रोमॅण्टिक फॉर्म्यूला आणि दोन प्रेमपट !
>> Monday, May 17, 2010
घिशापिट्या फॉर्म्युल्यांच्या बाबतीत हॉलीवूड काही बॉलीवूडहून कमी नाही. युद्धपटांपासून सूडपटांपर्यंत आणि विनोदी चित्रपटांपासून रोमॅन्टिक कॉमेडीपर्यंत अनेक चित्रपटांमध्ये फॉर्म्युलांचा सातत्याने वापर दिसतो. त्यांच्या आणि आपल्यात फरक आहे तो हा की आपल्यापेक्षा त्यांच्याकडे प्रयोगशील दिग्दर्शकांची संख्या किंचित अधिक आहे आणि फॉर्म्युले वापरले तरी त्यांच्या मांडणीत वैविध्य आणून तोच तो पणा लपवायची हातोटीदेखील.
आता रोमॅन्टिक कॉमेडीच घ्या ना! नायकाने नायिकेला भेटणं, मग प्रेम, मग गैरसमज आणि अखेर समझोता या वन लाईनवर हॉलीवूडने शेकडो चित्रपट बनवले आहेत. मात्र, ते बनवताना ज्या चित्रकर्त्यांनी नावीन्य शोधण्याचा प्रयत्न केला. अशाच चित्रपटांना प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली आहे आणि या चित्रपटांची संख्या बॉलीवूडने हेवा करण्याजोगी नक्कीच आहे. आता अशा प्रत्येक चित्रपटाची आठवण काढायची तर ग्रंथच लिहावा लागेल. त्यामुळे मी केवळ त्यातल्या प्रातिनिधिक अशा दोन चित्रपटांचा उल्लेख करतो. एक आहे `व्हेन हॅरी मेट सॅली` आणि दुसरा `समथिंग्ज गॉट्टा गिव्ह`. ज्यांनी दिग्दर्शक रॉब रायनर यांचा `व्हेन हॅरी मेट सॅली` पाहिला असेल, त्यांना निश्चित लक्षात आलं असेल, की त्याच्या गोष्टीचा साचा मी वर सांगितलेलाच होता, पण त्यातला बदल होता तो मैत्री आणि प्रेम यातल्या ख-या अन् काल्पनिक फरकाच्या आधारे घडविलेला. फॉर्म वेगळा असल्याचा आभास निर्माण करण्यासाठी सुरुवातीचा काही भाग खर्ची घातला होता. हॅरी आणि सॅली (मेग रायन) यांची अखेर मैत्री होण्यापर्यंतच्या अनेक भेटींचा ज्यात सॅलीचं हॅरीविषयीचं वाईट मत हळूहळू बदलून ते दोघे चांगले मित्र होतात. पण हॅरीच्या मते एक स्त्री आणि एक पुरूष चांगले मित्र कधीच होऊ शकत नाहीत. कारण शारीरिक आकर्षण कायमचं मध्ये येतच राहतं.
या चित्रपटात एक छान गोष्ट होती, ती म्हणजे गोष्टीच्या अधेमधे येणा-या अत्यंत ख-या-खु-या वाटणा-या जोडप्यांचे काही मुलाखतवजा शॉट्स. या मंडळींची पहिली भेट कशी झाली, प्रेमाचं लग्नात पर्यवसान कधी झालं वैगैरे सांगणारी. चित्रपट संपतो तो हॅरी आणि सॅलीच्या अशाच मुलाखतीने. मला वाटतं मागे चोप्रांच्या एका चित्रपटाच्या सुरुवातीला (बहुतेक दिल तो पागल है, पण खात्री नाही.) असे वेगवेगळ्या जोडप्यांचे शॉट्स दाखविण्यात आले आहेत. त्यांनी ते चालू कथानक तोडून दाखवणं मात्र टाळलं. बहुदा आपल्या प्रेक्षकांना ते अति वाटेल असा अंदाज असावा.
मात्र, या सर्व गोष्टी हॅरी-सॅलीची खासियत नव्हेत. त्या केवळ पूरक आहेत, या चित्रपटाची खासियत आहे, होती ती त्यातले संवाद. १९८९ मध्ये ताजे वाटणारे संवाद आजही त्यांची जादू टिकवून आहेत, यातच सगळं आलं. प्रेम, मैत्री, आकर्षण, शरीरसंबंध यावर अतिशय गंमतीशीर पण अचूक टीका करणं शक्य आहे, हे या चित्रपटानं दाखवलं. हे संवादच चित्रपटाला पुढची कित्येक वर्ष जिवंत ठेवतील.
समथिंग्ज गॉट्टा गिव्ह`देखील कदाचित अनेक वर्षे जिवंत राहील, पण संवादासाठी निश्चितच नाही. उलट संवादाच्या बाबतीत हा चित्रपट थोडा कमकुवत आहे म्हटलं तरी चालेल. संवादातल्या नावीन्याचा अभाव, पटकथेचं शेवटल्या भागात रेंगाळणं आणि लेखक/दिग्दर्शक असणा-या नॅन्सी मेयर्स यांनी टाळलेली शेवटच्या भागाची काटछाट, या दोषांनी अखेर चित्रपट जवळजवळ हातचा जाण्याची वेळ आली आहे. पण चांगला जमलेला पहिला पाऊण भाग अन् व्यक्तिचित्रणातले अचूक तपशील यांनी चित्रपटाला चांगलाच हात दिला आहे. मूळ आलेख इथेही भेट-गैरसमज-समझोता हाच आहे,पण या चित्रपटातल्या दोन गोष्टी नेहमीच्या रोमॅन्टिक कॉमेडीपेक्षा खास वेगळ्या आहेत.
पहिली गोष्ट म्हणजे इथले नायक आणि नायिका तरुण नाहीत, तर चांगले पन्नास-साठ वर्षांचे आहेत. तरुण प्रेक्षकांनी चित्रपटाकडे पाठ फिरविण्याची शक्यता गृहित धरूनही मेयर्सनी हा जुगार खेळला आहे. आजवर हॉलीवूडच्या चित्रपटांत मध्यमवयीन स्त्रियांना प्रामुख्याने दुय्यम सहाय्यक भूमिकांमध्ये टाकण्याची प्रथा आहे. ब्रॅण्डो, पचिनोपासून ते खुद्द जॅक निकोल्सनपर्यंत अनेक मध्यमवयीन नटांनी चित्रपट पेलल्याची उदाहरणं आहेत. केवळ भूमिकेची लांबीच नव्हे ग्लॅमरस नायक म्हणून त्यांचं चित्रिकरण केलेलं दिसतं. सुझान सॅरेंन्डन किंवा मेरिल स्ट्रीपसारख्या काही नायिका सोडल्या, तर हे भाग्य इतर नायिकांना मिळाल्याचं दिसत नाही. शिवाय त्या दोघींच्या भूमिकाही त्यांच्या सेक्शुअँलिटीकडे दुर्लक्ष करणा-या, केवळ व्यक्तिमत्त्वावर आधारित असतात. या चित्रपटात मात्र डाएन किटनच्या एरिका या व्यक्तिरेखेचं चित्रण सर्वच बाबतीत प्रमुख नायिका म्हणून करण्यात आलेलं आहे. तेही इतक्या ठामपणे की ग्लॅमरस मध्यमवयीन नायिकांचा नवा ट्रेण्ड हॉलीवूडमध्ये प्रचलित झाला तर आश्चर्य वाटणार नाही इतका.
हे कळीचे मुद्दे पाहिले, तर या चित्रपटाचं नावीन्य काय आहे, ते अचूक ध्यानात येईल. कथानायक आहे हॅरी लॅन्गर (जॅक निकोल्सन) या त्रेसष्ट वर्षांच्या तरुणाची प्रसिद्धी आहे ती केवळ तरुण मुलींबरोबर फिरण्यासाठीची. आपल्या मुलीच्या वयाच्या मॅरीन बेटी (अमान्डा पीट) बरोबर तिच्या बीच हाऊसवर गेला असताना हॅरीची अपघातानेच तिच्या आईशी, एरिका (डायन किटन)शी भेट होते. सुरुवातीली विळ्या-भोपळ्याचं सख्य असलेल्या हॅरी आणि एरिकाला जवळ येण्यासाठी कारणीभूत ठरतो तो हॅरीला भलत्या वेळी आलेला हार्ट अॅटॅक. शहरात लगेच हलवणं शक्य नसल्यानं शुश्रुषेची जबाबदारी येऊन पडते ती एरिकावर. पुढे काय होणार हे प्रेक्षकांना माहिती असलं तरी हॅरी अन् एरिकाला उमजायला अर्थातच खूप वेळ लागतो.पटकथेच्या लांबीबरोबरच चित्रपटाचा दुसरा प्रॉब्लम आहे तो म्हणजे पहिल्या भागातली घटनांची घाई अन दुस-या भागातलं रेंगाळणं. कदाचित या प्रसंगांची पुनर्रचना अधिक ठरली असती. असो.
तर मुद्दा हा की हॉलीवूडच्या रोमॅन्टिक कॉमेड्या गेली अनेक वर्षे जैसे थे आहेत, अन् त्यामध्ये येणारं वेगळेपण हे त्याला दिग्दर्शकाने अन् लेखकाने आपल्या सर्जनशीलतेनुसार आणलेलं आहे. जुन्या रचनेतला ताजेपणा आणण्याचं हे गणीत हल्ली आपल्याकडेही ब-यापैकी जमायला लागलं आहे. हल्लीचे चित्रपट पाहता ही मंडळी आपल्या परदेशी बंधूभगिनींप्रमाणेच आपल्या धंद्याला फेसलिफ्ट देण्यात पारंगत होताना दिसत आहेत. सो फार सो गुड!
-गणेश मतकरी.

14 comments:
This article is first published in Saptahik Sakal. I have it in my file.
I haven't seen the movie.
हॅरी मिट्स सॅली पाहिला आहे आणि तो खूप आवडला . जेंव्हा पहायला गेलो, तेंव्हा हम तूम ह्या सिनेमावर बेतलेला आहे असे ऐकले होते. पण फक्त चित्रपटाची थीम घेतली आहे हमतूम मधे.
दुसरा `समथिंग्ज गॉट्टा गिव्ह` अद्याप पाहिलेला नाही .. पण तुम्ही केलेलं परिक्षण वाचलं, आता डाउनलोड करतो आजच!
he parikshan sakal madhe yevun geley....tyanantar me dept of physics,unipune la astana aamchya movieclub madhe ha cinema me screened kela hota...sagalyana khup aavadala hota...as u say dialogs are immortal..khup enjoy kela sarvani ha cinema...somthing gotta give suddha khup chan aahe..
I liked HMS,but hated gotta give because of Keaton's performance.She was really awesome and nearly overshadowed Nicholson,whose I am really a hardcore fan.
BTW for me best romantic is Roman Holiday,which one is yours?
HMS मधला तो रेस्टॉरंट मधला सीन जबरदस्त आहे.. माझा सगळ्यात फेव्हरेट !! जबरदस्त acting केली आहे मेगने. :)
That scene was filmed at Katz's Deli, an actual restaurant on New York's E. Houston Street. The table at which the scene was filmed now has a plaque on it that reads, "Congratulations! You're sitting where Harry met Sally."
Pratham khup chan vatala vachun. Apalya ethe kiti cinemachya shootingscha aadar kela jato?
thanks everyone.
vivek and sumya, lot of articles here were published in saptahik sakal. some were published in mahanagar. recently ,i have stopped the sakal column ,and write some fresh articles for the blog.
mahendra ,hum tum owes a lot more to richard linklater's 'before sunrise' and 'before sunset', than 'when harry met sally' . these two films r milestones in rom coms and are totally unmissable.usually romcoms are likeable even when they r not as brilliant as whms. eg 'sleepless in seattle' , 'you've got mail' or 'french kiss' r other 3 meg ryan specials which r quite good. u've got mail is a remake of 'shop around the corner' which is also very recommendable. and i had reasonably liked bollywood version of french kiss, pyar to honahi tha.
Its nice to see u writing about ROMCOM for a change( after lots of dark kinds)I loved both the films with their candy floss romance and hard hitting facts( along with many glitches).you aptly pointed out the way formulas are dealt with in our and their films.They tend to respect even formula lover audience's intelligence.which allows to bend the formula a little and make it anew.
expect another article on a dark film soon. i have just written one on a jennifer lynch film 'surveillance'
I am too happy to find this blog! Thanks to facebook.Now , I will be able to read Ganesh's old articles in Sakal too!
vandana, u r most welcome.
Good article, but it at all I had to select a movie with WHMS - I would have gone for 'As Good As It Gets' - but then again it's a personal preference.

Post a Comment