द डार्क नाईट रायजेस- परफेक्ट एन्ड
>> Monday, July 23, 2012
मला त्यामानाने ढोबळ अशी दोन कारणं दिसतात, जी नोलनच्या डोक्यात असतीलच असं सांगता येत नाही , पण ती गृहीत धरता ,मला ही योजना योग्य वाटते. पहिलं कारण आहे ते या चित्रत्रयीच्या रिअँलिस्ट धोरणाशी संबंधित. या चित्रपटांचं धोरण हे पहिल्यापासूनच सुपरहीरो संकल्पनेला वास्तवाच्या अन (गढूळ राजकीय धोरणांपासून दहशतवादाच्या टांगत्या तलवारीपर्यंत ) सद्य परिस्थितीच्या पैलूंच्या जवळ नेण्याचं राहीलं आहे. त्यामुळे खलनायकांची निवडही चमत्कृतींचा कमीत कमी वापर गृहीत धरून करण्यात आली आहे. त्यांच्या रंगरूपातही हे दिसून येतं. बर्टनच्या बॅटमॅन मधला निकलसनच्या जोकरचा काळजीपूर्वक रंगवलेला चेहरा आणि त्याउलट ’द डार्क नाईट’ मधे लीजरच्या चेह-यावरला फासल्यासारखा पांढरा रंग, रक्त सुचवणारा ओठांजवळ पसरलेला लाल अन डोळ्याभोवतीचं काळं आठवा किंवा कॉमिक्समधल्या स्केअरक्रोचा इलॅबरेट वेष काढून सिलिअन मर्फीचा केवळ चेहरा झाकणारं, सूटावरच घातलेलं गोणपाटासारखं फडकं आठवा. बेनचं व्यक्तिमत्व हे या वास्तववादी पठडीत बसणारं आहे. त्याशिवाय बॅटमॅनप्रमाणेच त्याच्याकडे असणारा ,त्या दोघांना तुल्यबळ ठरवणारा इतर शक्तींचा अभाव हादेखील त्याला खलनायक करणं पटवणारा आहे.
दुसरं कारण आहे ते रचनेशी संबंधित. बेनवर लक्ष केंद्रीत होणं हे आपलं लक्ष दुस-या एका पात्रावरुन बाजूला नेतं जे या चित्रपटातला खरा छुपा खलनायक आहे. याचा उपयोग चित्रपटाच्या शेवटासाठी एक रहस्य शाबूत ठेवण्याकरता तर होतोच, वर ख-या खलनायकाची ओळख या शेवटल्या भागाला थेट चित्रपटाच्या पहिल्या भागाशी नेउन जोडते, आणि तीन भागांना एक निश्चित शेवट देऊ करते.
एकदा का हा बेनच्या निवडीबद्दलचा प्रश्न (आणि जोधपूरमधली विहीर गॉथमजवळ नक्की कुठे असावी हा दुय्यम प्रश्न, ज्याचं उत्तर मी काही देऊ शकणार नाही )निकालात काढला ,की मग ’द डार्क नाईट रायजेस’ ची , आणि पर्यायाने नोलनच्या चित्रत्रयीची गुणवत्ता वादातीत ठरते. नोलनच्या तिन्ही चित्रपटातला त्यातल्यात्यात उजवा कोणता याबद्दल माफक मतभेद मात्र संभवतात. माझी खात्री आहे की अनेकांचा कल हा दुस-या भागाकडे जाईल. यात आश्चर्य नाही. चित्रत्रयींचे दुसरे भाग नियमितपणे सर्वोत्कृष्ट असतात याची स्टार वॉर्स पासून स्पायडरमॅनपर्यंत अनेक उदाहरणं आहेत. याचं अगदी सोपं कारण म्हणजे पहिले भाग हे ब-याच प्रमाणात पात्रपरिचयात अडकतात आणि प्रस्तावनापर राहातात, तर अखेरचे भाग पहिल्या दोन भागांहून वरचढ ठरण्याच्या विवंचनेत असतात, आणि समाधानकारक शेवटाकडे गोष्ट ढकलण्यातही त्यांचा वेळ जातो. याउलट दुसरे भाग मुक्त आणि सुरूवातीपासून अखेरपर्यंत नाट्यपूर्ण असतात. नोलनच्या डार्क नाईट कडे आणखी एक हुकूमी पान होतं ते लीजरने साकारलेल्या जोकरच्या भूमिकेचं. त्याचा प्रदर्शनासुमारास झालेला मृत्यू हा या भागाभोवतालचं वलय अधिक गडद करुन गेला. डार्क नाईट उत्तम होता याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही, पण त्यामुळे ’द डार्क नाईट रायजेस’ कुठे कमी पडतो असं मी मानणार नाही. किंबहुना तो ज्या प्रकारे संपूर्ण चित्रत्रयीला कन्क्लूड करतो, ते पाहाता मी त्याला किंचित सरस मानायलाही तयार आहे.
डार्क नाईट रायजेस सुरु होतो , तो गेल्या भागानंतर आठ वर्षांनी. गॉथममधे क्वचित असणा-या शांततेच्या वातावरणात. हार्वी डेन्टच्या मृत्यूला जबाबदार मानला गेलेला , आणि डेन्टची दुष्कृत्य माहीत नसलेल्या जनतेच्या रोषाला कारणीभूत झालेला बॅटमॅन (क्रिश्चन बेल) आता अंतर्धान पावलेला आहे. ब्रूस वेनदेखील आपल्या घराबाहेर पडताना दिसत नाही. वेन कॉर्पोरेशनने आपला पैसा एका स्वच्छ ऊर्जा प्रकल्पात अडकवल्याने, आणि प्रकल्पाचे संभाव्य धोके लक्षात येताच प्रकल्प थांबवल्याने, त्यांची परिस्थितीही फार बरी नाही. अशा परिस्थितीत बेनचं (टॉम हार्डी) गॉथममधलं आगमन नव्या समस्या उभं करणारं ठरतं. कमिशनर गॉर्डन (गॅरी ओल्डमन) आणि पोलिस अधिकारी जॉन ब्लेक (जोसेफ गॉर्डन-लेविट) बॅटमॅनची गॉथमला गरज असल्याचं पटवतात आणि आपल्या सर्वात जवळच्या आप्ताच्या, बटलर आल्फ्रेडच्या (मायकेल केन) सल्ल्याला न जुमानता ब्रूस पुन्हा बॅटमॅनचा अवतार घेतो. सेलिना काईल ,अर्थात कॅटवुमन ( अँन हॅथवे) त्याला बेनपर्यंत पोचायला मदत करते पण बेन बॅटमॅनला जायबंदी करुन गॉथमचा नायनाट करायला निघतो. वेन कॉर्पोरेशन वाचवणंही आता तिथला प्रमुख लुशिअस फॉक्स (मॉर्गन फ्रीमन) आणि श्रीमंत एन्वायरमेन्टलिस्ट मिरान्डा टेट (मॅरीअन कोटिलार्ड) यांच्या हाती असतं.
तिस-या भागाचं हे कथानक जेव्हा आपण या चित्रत्रयीच्या इतर दोन भागांबरोबर पाहातो ,तेव्हा लक्षात येतं की सामान्यत: सुपरहीरोपटांत न दिसणारी एक गोष्ट इथे आहे . आणि ती म्हणजे घटनांचा पक्का कालावधी आणि त्यांच्या चढउताराचा आलेख. सामान्यत: सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसाना दिलेला असतो. त्यांना ना अपरिहार्यता असते ना विशिष्ट काळाची चौकट. इथे या चौकटीचा खूपच विचार आहे. त्यामुळे ही साहसांची मालिका नसून ,सुरुवात मध्य आणि शेवट योग्य क्रमाने असलेली एक पूर्ण गोष्ट आहे. सेल्फ कन्टेन्ड. त्यासाठी नोलनने अनेक गोष्टी थोड्या प्रमाणात बदलून घेतल्या आहेत. विशिष्ट पात्रांना विशिष्ट वेळी कथेतून बाहेर काढलय, रॉबिनसारख्या महत्वाच्या पात्राला मुळात कथेतच आणलेलं नाही (जरी त्याचा एक छान संदर्भ अखेरच्या काही मिनीटांत येउन जातो) , प्रत्येक पात्राच्या वागण्यामागे निश्चित हेतू तयार केलाय.डि सी कॉमिक्सची एक एल्सवर्ल्ड नावाची मालिका आहे, ज्यात त्यांचे प्रसिध्द नायक नेहमीपेक्षा वेगळ्या काळात, वेगळ्या परिस्थितीत ,वेगळ्या प्रकारच्या कथांमधे सामील होतात. नोलनची चित्रत्रयी ही अशा एखाद्या एल्सवर्ल्ड गोष्टिसारखी आहे. फिक्शनल गॉथमपेक्षा आजच्या वर्तमानात घडेलशी वाटू शकणारी, पात्रयोजनेचं स्वातंत्र्य घेतानाही अचूक टोन पकडणारी आणि शेवटाबद्दल अनिश्चितता तयार करून त्याची वाट पाहायला लावणारी.
शेवटाचा विषय निघालाच आहे तर त्याविषयी थोडं. ’द डार्क नाईट रायजेस’ची टॅगलाईन, ’द लेजन्ड एन्ड्स’, ही चाहत्यांना बिचकवणारी. कारण त्यात केवळ चित्रत्रयीचाच नाही तर नायकाचाही शेवट सूचित होतो. प्रत्यक्षात तो होतो अथवा नाही ,हे मी सांगणार नाही , आणि ते फारसं महत्वाचंदेखाल नाही . महत्वाचं आहे ते तो होउ शकेल , हे प्रेक्षकाला वाटत राहाणं. सुपरहीरोंच्या व्याख्येतच ,त्यांचं कोणत्याही धोक्यापासून सुरक्षित असणं गृहीत धरलेलं आहे. ही सुरक्षितता आपल्याला त्याच्या भविष्याबद्दल आणि पुढेही अनेक वर्ष आपल्याला घडू शकणा-या त्याच्या सहवासाबद्दल निश्चिंत करते. ही निश्चिंतता हा चित्रपट टॅग लाईनमधेच काढून घेतो आणि चित्रपटादरम्यानही वेळोवेळी या अनिश्चित शेवटाची आठवण करुन देतो. नोलनच्या वास्तववादी सूराबरोबर हा दृष्टिकोन अतिशय सुसंगत आहे हे वेगळं सांगायला नकोच.
- गणेश मतकरी
18 comments:
I just want to say..that the Rise is not as effective as the fall.Also,couldnt understand the purpose behind sidetracking Bane as the main antagonist at the end.He seems quite ordinary after that..
Movie is indivisually quite decent but, you can except that from a Chris Nolan movie.
Liked this one too but 'The Dark Knight' is my personal fav.
Woww! The end of the Rises made me crazy..
And Nolan is just great too do so...
Nice Article !! :)
@ crazygamers .. Felt jst da same way Nolan has nt given as much tym for rise as for the fall he cud hv taken a whole film for depicting each of dem
जब्बर...चित्रपटाच्या खलनायकाविषयी आणि शेवटाबद्दल तुम्ही लिहिलेलं समीक्षण अचूक वाटलं...ओवरॉल चित्रपटानंतर शेवटाकडचे प्रसंग संपूर्ण सिरीजला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतात..सलाम नोलान!!
परीक्षण अतिशय आवडलं. व्हिलनची निवड, चित्रमालिकेच एक पूर्ण गोष्ट असण, चित्रपटाचा शेवट ह्या सगळ्याच मुद्यांची मांडणी तुम्ही अतिशय नेमकेपणाने केली आहे. सिनेमा पहिल्यांदा पाहिला तेंव्हा मला तो खूप आवडला असला तरी डार्क नाईट इतका चांगला होता का असा प्रश्न पडला होताच. दोन चित्रपटांच्या वेगळ्या आलेखांबद्दलच हे विश्लेषण वाचून “डार्क नाईट उत्तम होता याबद्दल माझ्या मनात मुळीच शंका नाही. पण त्यामुळे ‘द डार्क नाईट रायजेस’ कुठे कमी पडतो असं मी मानणार नाही.” हे तुमच म्हणण एकदम पटल. चित्रपट आवडलेला होताच, पण परीक्षण वाचून तो आणखी जास्त उलगडला हे नक्की.
तुम्ही सांगितलेल्या superheroच्या first, second and third part चे समीक्षण आवडल...मला personally THE DARK KNIGHT AND THE DARK KNIGHT RISES च comparison करायला आवडनार नाही..
नोलनचा story telling चांगला वाटलं...
I'm proud of your review of TDKR
चित्रपट चांगला वाटला आणि त्याचा शेवटसुद्धा, पण पूर्ण movie मध्ये काहीतरी missing वाटत होते. (तसे पाहायला गेलो मी तर पूर्ण Movie Dark Knight बरोबर Compare करत होतो आणि जोकरच्या शोधात होतो :) Thinking of Joker )
movie मध्ये Nolan Touch मिसिंग होता.
काही गोष्टी खटकत होत्या,
व्हिलन चा चेहराच दिसत नसल्यामुळे मजा नाही आली.
Miranda चा अभिनय हास्यास्पद वाटला.
बंदुका असताना रस्त्यावर ढिशुम - ढिशुम का ठेवली ?
वेन कंपनीचे प्रोजेक्ट complected वाटले, थोडा विचार केल्यावर कळले.
मला वाटते कि नोलान त्याच्या आगामी Movie Steel Man मध्ये व्यस्त असेल :)
आणि हो Dark Knight च्या वेळेला जोकर चा मृत्यू आणखी ह्या वेळेला निष्पाप लोकाचा विनाकारण मृत्यू ...
चित्रपटातील Batman प्रमाणे Batman Movie शापित निघाला बहुतेक.
Will Miss you Batman.
सही परीक्षण.
>>"सुपरहिरोपट हे पहिल्या चित्रपटात हिरोच्या ओरिजिन विषयी सांगतात पण त्यानंतरचा भाग केवळ एकामागून एक येणा-या साहसांना दिलेला असतो."
उलट मला वाटते की पहिला भाग रोचक करणे दुसऱ्या व तिसऱ्या भागाच्या मानाने सोपे असते. हिरोचे इवोल्युषण दाखवण्याचे ठराविक पॅटर्न दिसतात. या पॅटर्नशी प्रामाणिक राहिले तर हमखास यश.
दुसरा, तिसरा भाग म्हणजे खूप विचार करून बनवलेली कथा असते. दुसरा भाग सरस असतो याच्याशी पूर्ण सहमत.
नोलन चा बॅटमॅन पण त्यातलाच. त्याला वेगळे करतात ते त्याचे विलन आणि त्याचे मर्त्य असणे, त्याच्या मानवी चुका आणि त्यातून घडत जाणे. सुपरहिरोंचे सिनेमे पाहून 'मलाही अशा पॉवर्स असत्या तर' हा फील नोलन चा बॅटमॅनला पाहून कधी येत नाही. आणि या सिनेमात तर चक्क अंगावर काटा येण्याइतपत मारलंय हिरोला.
नोलन चे आणखी एका बाबतीत कौतुक वाटते की कथा वास्तववादी असूनही, मूळ बॅटमॅन कॉमिक्स मधल्या पात्रांशी त्याने इमान ठेवलय. बेन, तालीया, रा'झ अल घुल[१] यांचे संदर्भ जुळवलेत.
>>"आणि जोधपूरमधली विहीर गॉथमजवळ नक्की कुठे असावी हा दुय्यम प्रश्न, ज्याचं उत्तर मी काही देऊ शकणार नाही"
ही विहीर गॉथमजवळ नसून मध्यपूर्वेत अपेक्षित आहे. रा'झ अल घुल हा स्वतः एक भाडोत्री सैनिक (mercenary) म्हणून तिथल्या देशात असतो असा उल्लेख आहे.[१]
कॉमिक्स मध्ये बेन कॅरीबियंस मध्ये कारावासात असतो.[१] त्यामुळे मध्यपूर्व किंवा कॅरीबियंस असा निष्कर्ष काढू शकतो.
या चित्रपटाची सर्वात बळकट बाजू म्हणजे हा विहीरवजा कारावास. त्याबद्दल थोडे लिहायला हवे होते. कदाचित त्याबद्दल लिहिले तर तो स्वतःच एक मोठा पोस्ट होईल.
आणखी एक निरीक्षण-
निम्म्याच्या वर इंसेप्षण - डार्क नाईट कास्ट कॉमन आहे.
टॉम हार्डी - इम्स - बेन.
जोसेफ गॉर्डन लेवीट - आर्थर - जॉन ब्लेक (रॉबिन).
मावियोन कोटीया - माल - मिरांडा टेट (तालीया झ अल घुल)
मायकेल केन - स्टीफन माईल्स - आल्फ्रेड पेनीवर्थ
सिलीयन मर्फी - रॉबर्ट फिशर - जोनाथन क्रेन (स्केअरक्रो)
कॅटवूमन - अॅन हॅथवे नसती तरी चालले असते. कदाचित कॉमिक्समधली जास्तीत जास्त पात्र यावीत असा विचार असावा.
तिचे आणि ब्रूस वेनचे संवाद वीट आणतात.
[१]संदर्भ-विकी.
Thanks all,
As I have made amply clear , I believe that there is a definite possibility that many of us would like the second part over the third, but it is also clear that it's an excellent conclusion to an ambitious series.
Nil, rastyawar dhishum dhishum ka thevli yacha uttar mulatach batmancha character detailing madhe ahe. he never uses a gun. the whole idea is to bring the character on as much primal level as possible by not giving him any super power or other such facility giving a complete contrast with DC's other famous hero, superman. by the way , its Man of steel , not steel man and Nolan is not directing but producing. it's directed by Snyder( 300, Watchmen, Sucker Punch).
Ashish, I am quite familiar with batman universe , but Ra's al Ghul's origin won't solve the location of the well. in the film ,Gotham is under siege, so no one gets in or out. so how can bane take him to middle east , and how can he return unnoticed? that prompts that the location will have to be in the proximity of Gotham. but you see the Indian village at a distance. not very clearly but enough to say that it's not a American city. that makes the location weirder.
actually ,i kind of liked the Catwoman. as per the comics, Wayne marries Kyle at some future date, so it is justified and the role is not too big. Burton's cat woman in Batman Returns was really terrible.
I can see that cast of Inception and Dark knight has similar people ,but whats your point? lot of filmmakers like to repeat the actors they feel comfortable working with. same here. but leads were different .also Caine had a very small role in Inception and Murphy has a small role here. Hardy is unrecognizable here. so the effect is not of the same cast. but again, what's ur point?
why was my comment removed?
Actually , i was going to address the issue of removed comment , but forgot. the administrator removed them because they were revealing too much plot and that's never a good thing, specially since its a new film. I have personally not seen the removed comments. but any of u want my reaction to the comment, please rephrase them ,or mail me directly on ganesh.matkari@gmail.com
Hi Ganesh,
Thanks for the response. Well, the common cast was just an observation. I have to admit, I didn't think it through while writing it down. Don't know what to deduce from it. But as you have mentioned, most of the directors do repeat the cast and it seems that Nolan too doesn't like to experiment with his actors. Also, when same actors play roles of entirely different characters with the similar tone of the movie, it kind of spoils the fun of role.
About the Prison,
In the movie itself, when Miranda Tate reveals her true identity as Talia- daughter of Ra'z Al Ghul, She mentions about her mother as the princess of some kingdom and Ra'Z Al Ghul being a mercenary. Her birth in the prison was result of the forbidden love of her parents. The kingdom surely doesn't seem to be near to Gotham.
I was more interested in a concept of "hope" in the prison-well. It mostly describes the current way of life. Out of curiosity, it will be nice to know more about the philosophical facet of the setup.
Liked the review! :)
As Ashish mentioned, would like to read more on prison/hope part. Definitely it has a material of a blog post I believe :)
>>>>>I was more interested in a concept of "hope" in the prison-well. It mostly describes the current way of life. Out of curiosity, it will be nice to know more about the philosophical facet of the setup.
Post a Comment