ड्रग अॅडीक्ट्सच्या नजरेतून ( डॅनी बॉईल-१)
>> Friday, February 6, 2009
काही चित्रपट विशिष्ट व्यक्तींच्या नजरेतून सांगितले जातात आणि वेगळे ठरतात. न्यूझिलंडचा हेवनली क्रिचर्स मनोरुग्णांच्या नजरेतून सांगितला गेल्याने वेगळा वाटतो तसाच काहीसा प्रकार इंग्लंडच्या ट्रेनस्पॉटींगमध्ये पाहायला मिळतो. मात्र इथलं जग हे मनोरुग्णांचं नसून ड्रग अॅडीक्ट्सचं आहे.
ड्रग अॅडीक्ट्सबद्दल लिहिलं गेलेलं साहित्य किंवा या विषयावर आधारित चित्रपट हे कायम व्यसनाधीन मंडळींकडे एक सामाजिक प्रश्न म्हणून पाहत आलेले आहेत. या साहित्यकृती वा चित्रपटांचे कर्ते या मंडळींचं चित्रण काहीसं त्रयस्थपणे आणि थोडंफार दयाबुद्धीने करताना दिसतात. इथे मात्र तसं होत नाही. दिग्दर्शक डॅनी बाईलचा ट्रेनस्पॉटींग प्रेक्षकाला अॅन्टी ड्रग उपदेशाचे थेट डोस न पाजता, या व्यसनी विश्वाचा एक फेरफटका ड्रग अॅडिक्ट्सच्या नजरेतूनच घडवतो आणि निष्कर्षाचं काम प्रेक्षकांवरच सोडतो. निष्कर्ष हा ड्रगविरोधी आहे, मात्र त्यापर्यंत पोचताना व्यसनाच्या आहारी जाणा-यांची मनस्थिती हेरॉईनसारखे अमली पदार्थ वापरण्यातला त्यांचा आनंद (टेक द बेस्ट ऑरगॅझम यू एव्हर हॅड, मल्टीप्लाय बाय १०००,अॅन्ड यू आर स्टील नोव्हेअर निअर इट)
नाईलाजातून वाढणारी सहकाराची वृत्ती, अशा एरवी ऐकायला- पाहायला न मिळणा-या घटकांकडे दुर्लक्ष केलं जात नाही, ते चित्रपट एकांगी नसून दोन्ही बाजूंचा विचार करू पाहत असल्याने या भूमिकेचा तोटा असा की ट्रेनस्पॉटींग सर्वत्र वादग्रस्त ठरला. यु.के, ऑस्ट्रेलिया, अमेरिका या देशांमध्ये त्यावर व्यसनाच्या बाजूचा असल्याचे आरोप झाले आणि त्याबरोबरच व्यसनविरोधी म्हणून त्याच आरोपांचं खंडन करणारेही पुढे आले. अर्थात नो पब्लिसिटी इज बॅड पब्लिसिटी या न्यायाने चित्रपट मुख्य धारेतून आला आणि मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांपर्यंत पोहोचला.
ट्रेनस्पॉटींग आयर्विन वेल्शच्या कादंबरीवर आधारित आहे. त्याचं नाव वेगळं आणि पटकन लक्षात राहणारं असल्याने चांगलं असलं, तरी त्याचा प्रत्यक्ष आशयाशी काहीही संबंध नाही. ट्रेनस्पॉटींग या ट्रेन्सची सगळ्या प्रकारची माहिती करून घेण्याच्या छंदाचा एक छोटा संदर्भ पुस्तकात येतो, चित्रपटात तोही नाही. मात्र नाव मूळ कादंबरीचंच ठेवण्यात आलं आहे. इथलं प्रमुख पात्र आणि निवेदक आहे मार्क रेन्टन (इवान मॅकग्रेगर), मार्क हेरॉईन अॅडीक्ट आहे, पण वेळप्रसंगी कोणतीही नशा त्याला चालते. मार्कचं व्यसन हे म्हटलं तर आयुष्य चांगल्या रीतीने जगण्याचा तथाकथित मध्यमवर्गीय कल्पनांविरुध्द केलेलं बंड आहे. पण केवळ तेवढंच नाही. अमलाखाली असतानाच्या स्वर्गीय सुखालाही तो विसरू शकत नाही. दुर्दैवाने अंमल कायम टिकत नाही आणि पुढल्या नशेसाठी लागणा-या पैशाची चिंता आणि अंमल उतरल्यावर होणारा त्रास या त्याच्या मुख्य अडचणी कायमच राहतात. मार्कचं, एक त्याच्यासारख्याच गयागुज-या मुलांचं मित्रमंडळ आहे. स्पड (इवन ब्रेमनर) हा काहीसा लाजाळू अर्धवट मुलगा, टॉमी (केवीन मॅककिड) हा व्यसनाच्या कल्पनेनेच झपाटलेला तरुण, सिक बॉय (जॉनी ली मिलर) हा शॉन कॉनरीच्या बॉण्डपटाचा चाहता असलेला भुरटा चोर आणि बेगबाय (रॉबर्ट कार्लाईल) हा निर्व्यसनी पण माथेफिरू गुंड असं हे टोळकं आहे. त्यांचं व्यसन हा त्यांच्यातला समान धागा आहे, ज्यामुळे त्यांची मैत्री चिरकाल टिकणारी झाली आहे.
ट्रेनस्पॉटींगचं विशेष म्हणजे या ज्वलंत गंभीर विषयाचा त्यांनी घेतलेला विनोदाचा आधार, तरीही राखलेलं गांभीर्य, चित्रिकरणातली प्रचंड गती आणि ऊर्जा, त्याबरोबर व्यसनाच्या दृष्टचक्राला सर्व बाजूंनी दाखवून साधलेला परिणाम. या चित्रपटाला म्हणावी तशी कथा नाही, मात्र आलेख आहे. ड्रग अॅडिक्ट्सच्या आयुष्यात येणारे टप्पे आणि त्यांनी बाहेर पडण्याचे केलेले फोल प्रयत्न दिग्दर्शकाला आपल्यापर्यंत आणायचे आहेत. त्यामुळे चित्रपटाची सुरुवात त्यांनी मार्कच्या व्यसनमुक्त होण्याच्या प्रयत्नापासून केली आहे. व्यसनमुक्तीचा प्रयत्न, या प्रयत्नादरम्यानचा त्रासदायक काळ, सर्व प्रश्नांचं सोपं उत्तर असलेल्या ड्रगबद्दलचं वाढतं आकर्षण,एखादा कमजोर क्षण आणि पुन्हा या चक्रात अडकणं, हीच म्हटली तर यातल्या व्यक्तिरेखांची गोष्ट म्हणता येईल.
प्रत्यक्ष विषयात गडदपणा असूनही ट्रेनस्पॉटींग कुठेही करुण होत नाही. यातल्या व्यक्तिरेखांवर आलेले बिकट प्रसंगही तो काहीशा तिरकस दृष्टीक्षेपात मांडतो. मार्कची (स्कॉटलंडमधल्या सर्वात वाईट) टॉयलेटमधील उडी, स्पडने मैत्रिणीकडचा बिछाना खराब करणं यासारखे प्रसंग, हे या पात्रांसाठी खरंतर लज्जास्पद आहेत. पण एकदा का हा चित्रपट त्यांच्याच नजरेतून असणं गृहीत धरलं, तर यातल्या कोणत्याच गोष्टींकडे तो पुरेशा गंभीरपणे का पाहत नाही, हे उघड होतं. ट्रेनस्पॉटींगचा शेवट हा जाणूनबुजून दाखविलेल्या एका खोट्या आशावादावर आहे. एका व्यक्तिरेखेने पुन्हा शपथेवर ड्रग्ज सोडून चारचौघांसारखं आयुष्य जगण्याला सुरुवात करण्याच्या बाता शेवटी मारल्या जातात. मात्र त्याचवेळी या पात्राच्या खांद्यावरती खूपशा पैशांची बॅग आणि त्याने हाती घेतलेल्या हेरॉईनची शुद्धता पाहण्यासाठी नुकतीच केलेली नशा आपल्याला वेगळंच चित्र दाखविते. व्यसनाधीन व्यक्तींच्या मनातल्या इच्छा मात्र प्रत्यक्ष आयुष्यातली व्यसनाची गुलामी हे विदारक चित्र ट्रेनस्पॉटींग कोणताही आव न आणता आणि स्वतःकडे मोठेपणाची भूमिका न घेता रंजक करून सांगतो, ही त्याची खासियत म्हणावी लागेल.
-गणेश मतकरी
5 comments:
I am a constant reader of this blog
And I really like your reviews.
One suggestion it’s not regarding the blog but something else
As some good movies are coming in our bollywood can you please write the reviews for them at earliest?
If you write abt them after 2-3 months there is nothing that one can do.
Now a day DevD is released and I really feel this forum should educate the readers to go there and watch this film because the reviews in Marathi media are really ridiculous
Check this one
http://beta.esakal.com/2009/02/10193023/dev-d-hindi-cinema.html
hemant,
thanks for your comment.i agree with you on principal but actually there is a reason why my articles here appear a bit late. they are usually published in saptahik sakal or mahanagar before appearing here.and its not ethical to have them appear simultaniously. so they appear only after issue is off the stands.even in Saptahik sakal they appear about a week after the movie release. to me its not that important as i dont see them exactly in review format. u will notice that most of these articles are about exploration of theme and direction. they may not tell u anything at all about obvious things like detailed story or performances. my basic idea is to encourage a concious viewing of the film , and point out diffrent aspects ,observations and so on.in fact some of the readers of the blog preffer to read them after seeing films.
about dev d, i may not watch it at all.some of my friends also want to know about my point of view, but after seeing NO Smoking, i believe that apart from being a snob ,this director has no interest in audience reaction and feels that his cinema is self contained.this would be still ok if his work is really good.which is ordinary at best.so after some thinking ,i have decided to just skip the film. maybe we should get hold of someone else to write about it...
People change over period of time and the arrogance also desolves after failure.
I havent seen the No smoking but after hearing bad reviews abt that I skipped but I really don’t want people to skip DevD because his earlier movie was bad.
I really feel this movie is more than just Anurag Kashyap and we should give credit of this movie to lot other people who put their lot of efforts in making this movie a great movie.Before going to the movie I was really prejudiced about him but after reading the times review I forced myself to watch this one. And really speaking it is more than Anurag or Abhay.
And my suggestion to you also don’t skip DevD just forgive him for last one and go to the theater.
For other point I got convinced and I will wait for your review for two weeks.
Thanks Hemant
thanks hemant,
normally i dont allow myself to get prejudiced to this extent and usually find something good about bad films too.kashyap has become an exception.other being sanjay leela bhansali.in fact i have no issues about their films being bad, usually their interviews get me. i had seen one interview of bhansali after black where he was claiming that this film was not at all influenced by hollywood but by polish cinema where first half (which is the only sensible part)was taken straight from miracle worker.i read a similar articl of kashyap with tall claims about his cinema and how no one understands it and how he doesnt give a damn.
but i know that your point is valid. even my friend who actually owns this blog is after me to watch dev d. lets see. will try is all i can say.
I am surely interested to see your comments on DEV D.
Post a Comment