द डिसेन्डन्टस- शेवटामागची सुरुवात
>> Monday, March 19, 2012
अनेकदा आपल्या पाहाण्यात असे चित्रपट येतात, जे पाहून आपल्याकडे असं काहीतरी का होऊ शकत नाही असा प्रश्न पडावा. हे चित्रपट नेत्रदीपक नसतात, कथेतलं नाट्य टोकाचं नसतं, हाताळणी वरवर पाहाता साधी असते, आशय पटण्याजोगा आणि सर्वसाधारणपणे कोणालाही जवळचा वाटणारा असतो आणि बजेट बेताचं असतं. थोडक्यात सांगायचं तर आपल्या चित्रपटउद्योगाच्या अवाक्यात बसणार नाही असं काहीच त्यात नसतं. तरीही ते असं काहीतरी सांगून ,दाखवून जातात ,जे आपल्या कायम स्मरणात राहील. त्यांना सुचलेली गोष्ट आपल्याकडल्या कुणाला सुचू नये याबद्दल हळहळ वाटायला लावतात. नुकत्याच होऊन गेलेल्या आँस्कर पारितोषिकाच्या स्पर्धेत उत्कृष्ट चित्रपटाच्या नामांकनात एक असलेला व त्याआधी गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळविलेला ' द डिसेन्डन्ट्स’ अशीच हळहळ लावून ठेवतो.
दिग्दर्शक अलेक्झांडर पेन यांच्या इतर चित्रपटांप्रमाणेच ( उद. अबाउट श्मिड्ट, साईडवेज) डिसेन्डन्ट्स हा कथेपेक्षा अधिक ,व्यक्तिरेखांचा सिनेमा आहे. याचा अर्थ त्याला गोष्ट नाही असा नाही. उलट त्याला ब-यापैकी गुंतागुंत असलेली ,पुरेशी नाट्यपूर्ण गोष्ट आहे.मात्र तिची रचना, तिचा तोल हा पूर्णपणे त्यातल्या व्यक्तिरेखांशी जोडलेला आहे.इथली पात्र कथेच्या सोयीसाठी काही करत असल्याचा कधीही भास होत नाही. ही पात्रं केवळ जगतात. कथा स्वाभाविकपणे त्यांच्या आजूबाजूला आकार घ्यायला लागते.
इथली सर्वात महत्वाची व्यक्तिरेखा आहे, ती मॅट किंग (जॉर्ज क्लूनी) ही.क्लूनी हा अमेरिकेतल्या आणि पर्यायाने जगातल्या सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक महत्वाचं नाव आहे हे मी वेगळं सांगायला नको. पण तो केवळ देखणेपणावर काम भागवणारा नट नाही. भूमिकेचा तपशीलात अभ्यास करणं आणि ती उभी करताना आपल्या स्टार प्रतिमेचा , आपल्या लोकप्रियतेचा विचार पूर्णपणे बाजूला ठेवणं हा त्याचा विशेष. वन फाइन डे , ओशन्स मालिका यांसारख्या अतिशय व्यावसायिक चित्रपटांबरोबरच सोलरीस, सिरीआना , द अमेरिकन अशा वेगळ्या पध्दतीच्या़ चित्रपटांमधून त्याने आपली नवी ओळख बनवली आहे.तो स्वत: उत्तम दिग्दर्शकदेखील आहे हे त्याच्या ’कन्फेशन्स आँफ ए डेन्जरस माईन्ड’, ’गुड नाईट अँन्ड गुड लक’ किंवा यंदाच्या ’आईड्स आँफ मार्च’ मधेही दिसून आलं आहे. नित्य वेगळ्या पठडीतल्या भूमिका करत असूनही डिसेन्डन्ट्सचं नाव त्याच्या सर्वोत्कृष्ट भूमिकांमधे घेणं भाग पडावं , अशीच त्याची इथली कामगिरी आहे.
सामान्य प्रेक्षक हा ब-याचदा भूमिकेची चमत्कृती अन अभिनयाचा दर्जा यांची गल्लत करतो. त्यामळे पुष्कळदा लकबी, वैशिष्ट्यपूर्ण रंग/वेषभूषा, शब्दबंबाळ लेखन हे सगळं नटाच्या कर्तृत्वात जमेला धरलं जातं. मॅट किंगची व्यक्तिरेखा उभी करताना क्लूनीला अशा कुठल्याच गोष्टीची थेट मदत होत नाही. मॅट एक साधा माणूस आहे. व्यवसायाने वकील आहे. हवाईमधल्या परंपरागत श्रीमंत कुटुंबात किंग कुटुंबाची गणना होते. मात्र ही श्रीमंती मिरवण्याचीही त्याला गरज वाटत नाही.चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच त्याला जाणीव आहे ती कामापायी आपल्या हातून घराकडे झालेल्या दुर्लक्षाची. सध्या तो दुहेरी पेचात सापडलेला. मात्र बिकट परिस्थितीतही डोकं ताळ्यावर ठेउन शक्य तितकं न्यायाने वागणं हेच तो योग्य समजतो. नटाने अभिनय न करता स्वत:च ते पात्र बनण्याचा प्रयत्न करावा , असं या क्षेत्रातल्या थोरामोठ्यांनी सांगून ठेवलंय. पण ते कसं करावं याचं टेक्स्टबुक एक्झाम्पल म्हणजे क्लूनीचा मॅट किंग. आतून येणा-या भावनांचं संयत पण प्रत्ययकारी दर्शन, देहबोलीचा काळजीपूर्वक पण जेवढ्यास तेवढा वापर,कथानकाचा अचूक पकडलेला सूर अशा कितीतरी गोष्टि सांगता येतील.केवळ त्याने संवादांपेक्षा अधिक पॉजेसचा केलेला वापर, त्याची चाल (अन एका प्रसंगातलं धावणं) इतकंदेखील त्याची ताकद सिध्द करणारं आहे.
तर मॅट किंग. मॅटचं एरवीचं बिझी शेड्यूल सध्या एका जमीनविक्रीच्या कामाने अधिकच बिझी झालेलं. ही कोट्यवधी रुपयांची जमीन वडिलोपार्जित आहे, अन संपूर्ण कुटुंबाच्या मालकीची. पण ती विकण्या न विकण्याचा अंतिम निर्णय मॅटच्या हातात आहे़ .मॅट या कामात असतानाच बातमी येते ती त्याच्या पत्नीला झालेल्या अपघाताची. चित्रपट सुरू होतो तो हॉस्पिटलमधेच,थेट मुद्द्याला हात घालत, कोणत्याही प्रकारची प्रस्तावना टाळत.लवकरच मॅटला कळतं ,की अपघातापासून कोमात असणारी त्याची पत्नी एलिझबेथ बरी होण्याची शक्यता नाही. लवकरच ती हे जग सोडून जाईल.१० वर्षांची स्कॉटी (अमारा मिलर) आणि सतरा वर्षांची अँलेक्स (शेलेन वुडली) या आजवर अंतरावर असलेल्या मॅटच्या दोन मुलींच्या विश्वात शिरकाव मिळवणं ही त्याच्यापुढली पहिली कठीण कामगिरी असते.तो प्रयत्न सुरू असताना अँलेक्सकडून एक अधिकच धक्कादायक बातमी कळते. अपघाताआधी काही दिवस एलिझबेथ दुस-याच कोणाच्या प्रेमात पडलेली असते.तिच्या सध्याच्या परिस्थितीत ,या माहितीवर काय रिअँक्ट करावं हेदेखील मॅटला समजेनासं होतं.
द डिसेन्डन्टचा टोन हा त्याचा विशेष आहे. विषयावरुन वाटतं तितका तो दु:खी नाही. दु:खाची छटा त्यात जरुर आहे, पण एरवीच्या आयुष्यात माणसं जशी केवळ दु:ख घेऊन बसू शकत नाहीत, तसंच इथल्या पात्रांचही होतं. त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याचा एक ट्रॅक सतत चालू राहातो, जात्या माणसांबद्दल त्यांना वाटणारं प्रेम तर राहातंच पण ते इतर भावभावनांना हद्दपार करु शकत नाही. संकटाला तोंड देताना ही पात्र जवळ येतात, त्यांच्यातले बंध घट्ट व्हायला लागतात. या सा-यामुळे चित्रपट केवळ सुखांत शोकांत अशा गणितात बसवणं शक्य होत नाही. त्यातल्या शोकाला छेद देणारी प्रसन्नतेची छटा आपल्यापर्यंत पोचते.
डिसेन्डन्ट्स हे नाव त्याच्या आशयाकडे अचूक निर्देश करणारं आहे. त्यातल्या वारशाचा अर्थ हा दुहेरी आहे. तो जसा एलिझबेथनंतर तिच्या मुलींच्या रुपाने राहाणा-या तिच्या अंशाशी जोडलेला आहे तसा तो किंग कुटुंबाच्या वडिलोपार्जित जमिनीशीदेखील संबंधित आहे.या दोन तशा स्वतंत्र वाटणा-या गोष्टींमधला समान धागाच डिसेन्डन्ट्सला संकेतांच्या बाहेर नेणारा, शेवटामधे दडलेली नवी सुरुवात दाखवणारा,प्रगल्भ अर्थाच्या शक्यता तयार करणारा आहे.
गणेश मतकरी

6 comments:
barech divas shodhat hoto yach title. story thodifar mahiti hoti. Thanks a lot. Baghato ata.
Can you please change the verification? It is difficult to post comment :-)
खरोखरच हा सिनेमा पाहून आपल्याकडे अस काहीतरी का होऊ शकत नाही असा प्रश्न पडला. एरवीच्या आयुष्यात माणस जशी वागतील तसच इथली पात्र वागताना दिसतात. त्यांच दुःख जेवढ खर वाटत तेवढच त्यांचे संबंध सुधारण ही खर वाटत. अशा प्रकारची संयत हाताळणी आपल्याकडच्या सिनेमांमध्ये अभावानेच आढळते. पटकथा, अभिनय अशा सर्वच बाबतीत सिनेमा अतिशय उत्कृष्ट आहे. मला विशेष भावलेली गोष्ट म्हणजे cinematography. Cinematography आशयाला अतिशय पूरक आणि अत्यंत प्रभावी आहे.
Thanks vijay and sneha for the response. Vijay, your comment is noted but it is not decided by me alone and i am not really sure why the procedure is what it is. Still there must be some reason. We will discuss this matter.
तुमचा ब्लॉग बर~याचदा वाचतो, actually i m not giving any comment, but after this i remember BALRAJ SAHANI, I am not even comparing them, पण क्लूनीने खूप छान काम केलयं, anyway तुमचं लिखाण छान आहे आणि ब्लॉग लिहिण्याचं सातत्यही,
Prashant mhanal tas ch mal pun mhanayche ahe , waat bagoon wachato , pun coments takat nahi..
dusra as prashant mhganal tas ch. balraj sahani aathavale ani nuktach tyanch GARAM HAWA pahile khupach chhan watala . tumhi pahila aselch , nasel tar jarror paha . bass... thanks........
thanks Prashant and Attarian, Garm Hawaa is one of those I have missed. its on the 'to see' list for sure.
Post a Comment