द प्रेस्टीज - आर यू वॉचिंग क्‍लोजली?

>> Sunday, July 4, 2010

चित्रपट चांगल्या दिग्दर्शकाने बनवला असला, तर तो अंतिमतः सर्वच बाबतींत यशस्वी झाला नाही, तरी त्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या असतात. त्यातलं दिग्दर्शकाचं कौशल्य हे कौतुक करण्यासारखं असतं. किंबहुना अनेकदा या चित्रपटांचं अपयश हे एखाद्या सामान्य कुवतीच्या दिग्दर्शकाच्या यशापेक्षाही अधिक नेत्रदीपक असतं. क्रिस्ट्रोफर नोलानचा "द प्रेस्टीज' हे अशा भव्य अपयशाचं उदाहरण म्हणावं लागेल.
"द प्रेस्टीज'मध्ये आपलं लक्ष खिळवून ठेवणाऱ्या खूप जागा आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला घडणाऱ्या कथानकात जान आणण्यासाठी बारकाईने उभारलेले कालाचे तपशील आहेत, नोलानच्या गाजलेल्या "मेमेन्टो' प्रमाणे एका रेषेत न उलगडणारी पटकथा आहे, उत्कृष्ट चित्रीकरण आहे, तोडीचा अभिनय आहे, दिग्दर्शकीय दृष्टिकोनही आहे. पण तरीही चित्रपट आपल्या शेवटात कमी पडतो. आणि या कमी पडण्याची मुळं त्यांच्या एकूण आकारातच जागोजाग पसरलेली आहेत.
प्रेस्टीजचं कथानक हे दोन जादूगारांशी संबंधित आहे. रुपर्ट (ह्यू जॅकमन) आणि आल्फ्रेड (क्रिश्‍चन बेल) या दोघांच्या एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नांवर हा पूर्ण चित्रपट आधारित आहे. मात्र त्याची रचना ही खास आहे. चित्रपटाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही जादूचे तीन भाग असतात. द प्लेज, द टर्न आणि द प्रेस्टीज. प्लेज म्हणजे तयारी, सेट अप, जिथे जादूगार प्रेक्षकांना विश्‍वासात घेऊन आपण काय करणार आहोत हे सांगतो, त्यांच्या मनाची तयारी आणि थोडी वातावरणानिर्मिती करतो. टर्न ही प्रत्यक्ष जादू. म्हणजे एखाद्या वस्तूला अदृश्‍य करायचं, तर ते करण्याची क्रिया म्हणजे टर्न. मात्र ही प्रक्रिया "टर्न'मध्ये पुरी होत नाही. प्रेक्षक जादूगाराला तेव्हाच मानतो, जेव्हा तो ही अदृश्‍य वस्तू पुन्हा दृश्‍य करेल, प्रेक्षकांसमोर सादर करेल. हा तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेस्टीज, जो जादूगाराची जादू पूर्णत्वाला नेईल.
प्रेस्टीज चित्रपटात दिग्दर्शकाने जादूची ही तीन भागांतली रचनाच आपल्या पटकथेच्या ढाच्यासाठी वापरली आहे. पटकथेच्या पहिल्या भागात रुपर्ट, त्याची बायको आणि आल्फ्रेड हे एका जादूगाराचे मदतनीस म्हणून काम पाहत, आपणही मोठे होण्याची स्वप्नं पाहताहेत. एकदा आल्फ्रेडच्या चुकीमुळे रुपर्टच्या बायकोला आपला प्राण गमवावा लागतो आणि रुपर्ट पिसाळतो. दुसऱ्या भागात रुपर्ट कोलोराडो स्प्रिंग्जमध्ये निकोला टेस्ला या वैज्ञानिकाच्या शोधात येऊन पोचला आहे. टेस्लाने आल्फ्रेडला त्याच्या एका प्रयोगासाठी एक चमत्कारी यंत्र बनवून दिल्याचा रुपर्टला सुगावा लागलेला आहे, आणि रुपर्ट टेस्लाचं मन वळवून त्याहूनही चांगलं यंत्र बनवून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. आणि तिसऱ्या भागात रुपर्ट आपल्या जादूच्या प्रयोगादरम्यान मरण पावलेला आहे, आणि याचा आळ आल्फ्रेडवर आहे. आल्फ्रेडला यात मृत्युदंड मिळण्याची शक्‍यता फारच मोठी आहे.
आता ही मुळातली तीन भागांतली रचनादेखील दिग्दर्शकाने जशीच्या तशी वापरलेली नाही, तर तिचे अनेक तुकडे करून त्यांना पुढेमागे पसरून विषयाची गुंतागुंत चिकार वाढवली आहे. ही गुंतागुंत वाढवण्याचा उघड हेतू म्हणजे, यातलं रहस्य या गुंत्याआड लपवणं. दुर्दैवानं ते लपत तर नाहीच, वर चित्रपटाच्या "आर यू वॉचिंग क्‍लोजली' या टॅग लाइनला अनुसरून क्‍लोजली पाहणाऱ्यांना ते हळूहळू स्पष्ट दिसायला लागतं. तरीही मी म्हणेन की चित्रपट फसतो तो यामुळे नाही, निदान केवळ यामुळे नाही.
प्रेस्टीजमध्ये दोन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत आणि त्यांची स्वतंत्र रहस्य आहेत. आल्फ्रेडचं रहस्य हे त्या मानानं साधं असलं, तरी चित्रपटाच्या तर्कशास्त्रानुसार अतिशय योग्य म्हणता येईलसं आहे. ते ओळखण्यासाठी दिग्दर्शकानं अनेक खुबीच्या जागा शोधल्या आहेत, ज्या एक तर अप्रत्यक्षपणे रहस्याकडे बोट दाखवतात. किंवा त्यांचं तर्कट हे रहस्याच्या उलगड्याशी समांतर जाणारं आहे. पिंजऱ्यासकट पक्षी गायब करण्याची जादू ही यातली अशीच एक जागा, जिचा संदर्भ सरळ पाहता स्पष्ट होत नाही; पण पुढे तिचा अनेक पदरी अर्थ आपल्याला जाणवायला लागतो.
याउलट रुपर्टचं रहस्य हे उगाचंच गोंधळ वाढवत नेणारं, आणि अंतिम क्षणी तकलादू ठरणारं आहे. या रहस्यातली सगळ्यात मोठी अडचण म्हणजे, यातल्या जादूचं विज्ञान काल्पनिकतेकडे किंवा सायन्स फिक्‍शनकडे झुकणं. प्रेस्टीजचा इतर सर्व भाग, हा अमुक काळात घडणारी एक थरारक गोष्ट म्हणून योग्य वाटणारा आहे. मात्र रुपर्टचं टेस्ला प्रकरण हे या कथेच्या मूळ प्रवृत्तीलाच अपायकारक ठरतं. शिवाय या प्रकरणाला समाधानकारक तिसरा अंकच नाही. "लक्षपूर्वक पाहणाऱ्याला' टेस्लाचं यंत्र काय करतं, आणि त्याचे परिणाम काय होणार, याचा पत्ता सहजपणे लागतो. खरंतर एका अर्थानं पाहायचं तर हा भाग विचार करायला लावणारा आहे. विज्ञानानं जादूची जागा घेणं, आणि खोट्या जादूची सवय झालेल्या जादूगारांनी आणि प्रेक्षकांनीही खरी जादू समोर येताच हतबल होणं, या दोन्ही कल्पना उत्कंठावर्धक आणि कथा पुढे नेण्याची शक्‍यता असणाऱ्या आहेत. मात्र त्यांचा म्हणावा तितका वापर "प्रेस्टीज' करत नाही.
त्यामुळे अखेर "प्रेस्टीज'चं स्वरूप दोन भिन्न प्रकृतीच्या रहस्यांचं सोयीनुसार केलेलं मिश्रण, असं होतं आणि चित्रपट फसतो.
तरीही "प्रेस्टीज' पाहताना आपण कंटाळत नाही. क्रिस्ट्रोफर नोलान त्याच्या पोतडीतल्या अनेक करामतींनी आपल्याला पाहतं ठेवतो. कथानकाच्या गुंतागुंतीत एक प्रकारचा उथळपणा असला तरी प्रमाणबद्धता आहे. उदाहरणार्थ तीनही भागांना जोडणारं डायरीवाचन. रुपर्टनं टेस्लाकडे जाताना वाचलेली आल्फ्रेडची डायरी, आणि आल्फ्रेडनं तुरुंगात वाचलेली रुपर्टनं टेस्लाबरोबर घालवलेल्या काळाची डायरी, यांचा पटकथेतला वापर वाखाणण्याजोगा आहे. हे वाचन केवळ प्रसंगांना एकमेकांशी जोडत नाही, तर आपल्याला घडलेल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोन देतं.
त्याचप्रमाणे यातल्या घटनांचा वेग आणि जागोजागी येणारी अनपेक्षित वळणं जरी आपल्याला यातल्या व्यक्तिरेखांच्या भावनिक बाजूशी समरस होऊ देत नसली (ही चित्रपटातली एक मोठी त्रुटी आहे) तरी या पटकथेच्या पसाऱ्याचा प्रेक्षकांना सहज समजलेशा रीतीनं ठेवलेला माग, हीदेखील गोष्ट पाहण्यासारखी आहे.
चित्रपटात आणखी एक लक्षात घेण्याजोगा मुद्दा आहे, जो नोलान पूर्णतः विचारात घेत नाही, केवळ एका ठिकाणी उल्लेख करून सोडतो, तो म्हणजे यातल्या नायकांच्या झपाटलेपणाचं स्वरूप. यांच्या वैराची सुरवात होते. ती रुपर्टच्या पत्नीच्या मृत्यूमुळे आणि या गोष्टीसाठी आल्फ्रेडचा बदला घेणं, हेच त्याच्या डोक्‍यात असतं. मात्र पुढे हा बदला निमित्तमात्र उरतो आणि दोघे केवळ एकमेकांचे पाय ओढणं, याला जीवनाची इतिकर्तव्यता मानायला लागतात. रुपर्ट जेव्हा आपल्या सहायिकेला (स्कार्लेट जोहान्सन) आल्फ्रेडचं रहस्य शोधण्यासाठी हेर म्हणून पाठवायचं ठरवतो, त्या प्रसंगात हे उघड होतं. रुपर्टचा हेतू आता केवळ बदल्यापुरता उरलेला नाही. हा प्रसंग महत्त्वाचा आहे. तो या कथासूत्राच्या कथेच्या चौकटीबाहेरही खरा असल्याने माणसं चुकीचा रस्ता निवडताना अमुक एक कारण पुढे करतात, ते अनेकदा केवळ त्यांच्या मनाचं समाधान करण्यापुरंत खरं असतं. पुढे कारण विस्मृतीत जातं, पण रस्ता सुटत नाही.
"प्रेस्टीज' हा नोलानचा सर्वोत्तम चित्रपट निश्‍चित नाही, तो मान आज तरी काहीशा प्रायोगिक, पण अतिशय लोकप्रिय ठरलेला मेमेन्टोकडे जातो. किंबहुना गुणवत्तेनुसार याचा नंबर बराच खाली लागेल. तरीही "प्रेस्टीज' पाहण्यासारखा ठरतो. याचं कारणही नोलानच. मी मघा म्हटल्याप्रमाणे या अंतिमतः फसलेल्या चित्रपटातही अनेक गोष्टी घेण्यासारख्या आहेत. अर्थात आपण लक्ष देऊन पाहिलं तरंच. "सो, आर यू वॉचिंग क्‍लोजली?'

-गणेश मतकरी

22 comments:

crazygamers July 5, 2010 at 4:42 AM  

I was just about to request you to write about this film beacause i watched it last week.I loved the concept of 3 parts in the magic.I guess the film was the beginning of Nolans's career, and he beacame better later on.I feel that all Nolan's films closely relieve mindsets of the lead characters.

ganesh July 5, 2010 at 7:48 AM  
This comment has been removed by the author.
ganesh July 5, 2010 at 7:55 AM  

not at all ajinkya. he was always good . 'memento' was his second film. 'the following' is first, and is a very smart cult mistery. if u r interested in his career, u must see 'the following'.after that ,he did the remake of the norwegian film 'insomnia' and 'batman begins' ,with which ,he really turned main stream. that probably made him a bit careless, thats why the next film he did was the prestige. as i have said, even prestige has a lot going for it, but the main weakness is the script. (interestingly, around the same time, another movie with magicians and twist endings came, which had a much better script. it was called illusionist.)after prestige, second batman and now the inception ,releasing next week. so if the inception lives upto the hype, prestige is the only weak film in his entire career so far.

Abhijit Bathe July 6, 2010 at 12:39 PM  

I tried prestige because of nolan but, but couldnt help but sleep through most of it. After Following and Memento - Prestige? It was a disappointment. I didnt like the trailer of the forthcoming one either. But I am going to give it a try for Nolan.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) July 6, 2010 at 11:21 PM  

काल हे परिक्षण ओझरतं वाचलं आणि मग चित्रपट पाहिला. चित्रपटातले सुरूवातीचे जादूचे प्रयोग पहातानाच जादूगारांविषयी मनात एक प्रश्न निर्माण झाला होता आणि नेमकं तेच चित्रपटातलं रहस्य निघालं ;-). कदाचित इतर प्रेक्षकांचंही तसंच होत असावं. डायरीचा भाग चित्रपटात नसता तर चित्रपटात सलग न येणारी कथा (वर्तमानकाळ, चालू वर्तमानकाळ, भूतकाळ, भूतकाळात भूतकाळ) प्रचंड गोंधळ उडवून गेली असती असं वाटलं. पण तो भाग दिग्दर्शकाने खूप प्रभावीपणे सादर केला आहे.

१. अल्फ्रेड आपलं सर्वस्व गमावून रूपर्टचा कट्टर बदला घेण्याचं ठरवतो कारण त्याच्याकडून पूर्वी जे घडलेलं असतं, ती एक चूक असते; त्या चुकीसाठी त्याला अपराधीही वाटत असतं. पुढेदेखील तो ’जादू’च सादर करतो, विज्ञान नाही. पण रुपर्ट मात्र सुरूवातीचं वैराचं मूळ कारण बाजूला सारून केवळ कुरघोडी करण्यासाठी अल्फ्रेडला आडवा येतो, तिथे रूपर्ट अल्फ्रेडच्या मनातून उतरतो आणि त्याच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना नाहीशी होते. रूपर्ट बदला घेण्यासाठी अल्फ्रेडच्या यंत्रापेक्षाही जास्त शक्तीशाली यंत्र बनवून घेतो आणि त्याच्या परिणाम प्रेक्षकांना खूप आधीच कळतो. पत्नीचा मृत्यू रूपर्टबद्दल प्रेक्षकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतो आणि त्याच्या संघर्षाला, बदला घेण्याच्या प्रवृत्तीला एक सात्विक वलय देतो. हीदेखील दिग्दर्शकाची एक जादू किंवा हातचलाखीच म्हणावी लागेल कारण या सात्विक वलयाला भेदून रूपर्टचा वेगळ्या अंगाने विचार करावा असं आपल्याला पाऊण चित्रपट संपेपर्यंत वाटत नाही. कथानकात शेवटी रूपर्टचं रहस्य (ज्याचा प्रेक्षकांना आधीच अंदाज आलेला असतो, तरीही ते त्या सात्विक वलयासाठी खोटं ठरावं अशी त्यांची इच्छा असते.) उघड होतं, तेव्हा रहस्य लपवून ठेवण्यासाठी रूपर्ट काय करतो, हे कळल्यावर रूपर्ट आपोआपच खलनायक वाटायला लागतो.

२. जादूगार जे करतो ती जादू नसते तर हातचलाखी असते, हे प्रेक्षकाला माहित असतं. प्रेक्षकाच्या ज्या टाळ्या असतात त्या या जादूरुपी हातचलाखीसाठीच असतात पण जेव्हा या हातचलाखीच्या जागी शंभर टक्के विज्ञान सादर केलं जातं, तेव्हा ती जादू असत नाही. एकदा विज्ञान कळलं की ’हे काय कोणताही शास्त्रज्ञ शकेल’, अशी प्रेक्षकाची भूमिका होते. कारण जादूगार जे करु शकतो, ते शास्त्रज्ञ करू शकत नाही आणि लोकांना जादूगाराकडून स्वत:ला फसवून घेऊन स्वत:चं मनोरंजन करायचं असतं. जादूसाठी जी हातचलाखी लागते, ती विज्ञानात असत नाही. विज्ञान वापरून केलेली जादू हा अचूक शास्त्रीय गणितांचा सेट अप असतो. पण ’ही जादू नाही तर विज्ञान आहे’ हे शंभर प्रयोग होईपर्यंत प्रेक्षकांना माहित झालेलं असतं, तरीदेखील कुणीही ते विज्ञान जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करत नाही (तोच चित्रपटाच्या शेवटाचा आधार आहे पण) ज्यांच्यासमोर या जादूरूपी विज्ञानाच्या प्रयोगाची ट्रायल होते, त्या शहरातील जबाबदार आणि प्रतिष्ठीत नागरिकांनाही, हे विज्ञान माहित करून घ्यावंसं वाटत नाही.

या दोन कारणांमुळे चित्रपट फसला असं मला वाटतं.

Anee_007 July 7, 2010 at 7:00 AM  

Lot of people have same kind of problem with this movie,they don't watch movie closely.They don't get the concept of duplication by the Great Nikolas Tesla's Machine.Actually nearly every viewer thinks it is an Clone machine,but it isn't.Only thing that can be done with trap door functionality(said by Tesla in movie)is duplication just copy.Again another thing that people thought was unnesseccary was their prolonged rivalry.Now just tell me if movie is based on friendship turned rivalry how can he exempt rivalry?
Talking about Prestige,It was Best in Pledge,better in turn and good in prestige but still as Nolan fan I loved this one.Haven't seen Illusionist.

ganesh July 7, 2010 at 11:29 AM  

everyone,
like i already said,
its the worst film of nolan so far (AB ,i think inception will be fairly good) but i think it still displays a certain wizardry of the maker. i wont dismiss it as just another movie. without going into more details, let me just say that every film , establishes a set of rules at the beginning. they maybe straightforward , twisted or fantastic according to the genre and type of the film. some of them r more general, others specific to the particular film. a successfull film follows these rules without fail.it reaches a satisfactory conclusion remaining within its parameters.(yes, there r exceptions, but very few)prestige fails because it breaks these rules. that too ,in a casual way, dismissing their seriousness. it doesnt have a brilliant reason to do this. audience feels cheated by this attitude of the film ,and dislikes the film.result, the movie fails.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) July 8, 2010 at 12:35 AM  

क्लोनिंग असो वा ड्युप्लिकेशन. जिथे दुसरा मनुष्य मूळ मनुष्याच्याच भाव भावनांसहित तयार होतो, तेव्हा त्याला मनुष्यच समजलं जाणार. अशा मनुष्याला संपवणं म्हणजेच मनुष्यवध करणं इतकं सरळ लॉजिक प्रेक्षक वापरतो (रूपर्ट प्रत्येक वेळी स्वत:लाच संपवतोय, हे प्रेक्षक समजून घेत नाही) म्हणून रूपर्ट खलनायक ठरतो.

चित्रपटाचा गाभा दोन मित्रांमधील शत्रुत्व हा होता पण सादरीकरणात त्या शत्रुत्वाचं कारण बाजूला होऊन केवळ करायची म्हणून शत्रुता केली गेलेली दाखवली आहे. उद्देश हरवल्यावर नायक आणि खलनायकातील फरकच नाहीसा झाला तर शेवटी कुणीही जिंकलं किंवा हरलं तर काय फरक पडतो? त्यातही पुन्हा ज्याला खलनायक समजलं तोच शेवटी नायक झाला, तर त्यासाठी सबळ कारण हवं. रूपर्ट खलनायक झाला हे ठीक आहे पण अल्फ्रेड नायक कसा होऊ शकतो? या विचारांच्या गुंत्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट स्विकारला नसावा. प्रेक्षकाला आशावादी शेवट हवा असतो. मला वाटतं पहिल्या दिवसानंतर केवळ माउथ पब्लिसिटीमुळे हा चित्रपट पडला असावा.

Anee_007 July 8, 2010 at 7:55 AM  

Kanchan you're confused between Enmity and Rivalry.In first scenario that definitely was enmity and then everything that happens was rivalry.Two persons of same field will definitely try to outnumber each other.That is what is rivalry.Plus he have his own vendetta towards Alfred.So this is what Nolan tries to tell,He is both rival and Enemy.Also he is killing his own duplicates(okay that is Inhuman)but at the same time we forget what Nolan is pointing at.he is just showing,at what extent one can go to win over his rival and this time Alfred is his malefactor too.and this was the negative point where everything failed.
Distinguishing between good and evil is not always nessecary.Every single character is good through his own perspective,So either you watch it from Alfred's view or Robert's both are good,but as a third person both are evil.So as a result it failed to show the rift between good and evil,which is as said by Ganesh sir is breaking these rules and became uncosumable to viewers.

ganesh July 8, 2010 at 8:10 AM  

kk and anee,

for those who havent seen the film yet, lets not reveal too many details.

Kanchan Karai (Mogaraafulalaa) July 8, 2010 at 9:37 AM  
This comment has been removed by the author.
Pratham July 9, 2010 at 12:34 PM  

spoilers शिवाय या चित्रपटाबद्दल बोलणं अशक्य आहे.
मूळ पुस्तकापेक्षा अधिक चांगला चित्रपट कारण ही फार कठीण गोष्ट नोलानने जमवून आणली आहे.मूळ लेखकानेदेखील हे मान्य केला आहे.
मला स्वतःला रॉबर्ट अँजीअर अधिक आवडला.निदान तो बाकीच्यांच्या आयुष्याला वेठीला धरत नाही.आणि त्याची philosophy की 'तुम्हाला किती माहिती आहे यापेक्षा तुम्ही लोकांना आनंद देता का हे जास्त महत्वाचं'(हे चित्रपटांना पण लागू पडतं).आणि याच philosophy मधून आलेलं,स्टेजवर अभिवादन घेण्याचं obsession हे ह्यु जॅकमनने मस्त दाखवलं आहे.
शिवाय तो जरी जादूचा प्रयोग सादर करत असला तरी या trick च्या आधी तो सांगतो कि तो आता जे करणार आहे ती जादू नाही.पण लोकं अर्थात ते मान्य करणार नाहीत.का?त्याचं उत्तर अँजीअर आणि टेस्ला यांच्या एका संभाषणात आहे.
डेव्हिड बोवीचा टेस्ला सीन खाऊन टाकतो.टेस्ला आणि एडिसनमधील शत्रुत्व हे मध्ये एकदा फार थोड्या काळासाठी दाखवला आहे पण चित्रपटाच्या थीम्समध्ये अचूक बसतं.अनेक गेम्स,चित्रपट आणि विज्ञान काल्पानिकांनी वापरलेलं हे character (खरतरं वल्ली) इकडे प्रभावीपणे येतं.
http://en.wikipedia.org/wiki/Nikola_Tesla
http://en.wikipedia.org/wiki/Nikola_Tesla_in_popular_culture

माझ्या मित्रांच्या मते मी एकदा नोलानच्या चित्रपटांबद्दल चालू झालो कि थांबत नाही.पण याहून अधिक बोलणं अशक्य आहे कारण ज्यांनी अजून बघितला नाही त्याची मजा जाईल.
तरीपण १:४३:२० ला चालू होणारा सीन आणि १:५३:४० चा सीन हे उत्तर देतादेताच गोंधळात पण पाडतात.
Funny Fact:हा नोलानचा सर्वात वाईट चित्रपट आहे.कारण RottenTomatoes वर याची rating ७५% आहे.त्याउलट मायकल बेचा सगळ्यात चांगला चित्रपट 'द रॉक'ची ६०% आहे.

ganesh July 9, 2010 at 7:00 PM  

one thing i can suggest is that if anyone wants to discuss in detail ,they should simply mention spoilers warning at the beginning of the comment. So those who havent seen can skip those comments.

Pradip Patil July 10, 2010 at 8:59 AM  

How can Prestige be Nolan's worst film? seriously?Why compare one film with another?

For me Prestige was an amazing experience, especially towards the end it got very intense.

I was shocked to see Robert going to such an extreme.It took the film on a different level for me.

spoiler
It took courage to climb
into that machine every night,not knowing if I'd be the man in the box or in the prestige.

spoiler

ganesh July 10, 2010 at 1:29 PM  

pradip , i said'चित्रपट चांगल्या दिग्दर्शकाने बनवला असला, तर तो अंतिमतः सर्वच बाबतींत यशस्वी झाला नाही, तरी त्यात अनेक गोष्टी पाहण्यासारख्या असतात. त्यातलं दिग्दर्शकाचं कौशल्य हे कौतुक करण्यासारखं असतं. किंबहुना अनेकदा या चित्रपटांचं अपयश हे एखाद्या सामान्य कुवतीच्या दिग्दर्शकाच्या यशापेक्षाही अधिक नेत्रदीपक असतं.' and pratham seconds with the fact'हा नोलानचा सर्वात वाईट चित्रपट आहे.कारण RottenTomatoes वर याची rating ७५% आहे.त्याउलट मायकल बेचा सगळ्यात चांगला चित्रपट 'द रॉक'ची ६०% आहे.'.....
u may have easily liked the film ,because there r several likable things in it. though ultimately this is not as good as the rest of nolan films and to an extent ,it cheats.even from nolan, u can expect all mementos and dark knights. bound to be highs and lows.

Pradip Patil July 11, 2010 at 11:31 AM  

ok.. as long as you are labeling things on the basis of IMDB and Rotten Tomatoes I don't care.

But I strongly object when you judge a film based on the film maker's previous films. Every subject is different.

Could you please elaborate on how does the film cheat?

And I am waiting for the day you write about Insomnia. Or have you done that earlier?

ganesh July 12, 2010 at 1:52 AM  

Pradip,
if u read my comment carefully, u will realise that i am making a diffrent point about the quality of the filmmaker and not of the film. the rating of rotten tomatoes is pointed out by pratham which substantiates the argument in my artical.

you have full right to object to whatever u want as i prefer not to force my opinions on anyone.i just write whatever i feel about these films.
judging a film is diffrent and considering the overall performance of a director and a particular films place in total graph is diffrent.
i have pointed out in my articl and in one of the comments how the film cheats ,without revealing too many details. basically it starts with one grammer and ends with another. i wont go to specific detail here. i havent written about the insomnia.neither nolan's ,nor the original.so far. i have liked both.

Pratham July 20, 2010 at 1:57 PM  

मला अजूनपण काळात नाही की चित्रपट कुठे फसवातो ते.इल्ल्यूजनीस्ट बघितला नव्हता तो बघितला.तो बघितल्यावर प्रेस्टीज अजून खरा वाटायला लागला.

ganesh July 24, 2010 at 9:31 AM  

maybe i will need to write an extensive spoiler extension for this post. will soon.

हेरंब August 11, 2010 at 10:15 AM  

कालच बघितला.. अप्रतिम आहे.. मला फार आवडला. मोमेंटो आणि फॉलोइंगची सर याला नक्कीच नाही पण तरीही चित्रपट अतिशय सुरेख आहे. जादू मधले तीन टप्पे, टेल्साचं मशीन, शेवटचं रहस्य हे सगळे प्रकार मला खुपच आवडले..

जाताजाता, माझ्या मते इन्सोम्निया हा नोलानचा सर्वात बंडल चित्रपट आहे. अतिशय सामान्य वाटला. नोलानचं नाव वगळून पहिला तर ठीक आहे पण नाहीतर फारच टाकाऊ वाटला.

विषयांतर : तुम्ही पाय (http://www.imdb.com/title/tt0138704/) बद्दल लिहिलं आहेत का ब्लॉगवर? मला त्याची कन्सेप्ट आवडली पण शेवटी शेवटी भलताच वहावत गेल्यासारखा वाटला. किंवा मला नीट कळला नसेल. जमलं तर पाय बद्दल लिहू शकाल का?

ganesh August 24, 2010 at 8:22 PM  

heramb, me insomniala takau nakkich mhannar nahi. its an interesting film with a very diffrent background for that type of film.though its an unlikely material for a Nolan film and is necessarily on a diffrent track than a hollywood packaged product , thats the reason u may have found it odd. that mainly because its not an original film but a remake of the norwegian film by Erik Skjoldbjærg of the same name. I think I have written about PI. as to whether its on the blog i dont really know. will check if Paradeso remembers it.

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP