प्रोमिथिअस - विज्ञान-भय-तत्वज्ञान-इत्यादी...

>> Monday, June 11, 2012



प्रीक्वल म्हणजे नक्की काय ? तर जे एखाद्या चित्रपटातल्या घटनाक्रमाच्या आधी घडणारी , त्याच्या कथानकाशी जोडलेली ,पण त्या चित्रपटात न सांगितलेली गोष्ट सांगेल. नवे दुवे जोडून मूळ चित्रपटाचं कथानक पूर्ण करेल. ’प्रोमिथिअस’ ,हे रिडली स्कॉटच्या अतिशय गाजलेल्या वैज्ञानिक भयपटाचं प्रीक्वल आहे किंवा नाही , हा प्रश्न मी टाळण्याचं कारण नाही, कारण ज्यांना या चित्रपटात पुरेसा रस आहे ,त्यांनी याविषयी आधीच माहिती करून घेतलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं , की ते प्रीक्वल आहेही आणि नाहीही. कथानक मागे उलगडण्यापुरतं बोलायचं, तर हे प्रीक्वल नाही. ना ते एलिअन मधल्या पात्रांविषयी काही सांगतं , ना ते त्यातल्या घटनांना जोड देतं. एलिअन मधे अन त्याच्या इतर भागात दिसणारा, दहशत पसरवणारा प्राणीदेखील इथे केवळ पाहुणा कलाकार म्हणून दिसतो. असं असूनही, थीमॅटिक पातळीवर त्याला प्रीक्वल मानायला काहीच हरकत नाही. एक तर ते घडतं तो स्थळकाळ ,हा एलिअन मधल्या घटनांशी काही बाबतीत जोडलेला आहे. छोट्याशा ग्रहावर उतरल्यावर एलिअन मधल्या नोस्ट्रोमो यानातल्या  तंत्रज्ञांना जे दिसतं, त्याला एक प्रकारे प्रोमिथिअस मधल्या घटना जबाबदार आहेत असंदेखील म्हणता येईल.त्याखेरीज रचनेत आणि व्यक्तिरेखांमधेदेखील एक प्रकारचं साम्य आहे. कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप असणारी आंतरग्रहीय कामगिरी, परग्रहवासीयांना कथेत येणारं महत्वाचं स्थान, नायिकाप्रधान मांडणी, महत्वाच्या पुरुष व्यक्तिरेखेचं मानव नसणं, विज्ञान आणि भय या दोन्ही घटकांचा वापर ( जरी एलिअन मधलं भयाचं पारडं जड होतं, तर इथे ते विज्ञानाचं आहे ) अशी अनेक साम्यस्थळं या दोन्ही ठिकाणी आपल्याला दिसतात.
’एलिअन’ची रचना हीच मुळात भयपटासारखी होती. एका बंदिस्त जागेत काहीतरी अमानवी अस्तित्व अवतरणं ,आणि या जागेत अडकलेल्या असहाय्य माणसांचा एकामागून एक बळी जाणं , या गोष्टीला त्यात महत्व होतं. मात्र इतर चार भयपटांप्रमाणे इथली जागा ही वस्तीपासून दूरवर रानात असणारं झपाटलेलं घर नव्हती तर ती होती एक अवकाशयान, नोस्ट्रोमो. ’प्रोमिथिअस’मधे स्कॉटने आपला अवाका सर्वच बाबतीत वाढवत नेला आहे. म्हणजे स्थळाच्या आकारापासून ,ते विषयाच्या व्याप्तीपर्यंत. प्रोमिथिअस हे या चित्रपटातलं मानवाचा निर्माता शोधण्याच्या मोहिमेवर निघालेल्या अवकाशयानाचं नाव ते धारण करणा-या ग्रीक दैवताच्या दंतकथांमुळे (ज्यात मानवाची निर्मिती आणि देवांकडून आग चोरून मानवजातीकडे देणं या दोन्ही गोष्टी अंतर्भूत आहेत आणि ज्ञानाचा ,विज्ञानाचा शोध अध्याऋत आहे) योग्य वाटणारं आहे मात्र या कथांच्या दुर्दैवी शेवटांमुळे ते कोणी या प्रकारच्या मोहिमेसाठी वापरेल असं वाटत नाही. (हे म्हणजे नव्या विमानकंपनीला इकॅरस नाव देण्याइतकंच शहाणपणाचं होइल). चित्रपटासाठी मात्र नाव चपखल आहे, काही प्रमाणात सूचक असलं तरीही.
तर एका विशिष्ट ग्रहसमूहाकडे निर्देश करणारे काही प्राचीन शीलालेख आणि केव्ह पेन्टिंग्ज पाहून आखलेली मोहीम घेउन प्रोमिथिअस हे यान त्या समूहातल्या एका उपग्रहापर्यंत पोचतं जो वरवर पाहाता बराच पृथ्वीसारखा आहे. मोहिमेचा उद्देश असतो तो मानवजातीच्या निर्मितीला कारणीभूत असणार््या परग्रहवासीयांची गाठ घेणं अन आपल्या अस्तित्वामागच्या रहस्याचा उलगडा करुन घेणं. मोहिमेचं नेतृत्व करणारे शास्त्रज्ञ असतात एलिझबेथ शॉ ( नूमी रापेस) आणि चार्ली हॉलोवे (लोगन मार्शल-ग्रीन). मोहिमेचे स्पॉन्सर असणा-या वेलन्ड कॉर्पोरेशनतर्फे हजर असलेल्या मेरेडिथचा (चार्लीज थेरॉन) यातल्या कशावरच विश्वास नसतो, मात्र वेलन्डचा मानसपुत्र असणारा अतिशय हुषार अँन्ड्रॉइड डेव्हिड 8 ( मायकेल फासबेन्डर) मात्र मोहिमेत हिरीरीने भाग घेतो. ग्रहावर उतरताच कुठल्यातरी प्रकारचं जीवन तिथे निदान कधीकाळी असल्याचे पुरावे लगेचच मिळायला लागतात.लवकरच मानवसदृश पण आकाराने मोठ्या प्राण्यांचे अवशेषदेखील सापडतात, पण जर हेच आपले निर्माते असले तर त्यातलं कोणीच आता जिवंत असल्याच्या खूणा दिसत नाहीत. आणि मग अचानक कोणाचंतरी अस्तित्व जाणवायला लागतं. हे जीव माणसासारखे बिलकूल नसतात आणि त्यांच्यापुढे माणसांचा टिकाव लागणही कठीण दिसायला लागतं.
प्रोमिथिअस ही बिग बजेट, थ्री-डी ,काहीशी जेनेरिक असूनही खूपच विचार करणारी आणि करायला लावणारी फिल्म आहे.तिचा विषय मानवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे आणि ती त्या विषयाला पुरेशा गंभीरपणे घेते. मानवजात कशी अस्तित्वात आली हे रिडली स्कॉट आणि त्याच्या लेखकांना माहीत असण्याची शक्यता नाही हे तर उघडच आहे. त्यामुळे त्यावर थातूरमातूर उत्तरं शोधत बसण्यापेक्षा चित्रपट अधिक मूलभूत आणि तात्विक मुद्द्यांची चर्चा, त्यांचा तात्विकपणा पुरेसा जाणवू न देता करतो. उदाहरणार्थ निर्माता आणि निर्मिती यांतल्या परस्परसंबंधाची चर्चा जी मानवाची निर्मिती आणि मानवाने केलेली निर्मिती अशी डेव्हिडच्या अँन्ड्रॉइड असल्याचा संदर्भ देत आकाराला येते. त्याखेरीज माणूसपण म्हणजे नक्की काय, उत्क्रांतीवादाच्या संकल्पना, श्रध्दा विरुध्द विज्ञान अशा अनेक पैलूंवर चित्रपट प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे भाष्य करतो. मोहिमेचा वरवरचा उदात्त हेतू, आणि त्यामागे असणारा वेलन्डचा व्यक्तिगत अजेन्डा हीदेखील माणसाच्या कोत्या मनोवृत्तीवर केलेली टिकाच आहे.
चित्रपटाच्या पटकथेवर काही समीक्षकांनी ताशेरे ओढल्याचं मी ऐकून आहे. ती मधे संथ होते, वेग घेत नाही, वगैरे. व्यक्तिश: मला तसं वाटलं नाही. त्यांना तसं वाटण्यामागे एक संभाव्य कारण म्हणजे चित्रपटाला जेनेरिक चौकटीत अडकवणं , आणि त्याने त्याच चौकटीत राहावं अशी अपेक्षा ठेवणं. प्रोमिथिअस हा केवळ अँक्शनपट, केवळ भयपट वा केवळ विज्ञानपट नाही . त्यामुळे त्याने अमुकच पध्दतीने पुढे जावं ,अशी अपेक्षा निरर्थक आहे. त्याचं जे रसायन आहे, त्या रसायनाला ही गती योग्य असल्याचं माझं मत आहे.
थ्री-डी चित्रपटांचं सध्या जे स्तोम आहे त्यातले मोजकेच चित्रपट हे या माध्यमाचा खराखुरा ,चांगला आणि आवश्यक वापर करतात असं दिसतं. अवतार, हे त्यातलं सर्वात उघड उदाहरण. स्कोर्सेसीचा ह्यूगो मी स्वत: टु-डीच पाहीला पण तोही त्याच ताकदीचा असल्याचं ऐकून आहे. लवकरच येणारा नवा स्पायडरमॅन देखील याच वर्गात बसेल असं ट्रेलरवरून तरी वाटतंय. प्रोमिथिअसदेखील या चित्रटांप्रमाणेच थ्री-डीचा उत्तम उपयोग करतो. अवकाश, ग्रहावरली विस्तिर्ण निसर्गदृश्य आणि एका टेकडीसारख्या वास्तूमधल्या गुहा यांमधे बराचसा चित्रपट घडतो आणि या सर्व जागा दाखवताना थ्री-डी मुळे दृश्यांना आलेली खोली फारच परिणामकारक आहे. हे गिमिक नसून ही गरज आहे हे प्रोमिथिअस पाहाताना लगेच लक्षात येतं.
प्रोमिथिअसचा शेवट खूप इन्टरेस्टिन्ग आहे. अशासाठी, की तो म्हंटलं तर समाधानकारक शेवट असूनही सीक्वलसाठी शक्यता तयार करणारा आहे आणि ’एलिअन’ ला गरजेपुरता सेट अप लावून देवूनही तो कथेसाठी त्यावर अवलंबून नाही. करमणूकीच्या प्रांतात हाय कॉन्सेप्ट , विचारांना चालना देणारे चित्रपट मिळणं कठीण असतं. रिडली स्कॉट ते देउ शकतो हाच त्याचा मोठेपणा.
- गणेश मतकरी 

16 comments:

Vivek Kulkarni June 11, 2012 at 7:07 AM  

नेहमीप्रमाणे अतिशय उत्तम परीक्षण. मी एफबी वर म्हणालो तसं तुम्ही जेव्हा चित्रपटाबद्दल लिहिता तेव्हा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होतो. यातसुद्धा रिडली स्कॉट, एलिअन चित्रपट, हा चित्रपट आणि एकूण रिडलीच काम या वर फोकस करून संपूर्ण चित्रप्रकाराबद्दल सांगितलत.
मला कालपर्यंत तिकीट मिळाले नाही. रविवारी सर्व शो हौसफुल होते. सोमवारी बघता आलं नाही. त्यामुळे उद्या बघायचा म्हणतो. बघतो तिकीट मिळते का.

Panchtarankit June 11, 2012 at 8:52 AM  

मनापासून धन्यवाद
ह्या धाटणीचे सिनेमे आम्ही दोघेही नवरा बायको आवडीने पाहतो मात्र मग त्यातील अनेक प्रसंगातील आशय ,अर्थ व सिनेमाचे सार हे माझ्या पत्नीकडून समजून घ्यावे लागते. आता तुम्ही उत्कृष्ट रीत्या हा सिनेमा कोणत्या कारणास्तव कसा पाहावा ह्याचा वस्तुपाठ आखून दिला आहे.
आता मी पूर्वतयारी म्हणून ह्या लेखाची उजळणी करून बायकोला म्युनिक मधील सिनेमागृहात नेतो व फॉर अ चेंज तिला सिनेमा समजून सांगतो.
येऊ दे अजून

ganesh June 12, 2012 at 3:21 AM  

Thanks Vivek ani Ninad.
Vivek, actually mala khoop jasta lihaycha navta mhanun scott wishayi filmbaher far lihilela nahi . actually scott bandhunvishayi 2/3 moth articles sahaj lihita yetil.

Abhijit Bathe June 12, 2012 at 9:49 PM  

I watched in IMAX 3D - and except for it being IMAX 3D, I didnt find much to talk about in this movie...I guess sci-fi is not my genre.....

Vivek Kulkarni June 13, 2012 at 12:32 AM  

चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर मला जयंत नारळीकरांची विज्ञान त्रिलजी आठवत होती. तिन्ही कादंबर्यात मानवी संस्कृतीच्या पलीकडे असणाऱ्या संस्कृतीचं अस्तित्व व त्या अनुषंगाने मानवाचा क्षुद्रपणा दाखवलेला आठवत होता. जयंत नारळीकर वैज्ञानिक असल्यामुळे ते अतिशय खोलात जाऊन यावर विचार करतात उदा. प्रेषित ही कादंबरी. जी रीड्लीच्या एलिएन आणि या चित्रपटासारखीच आहे. तसेच त्यात खूप मुलभूत गोष्टींचा विचार केलेला आहे. ती वाचकाला विचार करायला लावते. त्यातील आलोक हे पात्र एलिएन (परग्रहवासी म्हणूया आपण) आहे पण मानवासारखा; तो एलिएन फ्रान्चायीजीसारखा रक्तपिपासू नाही. त्याला सुद्धा आपल्यासारखे प्रश्न पडतात. त्याचं पृथ्वीवर येणं हे साम्राज्यवादी धोरण नाही तर येथे येऊन जमल्यास येथील मानवाची मदत घेऊन त्याच्या मागे उरलेल्या लोकांना वाचवणे हा आहे. उरलेल्या दोन्ही कादंबर्यात नारळीकर हीच संकल्पना थोड्या वेगळ्या पद्धतीने वापरतात.
जयंत नारळीकर आंतराष्ट्रीय दर्जाचे लेखक आहेत हे हा चित्रपट बघून लक्षात येईल. त्यांच्या तिन्ही कादंबर्यांचे इंग्रजीत अनुवाद व्हायला पाहिजेत. तसेच या तिन्हींवर हॉलीवूड दर्जाचे चित्रपट तयार होतील. दुर्दैवाने आपल्याकडे साहित्य वगैरे वाचण्याची कुणाला सवय नसल्यामुळे नारळीकरांनसारखे लेखक दुर्लक्षित राहतात.
हा चित्रपट हॉलीवूडमधनं निघाल्यामुळे आणि करमणूक करण्यासाठीच काढला असल्यामुळे व त्यात मारधाडीला जास्त महत्व असल्यामुळे मला आवडला नाही. त्याचं थ्रीडी तंत्राद्यान वापरणं फक्त पैसावसूल वाटलं. मागे तुम्ही मून नावाच्या चित्रपटाबद्दल लिहिलं होतंत. मी तो बघितला नाही पण काही प्रमाणत मी अंदाज बंधू शकतो. तसेच विचारांना चालना देणारे चित्रपट अशात निर्माण होत नाहीत हे दुर्दैव आहे. (याला कारण म्युनिक हा चित्रपट. येथे विषयांतर होतंय हे माहित आहे पण आपल्याला माहित असलेल्या इतिहासालाच प्रश्न विचारण्याची हिम्मत स्पीलबर्ग दाखवतो. या चित्रपटात तर एकूण मानव प्राण्यालाच काही प्रमाणत प्रश्न पडलेत पण ते त्या पात्रांना मला नाही. मला तर माझ्यापुरते ते मानवी पात्र एलिएनच वाटले.) मला चित्रपट अजून एका गोष्टीमूळ कळला नाही ते म्हणजे पात्रांचे अमेरिकी उच्चार पण याने एकूण चित्रपट बघण्याला मर्यादा नाही पडल्या. मला अजून एक प्रश्न पडतो हॉलीवूडला अपरिहार्यता किती? ते लोक तीच संकल्पना परत-परत का वापरतात? एलिएन ही संकल्पना या पूर्वीसुद्धा येऊन गेलेली आहे त्यामुळे त्याचे आता काय प्रयोजन. येथे मला त्यांचा व्यावसायिक दृष्टीकोन अपेक्षित नाही. याचं दुसरं कारण असं या पूर्वी ही संकल्पना एलिएन वेर्सेस प्रिडेतर तसेच predators यात येऊन गेलेली आहे. मला हॉलीवूडच्या मूल्यदृष्टीचाच राग यायला लागलाय.

ganesh June 13, 2012 at 2:12 AM  

Abhijit , : ) , I guess not.

Vivek, I appreciate your comment but it is a series of wrong comparisons and misguided expectations. Its not a surprise that you remember Narlikar's writing as he draws his inspirations from some me of the same sources Scott does. one obvious example here is the novel (Arthur C Clarke) and the film (Stanley Kubrik) of 2001 : A space odyssey, which has its influence on all Hollywood sci fi after, and Prometheus in particular. I liked Narlikar's Preshit, but his overall work is not at all impressive if you consider the work of Clarke, Asimov , Greg Bear , Philip K Dick, Ursula k. Le Guin etc. it remains at the obvious level. and it is not a surprise that he is not a sci fi writer of international standards. and trust me ,he is not.

the comparison of Alien to Preshit makes no sense whatsoever, where Alien is like a space horror flick where the killer is the alien, and Preshit is about an alien who is like a human with extraordinary intelligence. say an intellectual clark kent ,if you may. it is easier to compare preshit to superman than alien. they have no similarities in style, story ,format or character.you r comparing totally out of the context.

moon ha dekhil american chitrapat ahe , so तसेच विचारांना चालना देणारे चित्रपट अशात निर्माण होत नाहीत हे दुर्दैव आहे, is meaningless. tasehi hotaat. moon ,primer ,2001 and many other films prove it. Prometheus main stream made rahun te karto ,is far more interesting for me. you should see 2001 if you haven't yet. narlikaranchihi ti avadti film ahe.

Munich cha ya saryat sambandh kay he mala nakki kallela nahi ajun.

another totally incomprehensible comparison is Prometheus to Alien vs Predator. lesser said about it is better. by the way ,if you think that dialogues in Prometheus are not important, its a serious mistake.

tula film na avadnyala kahich harkat nahi, only you should not like it for the right reasons.

Vivek Kulkarni June 13, 2012 at 6:05 AM  

तुम्ही म्हणल्या प्रमाणे मी बर्याच गोष्टींची सरमिसळ केली आहे. तसेच मी खुपसे चित्रपट बघितले नाहीत व तुम्ही ज्या-ज्या लेखकांची नावे सांगितलीत ती पण वाचलेली नाहीत. मला वाटतं नारळीकरांचे साहित्य हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आहे कदाचित तुम्ही सांगितलेल्या लेखकांचे लिखाण वाचले नसल्यामुळे तसे म्हणणे धाडसाचे ठरेल. ईतर बर्याच चित्रपटांचा उल्लेख केलात जेसुद्धा मी बघितलेले नाहीत त्यामुळे एकाच चित्रपटावर अवलंबून मी कमेंट दिली. म्युनिक चित्रपट बघितल्यापासून डोक्यात होता त्यामुळे अचानक त्याचा संबंध जोडला गेला जो की नक्कीच चुकीचा होता. एलिएन वर्सेस प्रीडेतर हा चित्रपट मला त्यासारखाच वाटला म्हणून त्याचा उल्लेख केला. थ्रीडीमध्ये पहिल्यांदाच बघत होतो त्यांच्या संवादांकडे दुर्लक्ष झाले. कदाचित परत एकदा पहिला तर मला तो पूर्णपणे कळेल.

ganesh June 13, 2012 at 9:32 AM  

Vivek, Stressing my last point again. Punha pahilyane tula awdel asa nahi ani tasa the avadnyachi garaj dekhil nahi. Only thing is u should realize why u did not like it and should b able to pinpoint and say it in so many words. if you can do that, it will be a big step towards understanding films.

Suhrud Javadekar June 13, 2012 at 11:41 PM  

It is indeed an extremely complex film...one needs to watch it at least twice to fully comprehend and appreciate it...science fiction as a genre, I think, is an acquired taste...not everyone's cup of tea...a good basic knowledge and an interest in science is a pre-requisite...

Nils Photography June 14, 2012 at 4:06 AM  
This comment has been removed by the author.
ganesh June 14, 2012 at 4:55 AM  

I can elobarate on these queries but not here. The film is new and many readers may not have seen it. So to avoid spoilers , write to me on ganesh.matkari@gmail.com

Nils Photography June 14, 2012 at 10:28 PM  

extremly sorry...
I am not supposed to put these question here...
I will mail you my quries ...

You can remove my comment...

हेरंब June 16, 2012 at 1:53 PM  

Watched it today. I liked it. But honestly it even though it's called as prequel, I found it more as a remake of 'Alien'

I watched 'The Dictator' just before this and surprisingly I found it more interesting due to full of sarcasm.. Not comparing at all. just an observation.

You have to watch 'Dictator' if you haven't already. it's really superb.

ganesh June 16, 2012 at 8:16 PM  

Yes, i plan to watch the dictator. But not released in india and no good prints elsewhere yet.

हेरंब June 17, 2012 at 11:59 AM  

oh. i didnt know it hasn't released in India yet.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP