डाॅन जाॅन- प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर ?
>> Sunday, October 27, 2013
जोसेफ गाॅर्डन-लेविट सुरूवातीपासूनच माझ्या आवडत्या नटांपैकी आहे. तो प्रथम प्रमुख भूमिकेत दिसला तो हाय स्कूल मधे घडणार््या फिल्म न्वार वळणाच्या 'ब्रिक' चित्रपटात, आणि त्यानंतर कायमच त्याने लक्षात राहाण्यासारखे चित्रपट केले आहेत. आपल्याकडे त्याचा 'लूपर' आला होता की नाही हे मला आठवत नाही, पण क्रिस्टफर नोलनच्या चाहत्यांना त्याच्या 'इन्सेप्शन' आणि ' द डार्क नाईट राइजेस' मधल्या भूमिका नक्की आठवत असतील. डाॅन जाॅन हा गाॅर्डन-लेविटचा पहिला दिग्दर्शकीय प्रयत्न. एका अवघड, प्रेक्षकांना परिचित पण काहीसा अनकम्फर्टेबल करणार््या विषयावरला, पण स्टायलिश आणि गंमतीदार कथनशैली असणारा. इथलं लेखनही त्याचच आहे.
मॅकक्वीनच्या २०११ मधे आलेल्या चित्रपटात ' शेम' चित्रपटात आधुनिक समाजातलं सेक्स अॅडिक्शन प्रभावीपणे आणि खूपच गांभीर्याने आलं होतं. त्याच्या आणि डाॅन जाॅनच्या दृष्टीकोनात आणि प्रवृत्तीत काही महत्वाचे फरक आहेत.एक म्हणजे डाॅन जाॅनमधलं व्यसन हे केवळ इन्टरनेट पाॅर्नचं आहे. त्याचे पडसाद त्यातल्या नायकाच्या एकूण व्यक्तिमत्वावर आणि आयुष्यावर जरुर आहेत, मात्र ते हे आयुष्य डिरेल करण्याएवढे प्रत्यक्ष दिसणारे आणि सर्वव्यापी नाहीत. दुसरं म्हणजे यातल्या पोर्नोग्रफीकडे काहीसं सूचकपणे पाहाणं शक्य आहे. ती केवळ समस्येसारखी रंगवली जात नाही तर नायकाच्या डोळ्यापुढलं ते आदर्श चित्र ठरतं. आदर्श, पण कधीच प्रत्यक्षात न उतरु शकणारं. वास्तव आणि अपेक्षा किंवा सत्य आणि स्वप्न यासारखी या घटकाची मांडणी होते. त्याखेरीज पाॅर्न हे कन्झ्यूमरीस्ट संस्कृतीचं प्रतीकही ठरतं. वास्तवाहून चांगलं काही मिळण्याचा सामान्यांसमोर उभा केला जाणारा आभास इथे पाॅर्नच्या रुपात आपल्याला दिसतो. आणि सरतेशेवटी, या सार््या त्यामानाने गंभीर गोष्टी बाजूला ठेवल्या तर आणखी एक गोष्ट समोर येते, आणि ती म्हणजे यात केलेलं रोमँटी काॅमेडी या चित्रप्रकाराचं विडंबन .
चित्रपटाचा नायक आहे जाॅन मार्टेलो , अर्थात डाॅन जाॅन ( गाॅर्डन- लेविट). या विशिष्ट नावावरुन असंख्य स्त्रियांना फशी पाडणारा कल्पित प्रेमिक डाॅन वाॅन ची आठवण होणं स्वाभाविकच आहे. किंबहूना तो योगायोगही नाही. हे साम्य इन्टेन्शनल आहे.
जाॅन अल्पसंतुष्ट आहे. आयुष्यात त्याला फार मोजक्या गोष्टी हव्या वाटतात. त्याचं राहातं, घर, गाडी, त्याचे खास मित्र वगैरे. मात्र या यादीत शेवटचा क्रमांक हा पाॅर्नचा आहे. डाॅन तसा साधासा आहे, दिसायला बरा आहे, शरीरयष्टी कमावलेली आहे, देव मानतो. त्याला त्याच्याशी मैत्री करण्याची इच्छा असलेल्या अनेक मुली मिळतात. मात्र त्याच्यासाठी ' प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर' आहे. पाॅर्नमधून त्याला जे समाधान मिळतं, ते प्रत्यक्ष मुलीबरोबरही मिळत नाही असा त्याचा दावा आहे. त्यामुळे रात्री सोबत मैत्रीण असो वा नसो, शैय्यासोबत होवो वा न होवो, नंतर इन्टरनेट पाॅर्न मात्र हवंच.
अशातच त्याला एक मुलगी आवडते. तिचं नाव बार्बरा शुगरमन( स्कार्लेट जोहॅन्सन) . शुगरमन स्वतःवर फार खूष असणारी लाडिक मुलगी आहे. तिला मित्र हवाय तो पूर्णपणे नियंत्रित करता येणारा. एकदा ती जाॅनला पाॅर्नसोबत पकडते पण तो काहीतरी थापा मारुन वेळ मारुन नेतो. बार्बराच्या प्रेमाबिमाच्या कल्पना फारच तथाकथित रोमँटिक असतात आणि त्यांच्याशी जमवून घेता घेता जाॅनच्या नाकी नऊ येतात. अशातच त्याची गाठ पडते ती त्याच्याहून वयाने मोठ्या आणि काहीशा विक्षिप्त, कधी उत्साही कधी डिप्रेस्ड असणार््या इस्थरशी ( जुलिअॅन मूर) आणि गोष्टि हळूहळू बदलायला लागतात.
जाॅनची पाेर्नोग्रफीची आवड ही आजच्या काळातली एक मोठी समस्या आहे, पण इथलं तिचं चित्रण हे जाॅनचा वास्तवाबरोबरचा डिस्कनेक्ट स्पष्ट करण्यासाठी होतं. प्रेम हे त्याच्यासाठी बिनमतलबाचं होतं कारण तो पडद्यावरल्या कल्पनांमागे धावून प्रत्यक्ष व्यक्तीला कायम दुय्यम लेखतो. त्याची वरवरची नाॅर्मल्सी ही त्याच्या या कोषात राहण्याशी विरोधाभास म्हणून उभी केली जाते.
डाॅन जाॅनची रचना , त्याचा मूलभूत आराखडा हा रोमँटीक काॅमेडीचा आहे. तो घेतो ते प्रमुख टप्पे या चित्रप्रकारात नित्य आढळणारे. जाॅन आणि बार्बरा यांची गाठ पडणं ,मैत्री, दुरावा, पुनर्भेट अशी सारी सांकेतिक राॅमकाॅमची वळणं तो घेतो पण त्या वळणांच्या आणि पात्रांच्याही उथळपणावर टिका करत. ही टिका खूप टोकेरी होते जेव्हा ती बार्बराच्या प्रेमाच्या कल्पनांवर येऊन ठेपते. बार्बराचं प्रेमाच्या वरवर सुंदर कल्पनांवर, प्रेमाचा उदात्तपणा दाखवणार््या चित्रपटांवर आणि एकूणच या संकल्पनेवर इतकं प्रेम ( ! ) आहे की ती प्रत्यक्षातही ते तसंच असायला हवं असं मानते. डाॅन जाॅन या खोटी स्वप्न दाखवणार््या चित्रपटांची एका परीने पाेर्नाेग्रफीशी तुलना करतो आणि दोन्ही गोष्टी तितक्याच अवास्तव ,खोट्या असल्याचा युक्तीवाद करतो. प्रेमाची बेगडी स्वप्न पाहाणारी बार्बरा आणि शरीरसंबंधांच्या वेधक चित्रणात रमलेला जाॅन या दोघांचाही वास्तवाशी संबंध तितकाच तुटलेला असल्याचं चित्रपट सांगतो.
चित्रपटाच्या सादरीकरणातल्या दिग्दर्शकीय क्लुप्त्या आणि एकूण कथनशैली एका शब्दात सांगायची तर 'स्मार्ट' आहे. सुरुवातीलाच चित्रपट जाॅनच्या विश्वाचा एक फाॅरमॅट तयार करतो. त्याला आवडणार््या वस्तूंची यादी, त्याची चर्चला भेट आणि कन्फेशन , पालकांबरोबरचा संवाद, मित्रांबरोबरचा टपोरीपणा आणि अर्थातच पाॅर्न पाहाण्याचा कार्यक्रम. (हा भाग सेन्साॅर करणं हा बावळटपणा ठरेल. त्यामुळे चित्रपट आपल्याकडे येण्याची खात्री नाही हे ओघानच आलं. ही दृश्य सोडता, चित्रपट तसा आपल्या पारंपारिक ( ! ) कल्पनांप्रमाणे स्वच्छ आहे) . हे जाॅनचं विश्व त्यात कथापरत्वे होणार््या बदलांसह विविध रुपात पुन्हा पुन्हा आपल्यापुढे येत राहातं. पालकांबरोबरचे संवाद आणि चर्चचा भाग हा खूप विनोदी ठरतो, तो स्टिरीओटाईप्सच्या वापरामधून, आणि कथा पुढे नेण्यासाठीही या भागाचीच मदत होते.
मला व्यक्तिशः यातला पलायनवादी व्यावसायिक चित्रपटांच्या पाेर्नोग्रफीशी केलेल्या तुलनेचा भाग खूप आवडला. आपल्याला गाफिल, स्वप्नवत जगात ठेवून आपल्या भवतालचं वास्तव विसरायला लावणार््या चित्रपटांना दुसरं काय म्हणावं? आपल्याकडेही या शाखेत काम करणारी मंडळी काही कमी नाहीत. ही उघड पोर्नोग्रफी आपल्या संस्कृतीरक्षकांच्या , सेन्साॅर बोर्डाच्या आणि सर्जन जनरलांच्या नजरेतून सुटते आणि ते भलत्याच चित्रपटांकडे डोळ्यात तेल घालून पाहायला लागतात, आणि मग नको तिथे आक्षेप घेत सुटतात. या चित्रपटावर तो घेण्याचा प्रयत्न होईल हे निश्चित. असो, हा आपला कायमचाच प्रश्न आहे.
- गणेश मतकरी.

2 comments:
जोसेफ गॉर्डन-लेविट माझाही अतिशय आवडता आहे. शेवटचा परिच्छेद अतिशय आवडला. लवकरच बघतो.
Looper (Hyped Movie) was there in theatres in India as well as available on Blu Ray and DVD too !
Post a Comment