शटर आयलन्ड १ - आणखी एक कोडे

>> Sunday, June 6, 2010

`यू नो, धिस प्लेस मेक्स मी वन्डर, विच वुड बी वर्स, टू लिव्ह अ‍ॅज अ मॉन्स्टर, ऑर टू डाय अ‍ॅज अ गुड मॅन. -टेडी डॅनिअल्स, शटर आयलन्ड`
कादंबरीकार डेनिस लेहेन अन् चित्रपट दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेसी ही दोन्ही नावं अमेरिकन कलासृष्टीत महत्त्वाची मानली जाणारी. त्यांच्या कामाची ढोबळ जातकुळी ब-याच अंशी `थ्रिलर` या वर्गवारीत येणारी असली, तरी वाचका-प्रेक्षकाची केवळ करमणूक करणं, इतका मर्यादित अजेन्डा या दोघांचा नाही. स्कोर्सेसीचा व्यक्तिप्रधान अन् विशिष्ट स्थल-कालाशी जोडला गेलेला सिनेमा तर विख्यात आहेच. लेहेनच्या दोन कादंब-यांची हल्ली झालेली चित्रपटरुपं पाहता त्याचाही आवाका लक्षात यावा. क्लिन्ट इस्टवुडने केलेला `मिस्टिक रिव्हर` अन् बेन अ‍ॅफ्लेकने केलेला `गॉन, बेबी, गॉन` ज्यांनी पाहिले (किंवा मूळ कादंब-या वाचल्या) असतील त्यांना हे जाणवेल, की दोन्ही चित्रपटांमध्ये एक रहस्य अन् त्याचा उलगडा कथेचा अविभाज्य भाग असल्याप्रमाणे येत असूनही हे सांकेतिक रहस्यपट नाहीत. किंबहूना त्यांच्याकडे रहस्यपट म्हणून पाहणं हेच दिशाभूल करणारं अन् चित्रपटाचा प्रभाव कमी करणारं आहे.
लेहेन किंवा स्कॉर्सेसी यांच्या कामात एक सामाजिक जाणीव आहे, किंबहुना समाजातल्या एका विशिष्ट वर्गाभोवती त्यांचा आशय केंद्रीत झालेला दिसतो. तोही काहीसा रिअ‍ॅलिस्टिक पद्धतीने. शक्य तितकी अतिरंजीतता टाळून आणि समाजापुढे आरसा धरल्यासारखा. त्यामुळेच या वास्तववादी चौकटीच्या उघडच पलीकडे असणारा `शटर आयलन्ड`सारखा विषय या दोघांच्या कामाच्या आलेखात कसा अन् कुठे बसतो, हे पाहणं आवश्यक ठरतं.
शटर आयलन्डही वरवर थ्रिलर आहे. किंबहुना त्यापलीकडे जाऊन म्हणता येईल की रहस्यपट, भयपट अन् सायकॉलॉजिकल थ्रिलर या तिघांचं हे सारख्या प्रमाणात असलेलं मिश्रण आहे.
चित्रपट सुरू होतो, तो धुक्यातून बाहेर येणा-या बोटीपासून. बोटीवर आहेत टेडी डॅनिअल्स (लिओनार्डो डी काप्रिओ) अन् त्याचा सहकारी चक (मार्क रफालो) हे मार्शल्स. टेडी आणि चक एका कामगिरीवर निघालेत. `शटर आयलन्ड`वरल्या धोकादायक मनोरुग्णांसाठी असलेल्या इस्पितळातून रेचेल सलान्डो ही बाई गायब झाली आहे. तीदेखील अशीतशी नाही, तर बंद खोलीतून. अनेकांचा पहारा चुकवून. इस्पितळाचे संचालक आहेत डॉ. कॉली (बेन किंग्जली), जे वरवर तरी सर्व प्रकारची मदत करायला तयार आहेत.
टेडीचा बेटावर येण्यामागे आणखी एक हेतू आहे. त्याच्या पत्नीच्या मृत्यूला जबाबदार असणारा अ‍ॅन्ड्रयू लेडीस याच इस्पितळात आहे. त्याचा शोध हादेखील टेडीसाठी महत्त्वाचा आहे. इस्पितळाच्या वरवर शांत वातावरणामागे काही भयंकर रहस्य दडल्याचा त्याचा होरा आहे. तो खरा वा खोटा हे मात्र काळच ठरवेल.
शटर आयलन्डमधलं वातावरण, त्यातल्या उघडपणे दिसणा-या कोड्याचं स्वरूप आणि त्यातल्या अनेक दृश्यचौकटी या भयपटांची आठवण करून देणा-या आहेत. या सगळ्याची आवश्यकता आहे, ती निवेदनाला प्रवाही ठेवण्यासाठी. एका विशिष्ट दिशेने प्रेक्षकाला घेऊन जाण्यासाठी. प्रत्यक्षात इथे आपल्याला प्रथमदर्शनी जाणवणा-या गोष्टी हा केवळ एक वरचा पापुद्रा आहे. मात्र तो तसा असल्याचं जाणवू न देणं हाच इथला सर्वात मोठा चकवा आहे.
रहस्य हे बहुधा सांगण्याच्या पद्धतीत किंवा निवेदनात दडलेलं असतं. सांगणारा किंवा चित्रपटासंदर्भात बोलायचं तर लेखक/दिग्दर्शक काय सांगतो, किती सांगतो अन् कोणाच्या दृष्टिकोनातून सांगतो हे त्या रहस्याला उथळ किंवा गहिरं करून जातं. अनरिलायबल नॅरेटर ही रहस्यपटांत अनेकदा वापरण्यात येणारी क्लृप्ती, जी कथानकातला मध्यवर्ती दृष्टिकोन हाच संदिग्ध करते आणि प्रेक्षकांना गोंधळात पाडते. शटर आयलन्ड ब-याच अंशी या क्लृप्तीचा आधार घेतो. अनरिलायबल नॅरेटर वापरणारे मला आवडणारे इतर तीन चित्रपट म्हणजे `सिक्रेट विन्डो`, `सिक्स्थ सेन्स` आणि `मेमेन्टो`. शटर आयलन्ड आपल्या प्रवासात या तीनही चित्रपटांशी ठळक साधर्म्य दर्शवतो, मात्र अंमल नाही.
चित्रपट अभ्यासूंनी शटर आयलन्ड दोनवेळा पहावा असा माझा सल्ला आहे. पहिल्यांदा पाहताना जाणवणारा यातल्या अनेक गोष्टींचा अर्थ हा रहस्याच्या उलगड्यानंतर बदलून जातो. हा बदल किती चतुराईने, अन् किती तपशीलात केला आहे, हे चित्रपट दुस-यांदा पाहिल्याखेरीज स्पष्ट होणार नाही. `हायडिंग इन प्लेन साईट` हा शब्दप्रयोग इथल्या रहस्यभेदाला अचूक लागू पडेल.
स्कोर्सेसीचा `शटर आयलन्ड` मधला इन्टरेस्ट हा समजण्यासारखा आहे. त्याला विशिष्ट व्यक्तिरेखा विशिष्ट काळात जिवंत करणं आवडतं. ती संधी त्याला इथेही मिळते. १९५४मधे घडणारं हे कथानक त्या काळातल्या सर्व भल्याबु-या तपशिलांसह जिवंत होतं. त्या काळाची रहस्यपटांची शैली, प्रत्यक्ष त्या काळाचे बारकावे, मानसशास्त्रीय उपचारांबद्दलचे समज-अपसमज-गैरसमज महायुद्धाची छाया या सगळ्यांबरोबर टेडी डॅनिअल्स या आव्हानात्मक व्यक्तिरेखेला स्कॉर्सेसी आपल्या सध्याच्या आवडत्या नायकाच्या मदतीने उभा करतो. रिअ‍ॅलिस्ट, सरिअ‍ॅलिस्ट अन् एक्स्प्रेशनिस्ट अशा तीनही शैलींचा वापर तो आपल्या दृश्य भागासाठी बेमालूम करतो. खासकरून भासमय स्वप्नदृश्य विशेष पाहण्याजोगी.
लेहेनच्या इतर कादंब-यांप्रमाणेच इथेही भर रहस्याच्या उलगडण्यावर नसून संबंधित व्यक्तिरेखांच्या विश्लेषणावर आहे. त्यामुळेच निव्वळ रहस्याची उकल ही आपल्याला समाधान देत नाहीत, तर या व्यक्तिरेखांची परिस्थिती अन् पुढे ओढवणा-या प्रसंगांची चाहूल आपल्याला अस्वस्थ करून सोडते. सांकेतिक रचनेवर बेतलेल्या रंजक कोड्यांपेक्षा या प्रकारची रहस्य ही नेहमीच अधिक परिणामकारक असतात. शटर आयलन्ड त्याला अपवाद नाही.
-गणेश मतकरी. (महानगरमधून)

20 comments:

Kanchan Karai (Mogaraafulalaa) June 7, 2010 at 6:13 AM  

You are right. शटर आयलॅंड दुस-यांदा पाहिल्यावर कदाचित वेगळ्या नजरेतून प्रसंग पहाता येतील. मी सुद्धा आज शटर आयलॅंडबद्द्ल लिहिते आहे.

सिक्रेट विन्डो पहिल्या अर्ध्या तासानंतर मी बंद केला होता. बोअर होत होतं. कदाचित त्या दिवशी गूढ चित्रपट पहाण्याचा मूड नसावा म्हणून. जॉनी डेप आहे... तर पाहीन येत्या आठवडयात.

ganesh June 7, 2010 at 6:44 AM  

yes kanchan you should definitely see it. tu tuzya blogsathi lihite ahes ka elsewhere?

Anee_007 June 7, 2010 at 7:09 AM  

After you said book is too good,reading that one.I think the best thing about movie is,it never let you relax.It keeps puzzling you about what is real and what is delusion.Also as you said about new findings each times you watch it,that is perfectly true.Talking about Scorsese he was technically excellent,but he could've made this one extraordinary.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) June 7, 2010 at 8:40 AM  

गणेशजी,

सध्यातरी ब्लॉगव्यतिरिक्त इतर कुठे लिहिण्याची संधी मिळालेली नाही. काल शटर आयलन्ड पाहून झाला होता. आज/उद्या पुन्हा पहायचा आहे. माझ्या ब्लॉगवर शटर आयलन्डचं परिक्षण इथे आहे.

भानस June 7, 2010 at 1:17 PM  

गणेश,’शटर आयलन्ड ’ मला आवडला. सिनेमा आल्या आल्या लेकाने पाहिला होताच. त्याच्याकडून मी खूप चांगला असल्याचे ऐकले होतेच. त्यामुळे तो येताच मी व त्याने ( पुन्हा एकदा ) पाहिला. आवडला. परंतु एकदा पाहून बरेच प्रश्न अनुत्तरितच-अर्धवट कळल्यासारखे वाटत राहिल्याने लगेच दोन दिवसात पुन्हा एकदा पाहिला. कथा तिच पण दोन्ही वेळेस निरनिराळे अर्थ लागतात-नजरियाच बदलतो( दुस~यांदा पाहताना ) खूपच ताकदीने उभा केलायं. सगळ्यांची कामं पर्फेक्ट वठलीत. मुळात हा सिनेमा पाहताना तुम्हांला एक क्षणही चैन नसते. सारखी उत्कंठा, पुढे काय... नेमके काय घडतेयं... मला असे गतिमान व थोडे गूढ-थ्रिलर सिनेमे आवडतातच.
परिक्षण आवडले. आता पुन्हा एकदा पाहिन म्हणतेयं... :)

ganesh June 7, 2010 at 8:45 PM  

thanks bhanus ,
mulitiple viewing is a must for SI. actually the space in mahanagar(where this was originally published) is limited. i am probably writing another article which will be more elaborate for someone else. it will be on the blog shortly. but not this week.

ganesh June 7, 2010 at 8:47 PM  

apart from reading the book ,i have seen the flm thrice. the way mystery is hidden is almost amazing.

Abhijit Bathe June 7, 2010 at 9:09 PM  

Ganesh - I hate it when someone says to me that 'I have read the first para of your article, and I will write abt it when I finish reading it' My reaction then is WTF...Anyway I am doing the same to you! :))

I dont want to read the rest of the article because I havent seen the movie! I have seen Mystic River and GBG though. One thing that struck me is the (unavoidable) Boston culture in both movies. You can sense this in some other movies such as 'Goodwill Hunting'....We should talk abt this sometime.

ganesh June 7, 2010 at 9:17 PM  

yes abhijit very true. dennis lehane is a very much boston person. so much so that he has also edited a book of noir stories set in boston called boston noir. his detective fiction has lot of noir elements and a lot of boston. SI is dark but is more straightforward horror /psychological thriller combination.and no boston !!

simply nitin June 7, 2010 at 11:20 PM  

tumche dnyan tar farch achat he chutrpata vishayi. pan tumhi chtrapatache postmorum karta. tumhala tyachya vishayi prem nahi. tatasth pana. purviche sikshak kase shikavnyat hushar pan peshayshi prem nahi.

i dont knw ase lihavase vatale.

Abhijit Bathe June 8, 2010 at 12:28 PM  

Hahahaha....
I wonder how Paradiso would react to SN! :)))))))

Simply Nitin -
Well, I guess I dont have to defend GM, but here are my two cents.

Yep GM is different than other critics, but thats because he tends to a higher cinematic IQ than the others. A good movie is a big bag of goodies, which if you are not careful in analyzing, can spoil the taste of a review. Though GM does not admit it, I do consider him a critic and a reviewer. It is very difficult to maintain the balance of involvement and analysis and I think GM does a fabulous job of it. I agree with atleast 70% of his reviews. I infact find him far more involved in the movie in terms of understanding the background, literature, history and emotions. I sympathise with you if you find him 'taTastha' - one eg would be his opinions of 'Before Sunrise' and 'After Sunset'. I found the first part more emotional than the second one and I liked it better (than him - and he had his strong reasons). We shared a similar difference of opinion about 'Wednesday' and 'Mumbai Meree Jaan'. I have to admit that I did change my opinion after talking with him and watching both movies again. If you have seen these four movies and have liked 'Before Sunrise' and 'Wednesday' better, there is a good chance that you might find him 'taTastha' - but there is nothing wrong with it. What I like about him is that he doesnt write about crappy movies or doesnt botch the reviews of good ones. More importantly he doesnt shoot down good movies for preposturous reasons.

Regarding post mortem: I dont think GM does it (and I would rather have him do it that some other idiot). He generates enough interest in the movie to prompt you to watch it without revealing too much. He doesnt impose himself in his articles - he directs you to the right places. He doesnt let his database of good movies dilute or change the context of the article of a particular movie. I find him leagues ahead of others.

I didnt quite get it when you said 'purweeche shikshak'. He is definitely not like a primary teacher spoon feeding children about movies. He doesnt tell you what is good and bad, right and wrong and what you should and shouldnt watch. He treats you like an adult, makes observations and suggestions, and lets you figure out the rest.

For lack of any other example (and with due respect), if you are trying to find Prasad Namjoshi in GM, you are looking in the wrong place.

Personal advise - do watch the movies that GM is writing about even if you dont agree with him. You will probably get my point.

For Others:
Dont bitch about SN's comments. It takes guts to honestly express an opinion far different than others. GM has an exclusivity that we like (in terms of the movies that he writes about), but sometimes even I think that he would address a bit of mainstream and reduce that exclusivity a notch. I have been stressing GM about adding features and stuff on this blog that will make it user friedly and movies more accessible. He is doing a great job in replying to the comments and making suggestions about related movies to watch. I think he and this blog holds a tremendous potential in introducing general public (aka non festival watching, non movie appreciating club types) to quality movies - local, regional, national and international.

I know a number of people who read this blog and GM's articles and talk with me about them. I dont think GM needs to change a single bit, but may be a feedback blog post about what people think of his articles and movies can give him and all of us an insight into what people like and dislike about his writing. More you engage people, more they are prone to understand, appreciate and participate. I hope SN's comment and this reply to it would take the blog in that direction.

sushama June 9, 2010 at 7:31 PM  

Wow Ganesh you seem to be on way to being a cult figure.Haa Haaaa :-).
Abhijit's loooong comment piece matches with your quality.though I cant watch as many films as u people watch,yet it gives me tremendous pleasure to read about films( on Ganesh's blog) which I probably will never watch.Its like sharing an experience with friends( may be virtual)

HaRsHaD June 12, 2010 at 9:38 PM  

Matin Scorsese once again done great job......twist at the end is sinply stunning, viewer should see this movie 2-3 times so that he can enjoy the plot in diffrent views.
Acting of Leonardo DiCaprio is simply the BEST !!!!!!!
At the end one more request to you that keep on writing on indian films also, there are many good movies in india.

Unknown June 13, 2010 at 3:24 AM  

hello ganeshji plz tell me why did the lady at the time of interrogation write ''run'' on the paper and handed it over to teddy?

Pradip Patil June 13, 2010 at 8:57 AM  

Read ur article in loksatta.. you mentioned that the director has added a single line at the end of film which is not in the book. I haven't read the book.

Is it the last line by teddy, the one about the being the monster/human?

ganesh June 13, 2010 at 12:22 PM  

thanks abhijeet and sushama .

harshad, point duly noted.

spoiler alert --

Asclepius, explaination should be self evident. the lady is an inmate, so she has a clear idea of what is happening. she is trying to warn teddy ,that this is his only chance to escape..

and pradip , that's the last line. the one mentioned in the beginning of this post. book ends with a relapse (chuck saying we are too smart for them) ,the film questions and argues sanity with added sentence and deepens the tragedy.
(i hope this doesnt reveal too much for those who havent seen the film, and may read this)

simply nitin June 15, 2010 at 5:18 AM  

abhi

i get to knw abt films here in marathi in detail. thats really enjoyable for me.

thanx for you explanation, that was too heavy. thodkyat lihile aste tari chalale aste pan tumha critics lokana te shakya nahi.

:-)

Shraddha Bhowad November 19, 2010 at 4:35 PM  

- गणेश मतकरी
मी ’शटर आयलॅंड’ दोनदा पाहिला. एकदा पाहून समाधान झाले नाही म्हणून.
एकदा पाहिला- कळला.

दुसर्यांदा पाहिला- पहिल्यांदा पाहिला असल्याने आणखी वेगळ्या पद्धतीने कळला.
रेचल परत आलीये हे कळल्यावर तिच्या आणि
टेडीमधल्या भेटीत ऍंन्ड्र्यू लॅडीस ऑलमोस्ट सरफ़ेस होताना दिसतो जो पहिल्यांदा पाहताना मानसिक रुग्णाशी वागण्याच्या टॅक्ट्चा भाग वाटतो. आणखीनही काही गोष्टी. उदा. मिसेस केर्न्स, टेडी क्वेश्चनिंग करतानाचा स्टाफ़चा indifference, पिक्चरच्या सुरुवातीलाच ती रहस्यमय (आणि भयानक) दिसणारी बाई टेडीला ’श्शूSSSS!’ का करते? वगैरे.

मेबी तिसर्यांदा पाहीन तेव्हा पहिल्या दोन बघण्यामधल्या सुटलेल्या गोष्टी कळतील आणि तो आणखी कळेल.

Reality and Surreality was fab! टेडीची स्वप्नं, स्वप्नाच्या thresholdवर वास्तवाशी सामना, स्वप्नं आणि वास्तव यांना बांधून ठेवणारा क्षीण धागा, त्याला पकडून ठेवायची
टेडीची धडपड,धाडकन वास्तवात आल्यावरचा tremulous टेडी हे सर्व इतकं इतकं बांधून ठेवतं की भाबडेपणे "काहीही शेवट असू देत बाबा! हा सुटू देत यातून" असंच वाटत राहतं.

टेडीकडून ’confess’ करुन घेण्याचा भाग मात्र खूप obvious वाटला.ब्लो बाय ब्लो प्रेक्षकाला स्पष्टीकरण दिल्यासारखा. ’मेमेंटो’सारखं interpretation आपल्यावर सोडलं असतं तर काय झालं असतं?

Ashish February 10, 2011 at 1:07 PM  

दुसऱ्यांदा पाहताना लई वेळा "वाह.. सही" असे वाटते..
त्यातली एक म्हंजे, सुरुवातीला मेन बिल्डिंग मध्ये जाताना गार्ड दोन्ही मार्शल्स ला रीवॉल्वर जमा करायला सांगतात. आणि मार्क रफालो ते काढताना अडखळतो, आणि मग टेडीचे आणि गार्ड चे अवघडलेले भाव..
मस्त..

Sumit April 22, 2011 at 12:11 PM  
This comment has been removed by the author.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP