`युनायटेड ९३` - प्रवासी आणि दहशतवादी
>> Sunday, September 11, 2011
२००५ पर्यंतचे अमेरिकन चित्रपट पाहिले, तर कोणत्याच चित्रपटात ९/११ला प्रत्यक्ष स्थान मिळाल्याचं दिसत नाही. काही प्रयत्नांत असं घडण्यामागची कारणमीमांसा शोधून पाहण्याचा एक प्रयत्न दिसतो. वैचारिक पातळीवरून पाहणं हे एका परीने कठीण असलं तरी त्याचा फायदा आहे. सामान्य प्रेक्षकाला या घटनेची नवी आवृत्ती प्रत्यक्ष पाहायला लागत नाही आणि दिग्दर्शक जरी टीकेला कारण ठरण्याची शक्यता असली, तरी आर्थिकदृष्ट्या चित्रपटाला थेट धोका संभवत नाही. बहुधा याच कारणाने पहिली चार-पाच वर्षे हॉलीवूडने सावध राहणं पसंत केलं. आणि घटनेला फिक्शनालाईज करणं नाकारलं. मात्र आता बराच काळ उलटला होता. काल्पनिक हिंसाचार आणि दहशतवाद व्यावसायिक चित्रपटांमधे पुन्हा रुळायला लागला होता. थ्रिलर्सचं पुनरागमन झालं होतं आणि प्रेक्षक बिचकण्याची शक्यता कमी दिसायला लागली. असं असूनही २००६मधे `युनायटेड ९३`ची ट्रेलर जेव्हा पहिल्यांदा प्रेक्षकांना दाखविण्यात आली तेव्हा आलेली प्रतिक्रिया ही ब-याच प्रमाणात प्रतिकूल होती.
याला एक कारण हेदेखील म्हणता येईल की, प्रत्यक्ष `युनायटेड ९३` आणि त्याची ट्रेलर यांमधे बराच फरक आहे. खासकरून त्यांच्या दृष्टिकोनात. ट्रेलर ही अधिक सांकेतिक वळणाची कथासूत्र दाखवून नाट्यपूर्ण क्षणांना, संवादाच्या तुकड्यात अधोरेखित करून गतीचा आभास निर्माण करणारी आहे, एखाद्या अॅक्शन थ्रिलरची जाहिरात असावी तशी. प्रत्यक्ष चित्रपट मात्र तसा नाही.
दिग्दर्शक पॉल ग्रीनग्रासचा चित्रपट म्हणजे या प्रत्यक्ष घटनेतल्या एका उपघटनेचं जसंच्या तसं चित्रण आहे. ते महत्त्वाचं आहे. कारण या प्रकारे ही घटना चित्रपटात दाखविली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि इथे पाऊल चुकणं हे विषयाला संभाव्य विषयांच्या यादीतून काढून टाकण्याइतकंच घातक ठरण्याची शक्यता. त्यातून चित्रण अधिक अवघड आहे, ते ख-या घटनेची माहिती असूनही तिचा एकही साक्षीदार जिवंत नसल्याने. अकरा सप्टेंबरच्या सकाळी जी विमानं दहशवाद्यांनी अपहृत केली त्यातलंच एक होतं युनायटेड ९३. अपहरण केल्यावर ते वॉशिंग्टनच्या दिशेने पळविण्यात आलं आणि अंतिमतः ते कॅपिटॉल बिल्डिंगवर आदळण्याचा दहशतवाद्यांचा विचार असल्याचं मानलं जातं. मात्र, दरम्यानच्या काळात प्रवाशांना या योजनेचा सुगावा लागला आणि हे विमान सोडवण्याचा त्यांनी निकराचा प्रयत्न केला. विमानांची अखेर ते कोसळण्यातच झाली, मात्र शहरापासून दूर. प्रवाशांमधील एकही जण वाचू शकला नाही. चित्रपटाचा विषय बाहेर येताच त्याच्या दर्जाबद्दल अंदाज बांधण्याआधीच विरोध व्हायला सुरुवात झालेली होती. इथेही टेलिव्हीजनने आधी बाजी मारलेलीच होती, याच घटनेवर `फ्लाईट - 93` नावाचा चित्रपट बनवून. तरीही मोठ्या पडद्यावर इतक्या लवकर कशाला ? असा सूर उमटतच होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर मात्र तो विरला आणि एक विलक्षण चित्रपट म्हणून त्याचं समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनी स्वागत केलं.
हा माहितीपट नाही, कारण उघडच .या विमानात खरं काय घडलं ते पूर्णपणे सांगू शकणारं कोणीच आज अस्तित्वात नाही. मात्र पूर्णपणे माहीत नसूनही विमानातल्या घटनांचा एक वृत्तांत मात्र अस्तित्वात आहे, अन् तो म्हणजे प्रवाशांनी आपल्या नातेवाईकांना केलेले फोन कॉल्स. विमान कमी उंचीवरून उडत असल्याने हा संपर्क शक्य झाला होता आणि या फोन कॉल्समधूनच प्रवाशांना दहशतवाद्यांच्या योजनेचा अंदाज आला होता. त्यांच्या वक्तव्यावरून त्यांच्या मित्र, नातेवाईकांनाही विमानात चाललेल्या घटनांची बरीच कल्पना आली होती आणि अखेर विमानावर कब्जा करण्याचा प्रयत्न प्रवासी करणार असल्याचंही इथेच कळलं.
ग्रीनग्रास आणि त्याच्या चमूने अनेक तास या प्रवाशांच्या आप्तांबरोबर काढले, तपशीला जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या त्रयस्थपणे टीव्हीवर या हल्ल्याचं चित्रण झालं होतं त्याच त्रयस्थपणे या विमानाची गोष्टही सांगितली.
`युनायटेड ९३` बाजू घेत असता, तर भुवया उंचवण्यासारख्या अनेक जागा तयार झाल्या असत्या, ज्या इथे होत नाहीत. एका परीने तोही एखादा वृत्तान्त मांडत असल्याच्या थाटातच घटना उलगडत नेतो.
ग्रीनग्रास आपली गोष्ट ही प्रामुख्याने दोन पातळ्यांवर घडवितो. पहिली वेगवेगळ्या ठिकाणच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षांमधे आणि दुसरी प्रत्यक्ष विमानात. सहभागी व्यक्तिरेखांची तो ओळख करून देत नाही. म्हणजे फ्लॅशबॅकसारख्या तंत्राने या मंडळींची आयुष्य हृदयद्रावक करून दाखवत नाही, वा प्रवाशांमधल्या गप्पांमधूनही तथाकथित `ह्यूमन इंटरेस्ट` वाढवत नाही. आपल्याला खरोखरीच्या विमानात जशी सहप्रवाशांची होईल तितकीच जुजबी ओळख इथेही होते. हा दृष्टिकोन दिग्दर्शक सातत्याने पाळतो. घडलं त्यापलीकडे जायचं नाही, गरज नसलेले निष्कर्ष काढायचे नाहीत, शक्य तेवढा असलेल्या माहितीचा उपयोग करायचा, ही इथली त्रिसूत्री आहे.
`युनायटेड ९३`च्या पहिल्या अर्ध्या भागातला अधिक नाट्यपूर्ण भाग आहे, तो कंट्रोल रूममधला, जिथल्या अनेक व्यक्तिरेखा या प्रत्यक्ष त्या त्या अधिका-यांनीच वठविलेल्या आहेत. या अधिका-यांना एकेका अपहरणाची बातमी मिळत जाणं, वर्ल्ड ट्रे़ड सेंटरची अविश्वसनीय घटना कळणं आणि अखेर या कारस्थानाची पूर्ण कल्पना येऊन संपूर्ण हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला जाणं, या घटना खाली घडत असताना युनायटेड ९३ चा प्रवास मात्र सुरळीत सुरू असतो. तिथल्या घटना नाट्यपूर्ण होतात त्या अपहरणाबरोबर अन् मग पुढे अखेरपर्यंत तिथला तणाव टिकून राहतो. मात्र एक आहे, इथलं नाट्य हे कुठेही अतिनाट्य होणारं नाही, तर प्रत्यक्ष प्रसंगाच्या गांभीर्यानेच तयार होणारं आहे.
ज्याप्रमाणे ग्रीनग्रास प्रवाशांची अधिक ओळख करून देत नाही, त्याप्रमाणे दहशतवाद्यांचीही. तो `पॅरेडाईज नाऊ` या चित्रपटाप्रमाणे दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवित नसला, तरी इतर कमर्शियल हॉलीवूडपटांप्रमाणे त्यांचं दृष्ट राक्षस म्हणूनही चित्र रेखाटत नाही. चित्रपटाच्या सुरुवातीचा कुराणपठणाचा प्रसंग हा त्यांच्या धार्मिक बैठकीविषयी बोलत असला, तरी तोदेखील फार तपशीलात जात नाही. शिवाय दहशतवाद्यांचं कुराणपठणही कोणी प्रत्यक्षात पाहिलं नसलं, तरीही त्याच्या खरेखोटेपणाबद्दल शंका घ्यायला जागा नाही.
प्रवाशांच्या नातेवाईकांशी चर्चा करूनच केला असला, तरीही प्रत्यक्ष चित्रपटातही ही दृश्य पाहणं या सर्वांना खूप मनस्ताप देणारं झालं असेल, यात शंकाच नाही आणि केवळ या एका विमानातल्या प्रवाशांनाच का, या दिवशी जे जे लोक मृत्युमुखी पडले, त्या सर्वांच्या आप्तांना, तसंच वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून सुखरूप वाचलेल्यांना देखील हा चित्रपट एखादं दुःस्वप्न पाहत असल्यासाऱखा जरूर भासला असेल,. तरीही वाटतं, की ही निर्मिती गरजेची होती, ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेची संपूर्ण नोंद होण्याच्या दृष्टीनेही आणि बिकट परिस्थितीत सामान्य माणसंही कशी धैर्याने उभी राहू शकतात अन् प्रसंगी प्राणाचाही त्याग करून इतरांना वाचवू शकतात याचा जिवंत पुरावा म्हणूनही.
चित्रपटात अध्याहृत नसला तरी एक प्रश्न पडण्यासारखा आहे. जे दहशतवादी जिवावर उदार होऊन ही कामगिरी करायला निघाले, त्यांच्याकडे समाज हा खलपुरूषांप्रमाणे पाहतो, तर त्यांच्याचप्रमाणे जिवावर उदार होऊन त्यांना थांबविणा-या व्यक्ती या नायक कशा ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर आपण सरहद्दीच्या कोणत्या बाजूने त्याच्याकडे पाहतो यावरही अवलंबून आहे. त्या दृष्टीनेही `युनायटेड ९३`मधलं प्रवासी आणि दहशतवादी यांचं एकसारखं केलेलं चित्रण हे न्याय्य आहे.
- गणेश मतकरी
(नुकत्याच प्रकाशित झालेल्या `सिनेमॅटिक` या पुस्तकामधील एका लेखाचा भाग.)

11 comments:
sunday mahantal ki tumachya lekhachi waat baghane nehamichach jalay ...kharch anek navin vishayavarche chitrapat tya mule baghanyat ale ani tumachya lekhamule movie jast samjali suddha ..bhari jalay likhan puhna ekada
प्रचंड सुंदर लेख... सिनेमाही तितकाच भावला होता..
मस्त..मुव्ही आवडला होता :)
Thanks Lalit , Anand ani Suhas
अमेरिकेने दुसर्या महायुद्धात जपानवर हिरोशिमा आणि नागासकी येथे अणुबॉम्बने हल्ला केला होता त्यात अनेक सर्वसामान्य नागरिक ठार झाले होते. अमेरिकेने व्हिएतनाम विरुद्ध पुकारलेल्या युद्धामुळे व्हिएतनामी जनतेचे बरेच हाल झाले होते.
असे असुनही अमेरिका मानवता हित वादी म्हणून स्वत:ला मिरवून घेते. अमेरिकेला आव्हान देणारा ओसामा बिन लादेन मात्र दहशतवादी ठरतो.
Chetan, there is a fine line between war and terrorism and we can't exactly equate it. But on a basic level , the point is valid and similar to one on which my article concludes.
क्लासच होता हा चित्रपट ! खिळवुन ठेवणारा म्हणतात ना तसा..
लेखाबद्दल मन:पूर्वक आभार्स ! :)
पर्ल हार्बरवर जपानने केलेला हल्ला - दहशतवाद.
अमेरिकेने नागासाकी हिरोशिमावर केलेले अणुबॉम्ब वर्षाव- दहशतवाद.
ओसामाने अमेरिकेवर केलेला हला- दहशतवाद.
आपल्या देशात होणारे बॉम्बस्फोट - दहशतवाद.
"जे दहशतवादी जिवावर उदार होऊन ही कामगिरी करायला निघाले, त्यांच्याकडे समाज हा खलपुरूषांप्रमाणे पाहतो, तर त्यांच्याचप्रमाणे जिवावर उदार होऊन त्यांना थांबविणा-या व्यक्ती या नायक कशा ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर आपण सरहद्दीच्या कोणत्या बाजूने त्याच्याकडे पाहतो यावरही अवलंबून आहे."
हे तुमचे विधान मला अतिशय बेजबाबदारीचे वाटते. दहशतवाद हा मानवजातीसाठी हानीकारक असतो. त्यात सीमारेषा काय महत्त्वाची ? फक्त जीवावर उदार होऊन मी हे असे दुसऱ्या देशावर जाऊन भीषण हल्ले केले...मृत माणसांच्या संख्येचा भयावह आकडा हा मी, माझा व माझ्या विचारांचा विजय मानला...ह्याचा अर्थ मी फार मोठी देशसेवा केली असा अजिबात होत नाही. बेरोजगार, शिक्षणाची वानवा, धर्माच्या नावाखाली तरुणाईला भडकवणारे अतिशय चुकीचे नेतृत्व...ही व अशी कितीतरी कारणे आहेत ही भयंकर संकटे उभी रहाण्यामागे.
मी नेहेमी तुमचे लेख वाचत असते...परंतु, हे विधान मला त्रास देऊन गेले आणि म्हणून इथे मत मांडले.
Anagha, everyone has an opinion. Anyway ,terrorists are usually influenced by some thought process , though it may mot be universally accepted. What do u say to naxalite movement during our freedom fight?for the british ,this was their colony and anyone against was a terrorist ,but we call the freedom fighters our heroes. Terrorists are not always right or wrong and usually the people understanding the cause see them in a diffrent light. Dropping atom bombs, like chetan mentioned ,is an act of terror, but americans thought it was a necessary action to end the war. U can look at it from both points of view. I stand by my statement ,though i am sure u have a right to not agree.
Anagha ,i recommend 2 films . Syriana and Paradise Now. Syriana looks at the larger picture about the terrorism today and paradise now, gives the other perspective.
Do watch them.
तुम्हांला तुमचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. फक्त आपण आपली ह्या गंभीर बाबतीतील मते थोडी विचारपूर्वक मांडावयास हवीत इतकेच माझे म्हणणे.
दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला माणसाने आखलेल्या सीमारेषा काय 'कारण' देणार ? मानवजातीचा संहार हे अधिक मोठे भयावह चित्र आहे. जपानने पुष्पवर्षाव केला नव्हता. ही सर्व कृत्ये ही मानवजातीला लागलेले कलंक आहेत. सीमारेषेचा विचार करून हा 'दहशतवाद' आहे की नाही हा विचार होऊ शकत नाही. राजकीय व धार्मिक हेतू डोक्यात धरून, 'जशास तसे' हे धोरण चालवून, 'निष्पाप माणसांचा संहार' घडवून आणणे हा स्वातंत्र्य लढा ?
असो. :)
Post a Comment