani vegle cinema denyacha prayatn karat aahe.

BP ha tyancha sarvant changla cinema hya shi purna sahmat....mulancha naisargik abhinay sundar.... 2 goshti khataklya..

1. Gaani 1983 chya kalatali vatat nahit.
2. Avya-Chiu ashi jodi flashback madhye astana real jodi Avya-Dolly ashi ka..

ganesh January 7, 2013 at 8:00 AM  

Lalit, in case where a group of children is protecting a secret, such things may happen. she is not very happy to be there but she shares the secret.
Digambar, After all its a commercial film. song compromise could have been avoided but is understandable. Avya - Chiu issue mala pan kalla nahi. I assumed that she is chiu but later read in synopsis I read she is Dolly. no idea what happened there. it is certainly possible but then the climax should suggest.

Vishalkumar January 8, 2013 at 3:21 AM  

Its very nice to see a post with good remark about Indian movie after so many days. Thank you. I liked movie too.

I have a request. Might be not in main stream cinema, but in region films in India many remarkable films would be made. Could be please choose one or two for next posts topic. Or can you suggest a good blog/site which related about good Indian movies. Hope there will be some.. :)

Sachin Powar January 9, 2013 at 12:42 AM  

चित्रपट निश्चित आवडला, खालील वाक्याशी अगदी सहमत आणि बीपी निश्चित आधीच्या चित्रपटांपेक्षा आवडला.
>>" नटरंग किंवा बालगंधर्व .. तरी मला वैयक्तिकदृष्ट्या फार आवडलेले चित्रपट नव्हेत"<<

चित्रपट पाहताना अस वाटलं की ज्या संदेशासाठी हा बनवलाय तो थोडा कमी पडतोय आणि नुसतेच मनोरंजन जास्त होतय का! पण चित्रपट संपल्यानंतर २ गोष्टी जाणवल्या एक म्हणजे अजून थोडा उपदेश आणि चित्रपट कंटाळवाणा झाला असता! आणि दुसरी म्हणजे थेट भाष्य जरी कमी असल तरी त्यांचा ग्रुप विलग होण्यापासूनचं अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून योग्य तो मेसेज पोचवला गेलाय.
त्यामुळे भलेही थेटरात कितीही शिट्ट्यांचा पाउस असो आणि चित्रपट चालण्यात nostalgia चा कितीही हात असो, संवेदनशील प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश जाईलच :)

regarding Avya-Chiu:
मला अस वाटत की चिऊ त्याला भाऊ मानत असते त्यामुळे त्या दोघांनी लग्न केलं नसावं. किंबहुना विशुने त्याला सुचवलेल असतंच की प्रेमच करायचं आहे तर डॉली वर कर.

Vivek Kulkarni January 9, 2013 at 7:06 AM  

बीपी म्हणजे ब्लू पिच्चर पिक्चर नाही. लातुरात आम्ही बीपी हाच शब्द वापरायचो. आज इंटरनेटमूळे ते चित्रपट चोरून बघण्याची मजा निघून गेलीय.

प्रसाद January 10, 2013 at 5:22 AM  

गेली २-३ वर्षे तुमचा हा ब्लॉग नियमितपणे वाचतोय कारण चित्रपटाकडे केवळ कथा किंवा नायक-खलनायक अशा ढोबळ फूटपट्ट्यांनी न पाहता किती वेगवेगळ्या प्रकारांनी पाहता येते, या ब्लॉग मधून नेहमीच दिसून येते. आणि मुख्य म्हणजे एरवी कधी ऐकलेही नसते अशा इंग्रजी चित्रपटांचा इथे अक्षरशः खजिना सापडतो.

बरेच दिवस लिहायचे राहून जात होते. पण आज मराठी सिनेमाबद्दल लिहिलेले दिसल्याने आज लिहावेसे वाटले.

तुमच्या ब्लॉग वर इंग्रजी सिनेमा बद्दल वाचताना एक विचार सतत मनात येत असतो - चित्रपटाबद्दल इतका बारीक सारीक विचार करू शकणारा परीक्षक मराठी सिनेमा बद्दल इतके कमी का लिहितो ?

'हिंदी/इंग्रजी सिनेमा पेक्षा मराठी सिनेमा फिका का भासतो' या मागे प्रसिद्धी, stardum ही जशी कारणे आहेत तशीच चिकित्सकपणे परीक्षण करणाऱ्यांचा अभाव हेही एक कारण आहे. मराठी सिनेमातल्या चांगल्या गोष्टी जगाला सांगणारे समीक्षक फार कमी असतील (दैनिकातले परीक्षण अतिशय त्रोटक असते. ते इथे गृहीत धरलेले नाही). अशा वेळेस तुमच्यासारख्या अनुभवी आणि सखोल समिक्षकाची मराठी सिनेमाला फार गरज आहे. गेल्या काही वर्षात सचिन कुंडलकर, सतीश मनवर, उमेश कुलकर्णी elite class मधले दिग्दर्शक किंवा बालगंधर्व सारखा प्रचंड गाजावाजा झालेला सिनेमा या सारखे अपवाद वगळता तुमच्या ब्लॉग वर मराठी सिनेमाची दाखल फार क्वचित घेतली गेल्याचे पाहून मला फार खंत वाटते. गेल्या काही वर्षात शाळा, तुकाराम, काकस्पर्श, जोगवा, वावटळ, चेकमेट, धूसर, जन गण मन असे अनेक दखलपात्र सिनेमे येउन गेलेत. ते तुम्हाला आवडले असतीलच असे अजिबात नाही. मग त्या सिनेमातल्या त्रुटी तुम्ही आम्हाला नक्कीच सांगू शकता (जसे बर्फी भावला नाही हे तुम्ही आवर्जून सांगितलेत).
त्याच बरोबर या सिनेमांमध्ये काही ना काही चांगले नक्कीच होते.

मी स्वतः वर्षभरात २५-३० मराठी सिनेमे पाहतो (यामध्ये भरत-मकरंद प्रभृतींचे पाचकळ सिनेमे नाहीत). त्या २५ पैकी किमान १० सिनेमे तरी निदान दखल घ्यावी (त्रुटींसह) असे नक्कीच असतात.

भले अनेक सिनेमे फसलेले असतील. पण त्याची दखलही न घेतली न जाणे हे अधिक दुर्दैवी, जे मराठी सिनेमाच्या बाबतीत (या ब्लॉगवरच नाही तर जवळपास सगळीकडेच) घडते.

आशा आहे तुम्ही मराठी सिनेमांचे परीक्षणही जास्त प्रमाणात इकडे प्रसिद्ध कराल.

ganesh January 10, 2013 at 8:32 PM  

Thanks all.
Vishal, surely there r many good films in regional cinema. I had an opportunity to see some of the recent ones when i was on the regional panel of national award this year for eastern region. However ,everyone has a special area of interest and mine happens to be world cinema, being a bit partial to american in both commercial and independent streams. Also we don't get to see many regional films here so one has to remain updated at all times which i have not been able to do. In my opinion ,next few articles should be about oscar nominees. But lets see.
Vivek, i know BP is not blue picture as we never used 'picture' in the term . But it is synonymous to the term blue film. And we never called it bf. so there has to be some reason why it was called bp. It eludes me now.
Thanks pashya. I have been asked this question . In fact even by some marathi filmmakers as well. I do have a basic grip on what is happening in marathi industry as i have written a few long articles on the subject. Most recent in' deep focus' journal' s revival issue. Still i am not able to write about many films for simple reason. I either don't get to see them on time or at all. Filmmakers are only interested in the publicity which newspapers give them and i am not associated with any. When i am aware of any interesting film i make it a point to write and ask the newspapers to get it printed, which they usually do, if the film is current. So there is no guarantee of my writing in papers every time and there is no guarantee that i will write positive. So the makers are not bothered. They don't want criticism but just a storyline to attract viewers.another reason is this. I stay in western suburbs and marathi films release here at extremely inconvenient timing. So overall ,it is difficult to see these. Thats why i write about few films. Don't consider this a defence but its a fact.

प्रसाद January 10, 2013 at 11:15 PM  

Thanks Ganesh for your prompt reply. I can understand the fact that marathi show timings in-general in Mumbai are very odd and less. Maybe I am able to see more marathi movies because I live in Pune and personally too much interested in Marathi movies.

Actually I had idea that your obvious inclination is towards English movie, so naturally you would write more often about it. So no issues with that at all.
Just one request. Even if you get to see a marathi movie when it comes on DVD/net and u r not able to write about it in Newspapers, please try to write about it here on your blog (Just like you write about some past english movies). I'll be more than happy to suggest you some notable marathi movies.

Rohit jd January 11, 2013 at 3:36 AM  
This comment has been removed by the author.
Rohit jd January 11, 2013 at 3:39 AM  

बी पी हा चित्रपट वाढत वय आणि लैगिक शिक्षणाबद्दलचे अपुरे knowledge यांना वरवरच हाताळतो अस वाटत. या फिल्मची निंदा करण्याचा काही माझा हेतू नाही, उलट मराठीत असा विषय विचारात घेतला जातो याचा आनंदच आहे. पण blue film पाहून मुलांमध्ये झालेला बदल फक्त एकदा काकांच्या lecture मुळे त्यांच्यामध्ये इतके आणि लगेच परिवर्तन होते हि गोष्ट मात्र फारच खटकते.

ganesh January 11, 2013 at 8:06 PM  

Pashya, will think about your suggestion. Though I dont think I need to be suggested films. I am perfectly aware of which ones are notable.
Rohit, I agree to an extent. Only explaination is that they may not want to get to deep as it would also mean that it will turn serious. As it is ,the film does get more serious in the latter part.

Rohit jd January 12, 2013 at 3:58 AM  

thank you for your reply. will you please recommend one more movie on this subject?? does 'Saved !'(2004) film touches this subject as well?

Anagha February 2, 2013 at 7:20 AM  

बीपी पाहिला. सुरवात सुंदर, मुलांची कामे अप्रतिम. मात्र, शेवट अतिशय म्हणजे अतिशय खटकला. हे म्हणजे A for apple झालं. तो सीन हा काहीही न सांगता खूप काही सांगून जाणारा असा हवा होता ! हे म्हणजे 'कथेचे तात्पर्य:......' इतकं बाळबोध केलेलं आहे. शेवट खूप विचार करून लिहायला हवा होता. फारच बेसिक केलेला आहे. त्यात दिग्दर्शकाची प्रगल्भता दिसून येत नाही.

Renuka Gupte Vaidya March 16, 2013 at 8:29 AM  
This comment has been removed by the author.
Milya May 7, 2013 at 3:09 PM  

The term BP is derived from the word Blue Prints which was synonymous with Blue Films. This term was the coded word for all pornographic films produced during 70's-80's for a long time.

Indeed excellent article and keep up the good work.

Unknown December 20, 2019 at 5:40 AM  

THEAROARISLOVELYLONGBPIFILMSMAAYJAANRENUKAGUPTAINONTHEVAIDYAMARCH16,2013AT8:29AMCHAYEMUJHIMILASHAKTIHOKAHIMILOGICALLKIJIAYJAANRENUKAGUPTA.MAAYJAANSACHIJAANCALLKIJIAY.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP