फिन्चर,फेसबूक आणि सोशल नेटवर्क
>> Sunday, October 31, 2010
मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनानंतरच्या पार्टीत मी पोचलो तेव्हा रात्रीचे अकरा वाजून गेले होते. अर्थात पार्टीदेखील उशिराच सुरू झाली होती. डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘सोशल नेटवर्क’ चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर. चित्रपट आवडला असल्याने त्याविषयी बोलावंसं वाटत होतं, पण ओळखीचे चेहरे दिसेनात. बरोबरची मित्रमंडळीही आजूबाजूच्या गर्दीत अदृश्य झालेली. अशा वेळी ओळखी करून घेणं किंवा चर्चा- संभाषणात सामील होणं ही कला आहे, जी मला अजिबात जमत नाही. साहजिकच मी एक कोपरा पकडला, फोन उचलला आणि फेसबुक उघडलं. चित्रपटाविषयीच एक छोटा दोन ओळींचा स्टेटस अपडेट टाकला, तेव्हा अकरा वाजून चोवीस मिनिटं झाली होती. त्यावर पहिली कमेन्ट पडली ती बरोबर एका मिनिटाने. एका परीने हीदेखील संभाषणाची सुरुवातच!
फेसबुकच्या या एका गोष्टीचीच मला गंमत वाटते. वरवर पाहायचं तर ते उघडच ‘सोशल नेटवर्किंग टूल’ आहे. एक्स्ट्रोव्हर्ट लोकांसाठी, अधिकाधिक मित्र जमवणाऱ्या, गप्पा मारण्याची हौस असणाऱ्यांना आपला गोतावळा वाढवण्यासाठी त्याचा चांगलाच उपयोग झालेला, होत असलेला दिसून येतो. मात्र त्याच वेळी गप्पात फार न गुंतणाऱ्या, आपल्या कोषात राहणाऱ्या लोकांसाठीही ते संवादाचा एक समांतर मार्ग खुला करतं. फेसबुकचं हे अंग लक्षात घेतलं की या संपर्काच्या साधनाचा निर्माता मार्क झकरबर्ग हे स्वत:च्याच अवकाशात रमणारं, एकलकोंडं व्यक्तिमत्त्व आहे, याचं आश्चर्य वाटणार नाही. निदान सोशल नेटवर्क चित्रपट तरी हेच सांगतो.
फिन्चरचा ‘सोशल नेटवर्क’ फेसबुकच्या जन्मकथेवर आधारित आहे, हे बहुधा सर्वानाच माहीत आहे. निदान इंटरनेटवर सततचा वावर असलेल्यांना तरी त्याची नक्कीच कल्पना आहे. ही जन्मकथा शंभर टक्के प्रामाणिक आहे का? तर नसावी. कारण मुळात चित्रकर्त्यांचाच ती तशी असल्याचा दावा नाही. बेन मेझरिकच्या ‘दि अॅक्सिडेन्टल बिलिअनेअर्स’ या पुस्तकाचा त्याला आधार जरूर आहे. पण स्वत: पटकथा लेखक आरोन सोरकिनच्या म्हणण्यानुसार त्याचा भर आहे तो कथा सांगण्यावर. सत्यासत्यतेशी त्याला देणंघेणं नाही.
मला स्वत:ला ‘सोशल नेटवर्क’बद्दल खूपच कुतूहल होतं, ते डेव्हिड फिन्चर या चित्रपटाशी संबंधित असल्याने. फिन्चरचा मी दुस-या चित्रपटापासून फॅन आहे. एलिअन मालिकेचा तिसरा भाग असलेल्या आपल्या पहिल्या चित्रपटात त्याला नवीन करण्यासारखं काही नव्हतं, अर्थातच तो केवळ ठीकठाक होता. पण सेवन (१९९५) या आपल्या दुसऱ्या चित्रपटापासून त्याने आपली एक निश्चित शैली चित्रपटांना दिली. फिन्चरचा दिग्दर्शनाकडे वळण्याआधीचा बराच काळ हा जॉर्ज ल्युकसच्या ‘इंडस्ट्रियल लाइट अॅण्ड मॅजिक’ या स्पेशल इफेक्ट कंपनीत अन् नंतर जाहिराती, म्युझिक व्हिडीओ बनवण्यात गेला. साहजिकच प्रेक्षकांना गुंगवून सोडणारी शैलीदार दृश्यं अन् आशयात कमी-अधिक असूनही चमकदार लक्षवेधी प्रसंग, ही त्याच्या पहिल्या अनेक चित्रपटांची खासियत होती. सेवनमधल्या खुनांच्या दृश्यांसाठी वापरलेला मुन्श सारख्या चित्रकाराच्या रंगसंगतीचा प्रभाव, फाईट क्लबमधल्या प्रॉटॅगॉनिस्टच्या (एडवर्ड नॉर्टन) खोलीचं फर्निचर कॅटलॉगमध्ये होणारं रूपांतर. द गेमच्या अखेरीला निकोलस व्हॉन आर्टनने (मायकेल डग्लस) इमारतीच्या गच्चीतून घेतलेली जिवघेणी उडी, पॅनिक रूममधल्या बंदिस्त जागांना न जुमानणारा फिरता कॅमेरा अशा अनेक गोष्टी फिन्चरचं नाव घेताच डोळ्यासमोर उभ्या राहतात. फिन्चरच्या फिल्म्स कायम गडद- घुसमटवणा-या वातावरणात घडतात. एक प्रकारचा सोशल क्लॉस्ट्रोफोबिया त्याच्या चित्रपटांना व्यापून टाकताना दिसतो.
२००७ च्या ‘झोडिअॅक’मध्ये फिन्चरने एक वेगळं वळण घेतलं, ज्या वळणाशी ‘सोशल नेटवर्क’देखील संबंधित असावा असं वाटतं. (या सगळ्यात, त्याचा क्युरिअस केस आँफ बेंजामिन बटन कुठे बसत नाही. आँस्कर वैगैरे ठीक आहे, पण फिन्चरच्या त्यातल्या त्यात सामान्य चित्रपटातला तो असल्याने आपण सध्या त्याच्याकडे दुर्लक्ष करू) तर ‘झोडिअॅक’मध्ये त्याने आपल्या शैलीतल्या दृश्य चमत्कृतीला बाजूला काढून एक सरळ कथानक मांडायचा प्रयत्न केला. कथानक होतं ते एका सीरिअल किलरच्या प्रत्यक्ष कारवायांचा आधार घेणारं, मात्र त्याचा फोकस हा गुन्हेगार नसून, तो कोण होता हा छडा लावायचा प्रयत्न करणा-या अन् त्यासाठी आय़ुष्य वेचणा-या, एका कार्टुनिस्टवर होता. एका विशिष्ट काळाची, त्यादरम्यानच्या अमेरिकन संस्कृतीची नोंद ठेवण्याचा प्रयत्न होता. तेव्हा गु्न्हेगारी, पत्रकारिता, सामाजिक घाडामोडी, बदलतं जीवनमान यांचा हा रेकॉर्ड होता. एका परीने इतिहासंच, पण शंभर टक्के खरा असल्याचा पुरावा नसणारा.
‘सोशल नेटवर्क’ ही देखील एक पुरावा नसणारी, पण एका सामाजिक बदलाची तपशीलवार घेतलेली नोंदच आहे. चित्रपट सुरू होतो तो हार्वर्ड युनिव्हर्सिटीतल्या एका गजबजलेल्या कॅफेमध्ये कोणत्याही प्रस्तावनेशिवाय एका संभाषणाच्या मध्यावर. सुरुवातीचा कोलंबिया पिक्चर्सचा लोगो ही चित्रपटाची सुरुवात असल्याची एकमेव खूण. हा पहिला प्रसंग अन् त्याला जोडून येणारे काही प्रसंग, हा सोशल नेटवर्कचा सेटअप आहे. अनेक बाबतीत तो यातल्या दृश्य- ध्वनियोजनांबद्दल आपल्याला काही निश्चित सांगतो, आपल्या काळाची पुरती ओळख असणाऱ्या संवादांमधून यातल्या व्यक्तिरेखा झटपट उभ्या करतो, अन् प्रत्यक्षात फेसबुकच्या जन्माकडे निर्देश करणाऱ्या घटनांमधून आशयालाही मार्गी लावतो.
तर कॅफेतल्या प्रचंड गर्दीत अन् गोंगाटात आपल्यापुरत्या महत्त्वाच्या असतात त्या दोन व्यक्तिरेखा- मार्क झकरबर्ग (जेस आयझेनबर्ग) आणि एरिका ऑलब्राइट (रुनी मारा). संवाद ऐकायला थोडे कठीण. प्रत्यक्ष त्या कॅफेत शेजारच्या टेबलवर बसल्यासारखाच इतर गोंगाटही आपल्याला त्रासदायक होण्याइतका मोठय़ाने ऐकू येतो. मग आपण थोडे हुशारून बसतो. ऐकण्याचा प्रयत्न करायला लागतो. इथे आपल्या पटकन लक्षात येतं की मार्क अतिशय हुशार आहे. त्याच्या क्षेत्रात तो नक्कीच कोणीतरी मोठा होणार. मात्र, त्याला ‘टॅक्ट’ नावाचा प्रकार नाही. त्याच्यासमोर बसलेल्या मैत्रिणीकडे अन् आपल्या तिच्या नात्याकडे तो पूर्णपणे तर्कशुद्ध त्रयस्थ नजरेने पाहतो. साहजिकच तो स्वत:पुढे कोणालाच महत्त्व देत नसल्याचं एरिकाच्या ताबडतोब लक्षात येतं अन् एरिका निघून जाते. मार्क आपल्या खोलीवर जातो आणि एदुआर्दो (अॅण्ड्र गारफिल्ड) या आपल्या मित्राच्या मदतीने हार्वर्डच्या बऱ्याच मुलींचा एकत्रितपणे अपमान होईल अशी ‘फेसमॅश’ नावाची वेबसाइट तयार करतो. त्याआधी ब्लॉग लिहिताना तो पुन्हा एकदा एरिकाचा अपमान करायला विसरत नाही.
फेसमॅश हार्वर्डचा इंटरनेट ट्रॅफिक एवढा वाढवतं, की सव्र्हर कोलमडतो. बीअरच्या बाटल्याच्या बाटल्या रिचवून मार्कने केलेल्या या पराक्रमाने जुळे भाऊ कॅमेरोन आणि टायलर विन्कलवॉस (आर्मी हॅमर) आणि त्यांचा मित्र दिव्या नरेन्द्र प्रभावित होतात. आणि आपल्या डोक्यातली सोशल नेटवर्किंगची कल्पना घेऊन मार्ककडे जातात. मार्क त्यावर काम करण्याचे मान्य करतो, पण आता त्याच्या डोक्यात वेगळंच काही घोळत असतं.
विन्कलवॉस बंधूंची कल्पनाच मार्कला फेसबुककडे घेऊन जाते का? आणि जात असल्यास या तशा जुन्याच कल्पनेसाठी फेसबुकच्या जन्माचं किती श्रेय या मंडळींकडे जावं, हा चर्चेचा विषय आहे. मात्र मार्क आणि एदुआर्दो फेसबुक मार्गाला लावतात हे खरं. पुढल्या थोडय़ाच काळात मार्क बिलिअनेअर झालेला असतो. अन् एक सोडून दोन खटल्यांना तोंड देत असतो. पहिला असतो विन्कलवॉस बंधूंनी आपल्या कल्पनेच्या चोरीसाठी केलेला, तर दुसरा- एदुआर्दोने फसवणुकीसाठी.
‘सोशल नेटवर्क’ची रचना म्हटली तर साधी सरळ आहे. एका क्रमाने घटना सांगणारी. मात्र वेळोवेळी कथानक काळाचं बंधन तोडतं अन् विन्कलवॉस- एदुआर्दो यांच्या खटल्यादरम्यान चाललेल्या साक्षीपुराव्यांमध्ये शिरतं. या साक्षीपुराव्यांदरम्यान होणारी चर्चा ही आपल्याला आधी घडत गेलेल्या घटनांकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन देते, एक संदर्भ देते.
मार्क आणि शॉन पार्कर (जस्टीन टिम्बरलेक) यांची पहिली भेट चित्रपट कशी दाखवतो, हे या रचनेचं प्रातिनिधिक उदाहरण म्हणून पाहण्यासारखं आहे. शॉन हा ‘नॅपस्टर’च्या कर्त्यांपैकी एक होता, पण मार्कशी भेट झाल्यानंतर तो फेसबुकमध्येही सामील झाला, एदुआर्दोला त्याच्या नकळत बाजूला करून. एदुआर्दो खटल्यादरम्यान सांगतो, की शॉनचा इरादा नेक नसल्याची कल्पना आपल्याला या पहिल्या भेटीदरम्यानच आली होती. काही वर्षांच्या अंतराने घडणाऱ्या प्रत्यक्ष भेट आणि खटला या दोन प्रसंगांतलं चित्रपटांचं मागे-पुढे करणं हे पाहण्यासारखं आहे. इथला संगीताचा किंवा शॉनच्या बॉडी लॅंग्वेजचा वापर, शॉनचा युक्तिवादातला कळीचा शब्द (ए बिलिअन) खटल्यादरम्यान एदुआर्दोच्या तोंडी देणं, एदुआर्दोच्या प्रस्तावनेनंतर शॉनने वेबसाईटच्या नावात सुचवलेला बदल या सगळ्याचा एकत्रित परिणाम हा संकल्पनेच्या पातळीवरच्या कोरिओग्राफीप्रमाणे आहे. या प्रकारची रचना चित्रपटात प्रत्यक्ष नसलेल्या अॅक्शनची जाणीव देते. त्याला वेग देते.
‘सोशल नेटवर्क’च्या संवादांचा मी मघा उल्लेख केला, पण ते नुसते चलाख आहेत असं मला म्हणायचं नाही. खास करून मार्कचं व्यक्तिमत्त्व उभं करण्यात त्यांचा महत्त्वाचा हात आहे. मार्क (खऱ्याबद्दल माहीत नाही, पण निदान पडद्यावरला) हा इमोशनली चॅलेंज्ड आहे. तो सगळ्या गोष्टी तर्कावर तोलून पाहतो. बराचसा वेळ कामात घालवतो. मित्रांशीही मोजकं बोलतो. एरिकाबरोबरच्या भांडणानंतरचा त्याचा उद्रेकदेखील शब्दात कमी व्यक्त होतो, तर कृती, ब्लॉगिंग आणि व्हॉइस ओव्हरमध्ये येणाऱ्या, मनातल्या विचारांच्या भरधाव सुटण्यातून दिसतो. हे सगळं संवादातून स्पष्ट होतं. ब्लॉगिंग किंवा मनातल्या विचारांचं मोकाट सुटणं हे व्हॉइस ओव्हरच्या गतीत दिसतं. त्याच्या वाक्यांची रचना ही बऱ्याच प्रमाणात युक्तिवादासारखी असते. तो बऱ्याचदा गप्प राहतो. बोलला तर समोरच्याच्या भावना समजण्यापेक्षा त्याचं बोलणं शब्दश: घेऊन त्यावर उत्तर देतो. या प्रकारचे संवाद हे प्रेक्षकांचं मत त्याच्याविषयी प्रतिकूल करण्याची शक्यता नक्कीच होती. ते इथे करत नाहीत. कारण ते मार्कच्या व्यक्तिमत्त्वाबरोबर चपखल बसतात.
‘सोशल नेटवर्क’ फेसबुकविषयी अनेक गोष्टी (अगदी ‘एव्हरीथिंग यू ऑल्वेज वॉन्टेड टु नो, बट अफ्रेड टु आस्क’ छापाच्या) सांगतो, मात्र त्या फेसबुक काय आहे याचं स्पष्टीकरण देण्यासाठी नव्हे. यातली माहिती ही नकळत आलेली आहे, यातल्या व्यक्तिरेखांच्या विचारधारेला समजण्याचा एक प्रयत्न असल्यासारखी ती संवादात उतरलेली आहे. पण मला विचाराल तर ‘फेसबुक’ यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असूनही, हा फेसबुकविषयीचा चित्रपट नाही. तो एका पिढीविषयीचा चित्रपट आहे. आजच्या काळातले नवे उद्योग, नवी साहसं, नवे नायक पडद्यावर आणणारा. हिचकॉकच्याच भाषेत सांगायचं, तर फेसबुक हा ‘मॅकगफिन’ आहे. तो घटनांना पुढे नेतो, पण प्रत्यक्षात त्याचं असणं-नसणं त्यापलीकडे फार महत्त्वाचं नाही. एका संपूर्ण पिढीत असणारा संवाद-विसंवाद आणि त्याचं आजच्या घडीचं रूप दाखवणारं हे एक निमित्त आहे.
असं म्हणतात की, स्वत: झकरबर्गला हा चित्रपट, किंबहुना तो बनवलं जाणंच रुचलेलं नाही. ‘आय जस्ट विश्ड दॅट नोबडी मेड ए मूव्ही ऑफ मी व्हाइल आय वॉज स्टिल अलाइव्ह’, असं त्याने हल्लीच एका मुलाखतीत सांगितलं. पण खरं तर त्याला काळजीचं कारण नाही. चित्रपट त्याच्यावर टीका करत नाही. उलट तो त्याला आपलं म्हणतो. सर्व गुणदोषांसह आपल्या अॅन्टी-सोशल नायकाला उचलून धरणारा ‘सोशल नेटवर्क’ हॉलीवूड व्यक्तिचित्रणात काही नवे पायंडे पाडणारा ठरला, तर मला आश्चर्य वाटणार नाही.
-गणेश मतकरी.
(लोकसत्तामधून- जागेअभावी
राहिलेल्या भागासह.)

7 comments:
अप्रतिम !! इथे रिलीज झाल्यापासून बघायचा होता. योग येत नाहीये काही ना काही कारणाने. आता लवकरात लवकर बघतोच..
Again a nicely developed lead character...I find it a bit similiar to the zodiac cartoonist.
Thanks heramb.
CG, that's probably because both characters r obsessed in their own quest and don't care much about anyone else thinks.
respected sir
by reading your article.now i am going to download the picture.your words are magical like always.
intacto bhagitala best vatala ... ajun last nt house of nine navacha film bhaghitala ...te pan bhari aahe jararur bhgha ... best thrillar movie aahe ti... and plz wrt about sm thing on roman polanski
thank you
As you have mentioned the back and forth style of storytelling used in this film is certainly appreciable. It creates that desired conflict and speed and results in grabbing the audience’s attention. I liked this exaggerated the anticipation while watching the film.
आज बघितला.. प्रचंड प्रचंड आवडला.. तुम्ही लिहिलेल्या एकूण एक वाक्याचा प्रत्यय आला.. प्रसंगांची गुंफण, पुढे मागे नेणं आणि यातून कथा उलगडणं हे अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. जुन्या प्रसंगात एदुआर्दोला "सही करण्यासाठी पेन हवंय का?" असं वकील विचारतो आणि एकदम नवीन प्रसंगातली वकील "सही केलीस का?" अशा अर्थाचं विचारते.. तो संपूर्ण प्रसंग आणि एकूणच अनेक प्रसंगांची वीण अप्रतिम जमली आहे !!
Post a Comment