पुन्हा वासेपूर- दुस-या पिढीची गुन्हेगारी

>> Sunday, August 26, 2012

गँग्ज आँफ वासेपुरच्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी गर्दी तर केली ,पण झपाट्याने त्याविषयी एक असंतोषाचं वातावरणदेखील पसरलं. याला अर्थातच कारणं होती. सर्वात महत्वाचं कारण म्हणजे याचं अपरिचित टेक्श्चर. सरळसोट कथानक रंजक पध्दतीने सांगितलं जावं अशी आपल्या प्रेक्षकांची आपल्या चित्रपटांकडून अपेक्षा असते आणि आपल्या चित्रपटांची कथाप्रधान परंपरा पाहाता त्यांच्या दृष्टिकोनातून ती रास्तदेखील मानता येईल. या अपेक्षेने अन पोस्टरवरल्या टिपिकल सूडपटांना शोभणा-या टॅगलाईन्स वाचून गेलेला प्रेक्षक चार पाच दशकांच्या कालावधीवर पसरलेलं हे गँगस्टरपट आणि माहितीपट यांचं मिश्रण ,तेदेखील अपूर्ण शेवटासह पाहून भांबावला असल्यास आश्चर्य नाही.पोस्टरवर हा चित्रपटाचा प्रथम भाग असल्याचा अजिबात उल्लेख नसल्याने तर ब-याच जणांना चित्रपटाअखेर येणारी ’ टु बी कन्टिन्यूड ’ही सूचनादेखील प्रतिकात्मक, हे गँगवॉर असंच सुरू राहाणार ,या आशयाची देखील वाटली. सुदैवाने कश्यप कंपूने एक गोष्ट उत्तम केली.दुस-या भागाच्या प्रदर्शनात फार वेळ काढला नाही. पहिला भाग , आणि त्याबद्दलच्या भल्याबु-या प्रतिक्रिया डोक्यात असतानाच आपल्याला पुढला भाग पाहायला मिळाला.
एक गोष्ट वासेपुरच्या दुस-या भागाकडे पाहाताना लक्षात ठेवायला हवी. आणि ती म्हणजे तो पारंपारिक अर्थाने दुसरा भाग नाही. तर एका लांब चित्रपटाचा ,तो उत्तरार्ध आहे. अनुराग कश्यपने पहिला भाग सेल्फ कन्टेन्ड करण्याचा प्रयत्नही केला नाही यावरुनही ते स्पष्ट होतं . त्याच्या दृष्टिने गँग्ज आँफ वासेपूर दोन भागात पाहाणंच न्याय्य आहे. असं असतानाही, चित्रपटाचे असे दोन तुकडे करणं ,केवळ लांबीमुळे आहे असं मात्र म्हणता येणार नाही. कारण त्यात अगदी मूलभूत स्वरुपाचे काही फरक आहेत. पहिला आणि कदाचित सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला भाग हा जवळजवळ सेट अप आहे ,तर दुसरा भाग मुख्य गोष्ट. दुस-या भागातल्या घटना घडण्यासाठी जी पार्श्वभूमी हवी ती तयार करण्याचं काम हे प्रामुख्याने पहिल्या भागाचं काम होतं. ही पार्श्वभूमी मुळातच इन्टरेस्टिंग होती आणि ती पुरेशा तपशीलात येण्यासाठी अडीच पावणेतीन तास आवश्यक होते असं आपण मानूनही चालू, मात्र हेदेखील तितकंच खरं, की चित्रपट पाहून असंतुष्ट राहिलेल्या प्रेक्षकांच्या असंतोषाचं खरं कारणही ,पहिल्या भागाच्या या गुणधर्माशीच संबंधित आहे. या प्रेक्षकांची चित्रपटाकडून जी अपेक्षा होती, त्या चौकटीत पहिला भाग नॉनस्टार्टर राहिला, आणि कथेचा खरा प्राण त्याने दुस-या भागासाठी राखून ठेवला. पहिल्या भागाचा एकूण अवाका, त्यात घडणा-या घटनांचा कालावधी ,चित्रपटातल्या नाट्यपूर्णतेचं आणि वास्तववादी वृत्तीचं प्रमाण हे सारंच दोन्ही भागात वेगवेगळं आहे. त्याशिवाय ज्या प्रकारे पहिला भाग उघड उघड अपूर्ण आहे, तसं दुस-या भागाचं नाही. नायकाच्या वडिलांच्या हत्येची बॅकस्टोरी असणारा हा जवळपास पूर्ण चित्रपट आहे. पहिला भाग पाहिला नसला तरी या चित्रपटाच्या प्रेक्षकाला फार फरक पडणार नाही.
वासेपुरच्या पहिल्या भागाविषयी लिहिताना मी या चित्रपटाची प्रेरणा अनुराग कश्यपला  कपोलाच्या ( आणि अर्थात पुझोच्याही ) गॉडफादर वरून मिळाली असावी असं लिहिलं होतं . मांडणी आणि तपशीलात जराही सारखेपणा नसूनही व्यक्तिरेखांचे टाईप्स ,घटनाक्रम उलगडण्यातलं वा कथानकाच्या रचनेतलं साम्य ,विशिष्ट दिशेने होणारा प्रवास , या बाबतीत दोन्ही चित्रपटात तुलना होण्याजोगी आहे.धोरणी डॉन व्हिटो कॉर्लिओनीची आठवण करुन देणारा सरदार खान (प्रथम भागातला मनोज बाजपेयी) , वडिलांवरल्या हल्ल्याने पेटून उठणा-या आणि आपल्या शीघ्रकोपीपणाचा बळी ठरणा-या सनीची आठवण करुन देणारा दानीश (विनीत कुमार) आणि काहीशा उप-या परिस्थितीत वाढलेल्या ,पण अचानक वडिलांच्या वारशाला जागणा-या आणि आपला बदला पूर्ण करणा-या मायकेलची आठवण जागवणारा फैजल (नवाझुद्दैन सिद्दिकी)ही पात्रं तर सहजच आेळखता येण्यासारखी.अर्थात वासेपुर द्वयीमधे सरदार आणि फैजल यांना अधिक वाव आहे, ते जवळजवळ एकेका भागाचे नायक आहेत. दानीशची थोडी भूमिका पहिल्या भागात असली ,तरी दुस-या भागात त्याला फारच कमी वाव आहे.वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याच्या प्रकरणात त्याचा लगेचच बळी जातो. फैजल आपला व्यसनीपणा थोडा बाजूला ठेवून गुन्हेगारांतल्या एकाचा त्वरीत आणि दहशत बसेलशा पध्दतीने बळी घेतो आणि आपला प्रमुख शत्रू रामाधीर सिंग (तिगमांशू धुलीया) ,याच्याबरोबर समझोत्याची बोलणी करुन सुलतान (पंकज त्रिपाठी) या दुय्यम शत्रूला दूर ठेवतो. अर्थात हा समझोता काही कायम टिकणार नसतो . त्याप्रमाणे सुलतान लवकरच त्यातून सुटण्याचा विचार करायला लागतो.
वासेपूरचा पहिला भाग न आवडलेल्यांनाही दुसरा आवडण्याची अधिक शक्यता आहे कारण तो उघडच अधिक रंजक आहे. पहिल्या भागाप्रमाणे इथेही गँगवॉर, राजकारण, बदलती सामाजिक परिस्थिती आणि हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव यांचं टेक्स्टमधे मिश्रण आहे ,पण हे कथानक थोड्या कमी कालावधीत घडणारं आणि मुख्य कुटुंबाकडे अधिक लक्ष देणारं आहे.पहिल्या भागात सरदार खान आणि रामाधीर यांच्यातलं वैर खूप ताणलं जातं पण फार काही घडत नाही. इतकं नाही ,की अखेर सरदार खानची सूडाची योजनाही अपूर्ण राहाते. त्याउलट इथे अनेक पात्र आहेत जी व्यक्तिचित्रणात खास आहेत आणि ती सतत आपल्या किर्तीला शोभणा-या गोष्टी करताना दिसतात. फैजलला तुल्यबळ भूमिकेतली त्याची पत्नी मोहसीना ( हुमा कुरेशी), फैजलचा ब्लेड चघळणारा भाऊ परपेन्डिक्युलर (आदित्य कुमार) आणि त्याचा बिकट प्रसंगी काढता पाय घेणारा मित्र टँजंट, फैजलचा सावत्र भाऊ डेफिनेट ( झीशान काद्री) असे अनेक जण चित्रपटात वेगवेगळ्या वेळी लक्षवेधी ठरतात. प्रत्येकजण केवळ गप्पा न मारता काहीतरी करताना दिसतो ज्यात आपण गुंतलेले तर राहातोच ,वर त्यांच्या उद्योगांच्या निमित्ताने दिग्दर्शकाला काही सेट अँक्शन पीसेस घालून आपली तंत्रावरची पकड दाखवण्याची संधी मिळते. परपेन्डिक्युलरवरचा जीवघेणा हल्ला, अडचणीच्या रस्त्यातून डेफिनेटने केलेला शमशाद आलमचा पाठपुरावा, इलेक्शन बूथ लुटण्याचा प्रसंग अशी कितीतरी उदाहरणं घेता येतील.
हिंदी चित्रपटांचा वाढता प्रभाव हे पहिल्या भागातलं सूत्र इथे खूप विस्तृत पध्दतीने मांडलं जातं. मयतापासून (याद तेरी आएगी)आनंदसोहळ्यापर्यंत (माय नेम इज लखन)लाइव्ह आँर्केस्ट्रासह वाजणारी गाणी, फैजलने स्वत:च्या नाकर्तेपणाची शशी कपूर बरोबर केलेली तुलना आणि त्याने स्वत:ला सिध्द केल्यावर त्याच्या व्यक्तिमत्वात होणारा अमिताभ बच्चनचा संचार ,त्याच्या मोहसीनाबरोबरच्या प्रेमप्रकरणादरम्यान येणारे नव्या नायकांचे संदर्भ, परपेन्डिक्युलर आणि टँजंटची मुन्ना आणि सर्किट बरोबरची तुलना अशा या वेळोवेळी निदर्शनाला आणून दिलेल्या जागा आहेत, ज्या सहजपणे या सतत बदलत्या पण कायमस्वरुपी प्रभावाकडे निर्देश करतात.
आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे इथला विनोद. सामान्यत: ,टीपिकल नाट्यपूर्ण चित्रपट हे एका वेळी एका भावनेवर आपलं लक्ष केंद्रित करतात. गंभीर प्रसंगात विनोदाचा शिरकाव न होईलसं ते पाहातात. वासेपूर मात्र वेळोवेळी प्रसंगांची अँब्सर्डिटी समोर आणतो आणि विनोदाच्या जागा आपोआप तयार होतात. शोकसभेदरम्यान अत्यंत गंभीरपणे आणि संदर्भ सोडून गायल्या जाणा-या फिल्मी गाण्यापासून ते माणसाला मारायला जातेवेळी भाजीपाल्याच्या खरेदीवर केलेल्या चर्चेपर्यंत अशा अनेक जागा चित्रपटात आहेत ज्या केवळ करमणूक म्हणून विनोद करत नाहीत पण परिणामाला वास्तवाच्या जवळ आणण्यासाठी करतात.
कश्यपचं पटकथेसाठी नाव असणा-या सत्या चित्रपटापासून आपल्या चित्रपटात दिसणा-या गुन्हेगारीचं रूप बदलायला , आणि वास्तवाच्या अधिकाधिक जवळ यायला सुरुवात झाली. गँग्ज या बदलाच्या प्रयत्नांतलाच एक महत्वाचा टप्पा मानावा लागेल. हा बदल सार्वत्रिक असेलसं वाटत नाही ,मात्र तरुण दिग्दर्शकांसाठी तो निश्चितच प्रेरक ठरेलसं वाटतं.
- गणेश मतकरी
(महाराष्ट्र टाइम्समधून)

16 comments:

Digamber Kokitkar August 26, 2012 at 10:51 PM  

Pahila Bhag thoda vistarit hota jyamule durya bhagachi parshvbhoomi tayar jhali.

Nawazuddin siddiqi la mothya bhumiket pahun changle vatale.

GODFATHER cha prabhav Anurag Kashyap var aahe he lekh vachun patale, pan mala tar Quentin tarantino cha dekhil vatato.

Ajun 1 vinanti Jara lekh vadhava.

Meghana Bhuskute August 26, 2012 at 11:25 PM  

लेखाचा पूर्वार्ध (किंवा पहिल्या भागावरचा लेख) जास्त आवडला होता, हा जरा त्रोटक वाटला. पण ते वर्तमानपत्रातल्या जागेच्या मर्यादेमुळेही असेल.

हेरंब August 27, 2012 at 1:07 PM  

After watching the most disappointing part-I, I need to gather a lot of courage and patience to go with this one. Per your post it definitely looks much promising compared first one. Will watch it this weekend.

श्रीनिवास नार्वेकर August 27, 2012 at 2:05 PM  

"गँग्ज ऑफ वासेपूर" हा एकूणच भारतीय चित्रपटाच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. अनुरागला मुळातच आदी, मध्य, अंत असलेली सरळसोट कथा आकर्षक पध्दतीनं मांडून दाखवायची नाहीये, तर त्याला एक संपूर्ण गोष्ट, त्या गोष्टीचा एकूण प्रवास, मानसिकता अगदी तपशीलवार दाखवायचीय. आणि त्यासाठी अनुराग चित्रपटाचं व्याकरण उलथून-पालथून टाकतो, चित्रभाषा बदलून टाकतो. बंदिस्त (!!!) पटकथेची सवय झालेल्या प्रेक्षकांसाठी प्रसंगी अनावश्यक वाटणारे बारीक बारीक तपशीलही तो दाखवतो आणि ते तपशील दाखवतानाही त्याच्या पटकथेचा वेग भन्नाट आहे आणि मला वाटतं, हेच फार महत्त्वाचं आहे. पटकथा भरकटल्यामुळे किंवा पसरल्यामुळे वाढलेल्या चित्रपटाचा वेळ आणि विचारपूर्वक काम करुन केलेल्या तपशीलवार वास्तवदर्शी पटकथेमुळे वाढलेला वेळ या दोन सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. ‘वासेपूर’ दुसर्या प्रकारातला आहे. अनुरागने सगळे धोके पत्करत प्रेक्षकशरण झालेल्या बॉलीवूडमध्ये वेगळी वाट चोखाळली आहे आणि आज घडीस हीच बाब भारतीय सिनेमाच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे.

- "वासेपूर व्हाया कश्यप : भारतीय सिनेमाचा बदलता प्रवाह" या माझ्या लेखातून...

Vivek Kulkarni August 27, 2012 at 7:33 PM  

ग्यांग्ज ऑफ वासेपूर २ या चित्रपटाचा उद्देश काय आहे? वासेपूरमधल्या गुंडांची काही पिढ्यांची कहाणी; पण मध्यंतरानंतर चित्रपट रिपीटीटीव्ह होतो.

चित्रपट बघताना तीन चित्रपटांची आठवण होत होती.
१) दि गॉडफादर: फैजल खानची गांज्या ओढनार्यापासून ते कुख्यात गुंड होईपर्यंतचा प्रवास.
२) दि सिटी ऑफ गॉड: पर्पेंडीकुलर आणि डेफीनिट या पात्रांवरचा प्रभाव.
३) हार्ड बोईल्ड: या चित्रपटाचा प्रभाव शेवटच्या हॉस्पिटलमधल्या प्रसंगात येतो.

रामाधीरला मारावायाच्या सीनवेळी तर चित्रपट अनुरागच्या हातातून सुटतो. यात फैझल मोक्ष मिळाल्यासारखा वागतो गम्मत म्हणजे याच्या आधीच्याच प्रसंगात तो या चक्रात अडकलो नसतो तर बरं झालं असतं असं बायकोजवळ कबुली देतो. कारण पुढे कळसाध्यायला त्याचं कृत्य बुळचट अन अशोभनीय (निरर्थक या अर्थाने) वाटतं. रामाधीर तर त्याला विरोध करावा म्हणून गोळ्यासुद्धा मारत नाही. ते काम डेफीनीट करतो. येथेच चित्रपट अपेक्षित उंची गाठत नाही.
पिच्चर बघताना एक गोष्ट सतत जाणवत होती या सगळ्या मारधाडीचा किंवा रक्ताच्या सड्याचा उपयोग काय? शेवटी आपल्या लक्षात येतं डेफीनीटच्या आईला यातून बदला घ्यायचाय. पण मग प्रश्न उरतो त्याला कोण मारणार? आपण.

मला राहून-राहून सत्या चित्रपटाची आठवण होत होती. येथेसुद्धा कथाबाह्य निवेदक कथन करतो. सत्यात ती कथा इन्स्पेक्टर खांडेलकर सांगतो पण राम गोपाल वर्मा कोणत्याही पात्राच्या भूतकाळात शिरत नाही. या चित्रपटात काहीही गरज नसताना दुय्यम पात्रांचासुद्धा भूतकाळ सांगितला जातो कथाबाह्य निवेदाकाकडून; ज्याची काहीही गरज नव्हती. फैजल खानची कहाणीच ईतकी वीरश्रीपूर्ण आहे की या उपरेपणामूळे मधे-मधे वात यायला लागतो. चित्रपटाच्या सुरुवातीला एकदा कळलं सरदार खानच्या खुनाचा तो बदला घेईल तेव्हाच चित्रपटाचा सूर कळतो. त्यासाठी उपऱ्या निवेदकाची गरज नव्हती. अनुरागला वासेपूरमधल्या गुंडांचा काळ उभा करायचा होता म्हणून तो असा उपरेपणा जोडत होता म्हटलं तरी एकूण तो काळ यथोचित उभा केल्यावर नंतर परत-परत तेच-तेच दळायची गरज नव्हती.

असो. कमालीचा तोकडा चित्रपट असंच म्हणता येईल.

ganesh August 27, 2012 at 10:31 PM  

Digamber, Kashyap is influenced by many filmmakers specially those who make crime films. Coppola, Terentino, Scorsese are definitely on the list.

Meghana , jagemule tar ahech, ani sadhya welachahi thoda probem ahe. Most important omission is the soundtrack which I wanted to write about but was not able to.

Heramb, I believe that there is a good chance that you will ike the film. Do see it.

Vivek, if I respond in detail to your issues ,it will be another article then and there. However, I know that you have strong objections and not responding at all will not be fair. First and the foremost, tula uddesh mhanje kay mhanaychay? Godfather cha uddesh kay? Reservoir dogs cha? Nightmare on Elm Street? Sholay?anyway ,evdha pure. The point is , basically all of them are just telling a story.

In fact GOW does have a more interesting agenda. He tries to tell a story in a more real way, looking at a bigger picture, at any given point. The realist approach has everything connected, and anurag tries to show these connections. Films try to see seemingly self contend stories of 1 or 2 characters. This is also true for popular fiction as well. Whereas its not true in real life. There is a lot of randomness and chain of causality is ultimately what makes any story in reality. Kashyap is always fascinated by this chain and the characters being drifted by these events with seemingly no control over them. what happens to satya, what happens to Michael, happens to faizal to an extent.

The narration tells us about the universe away from sardar and faizal which is necessary to paint a bigger picture. Post independence events which led to the coal mafia beginnings, side characters which have influence on the main story, Bollywood influence which affects the behavioral patterns of men .if u tell a story of only faizal or only sardar which RGV does to an extent ,u have a story of one man. Kashyap is trying to look at things beyond.

As far as ramadhirs attitude is concerned, I have no idea what the objection is about. There must be a point n every mans life where they just about have enough ,and want to get out of it. For a criminal ,it may be even more possible. The surrender is more of a breaking point and not an opportunity created for definite. Also ,I suspect that definite is not just taking a revenge for his mother .all his actions in the film support that he is very intelligent and may have his own interest in mind. He is his father’s son after all.

In spite of this, I have always said that u can have your own opinion about the film. AK’s films are always u either love or hate type of films and reactions can be extreme. Still you may want to examine some of the points mentioned here.

Ayub Attar August 30, 2012 at 5:43 AM  

प्रथम हात जोडून विनंती आहे कि कॉमेंट्स ला उत्तर मराठीत द्या , कमीत कमी मराठी कॉमेंट्स ला तरी . होय आमचा इंग्लिश चा प्र्ब्लेम आहे .मान्य . दुसरा अस कि जरा लेख वदावा , तिसरा अस कि तुमची पुस्तके शक्य असेलत तर ब्लोग वर टाका . मिळत नाही लायब्र रीत . चोऔथ अस कि तुमचे हार्दिक अभिनंदन .. अभिनंदन ....अभिनंदन .... तुम्ही सुधा या शेत्रात गेला

ganesh August 30, 2012 at 8:09 AM  

Ayub ,my marathi typing is very slow .hence english. I write main articles in marathi, so that should be enough. cinematic and filmmakers have long articles ,not really blog material. libraries should order from majestic or flipkart if interested. but marathi reader has more tendency to read katha, kadambari or lalit. so they may not be wanting to .cant help. everything is not for blogs. sorry.

Digamber Kokitkar August 31, 2012 at 5:14 AM  
This comment has been removed by the author.
Digamber Kokitkar August 31, 2012 at 5:16 AM  

Ayub,

Jar tumhi Marthi Granth Sangrahalyache member asal tar tumhala CINEMATIC ani FILMMAKERS miltil.

Unknown September 1, 2012 at 9:32 AM  

can anyone plz tell me the meaning of the climax scene , when the camera is focused on a Mosque , and " ik bagal me chand hoga " playing in background? i couldn't understand what kashyap wants to tell us?

Ayub Attar September 3, 2012 at 9:00 PM  


Digambar thanks for suggetion ..
Me alrady don laybrires cha menber ahe , tari tu marathi granth sangrhlyach patta , vargani ani vel kalav . pls...

Digamber Kokitkar September 9, 2012 at 8:47 PM  

Ayub,

Sorry for late reply.

Marathi Granth Sangharalay,
Shrikishna Nagar,
Near Shantivan,
Borivali (E)
Mumbai - 66
Timing. Tuesday to Sunday
Morning : 0730 to 1030 Hrs
Evening : 0430 to 0730 hrs
Monday Closed

Ayub Attar September 22, 2012 at 2:29 AM  

Thanks Digambar ... ha ha ha me punyacha ...

Ayub Attar September 22, 2012 at 2:31 AM  

Thanks Digambar ... ha ha ha me punyacha ...

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP