द इन्सेप्शन- आर यू (स्टिल) वॉचिंग क्लोजली?
>> Sunday, July 18, 2010
फेसाळणा-या लाटा. जणू या लाटांनी वाहून आणल्यासारखा कुणीतरी समुद्रकिना-यावर पडलेला. आपला थकलेला चेहरा वर करून तो समोर पाहतो. वाळूत दोन लहान मुलं खेळताहेत. पाठमोरी. त्यांचे चेहरे आपल्याला दिसत नाहीत. याक्षणी आपल्या लक्षात येणार नाही, पण `चेहरे न दिसणं` हा तपशील खूपच महत्त्वाचा.
जवळजवळ लगेचच कोणीतरी बंदुक रोखतं, अन् या थकलेल्या माणसाला ताब्यात घेतलं जातं. एका प्रचंड सजलेल्या डायनिंग रुममध्ये कोणा वृद्ध जपानी गृहस्थासमोर आणून बसवलं जातं. थकलेल्या माणसाकडे सापडलेली गोष्ट म्हणून समोर ठेवली जाते, एक छोटीशी भिंगरी. वृद्ध ही भिंगरी ओळखतो. त्याने ती अनेक वर्षांपूर्वी पाहिलेली. त्याच्या तरुणपणी.
प्रेक्षकांना एव्हाना लक्षात यायला लागतं की आपल्यापुढे एकामागून एक ब-याच गोष्टी मांडल्या जातायत, ज्यांचा अर्थ आपल्याला आता समजला नाही, तरी त्यांची नोंद घेणं बहूदा खूपच आवश्यक आहे. प्रसंगाप्रसंगाबरोबर गुंता वाढत जाताना मग आपण सारं काही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायला लागतो. किना-यावरची पाठमोरी मुलं, वृद्धाचं वक्तव्य, भिंगरी, खोलीची सजावट, सारं सारं. आणि खरोखरंच त्यातल्या प्रत्येक गोष्टीला पुढे पटकथेत स्थान आहे. अगदी महत्त्वाचं. त्यामुळे चित्रपटाला पहिल्या सेकंदापासून आपण जितकं लक्षपूर्वक पाहू तितकी तो आपल्याला समजण्याची अधिक शक्यता आहे. क्रिस्टोफर नोलानच्या `द प्रेस्टीज` चित्रपटाची टॅगलाईन होती `आर यू वॉचिंग क्लोजली?` हा प्रश्न इन्सेप्शनच्या प्रेक्षकांनाही विचारण्यासारखा आहे. ` आर यू (स्टिल) वॉचिंग क्लोजली?`
क्रिस्टोफर नोलानचा `द इन्सेप्शन` हा सायन्स फिक्शनचा अवतार धारण करणा-या, पण प्रत्यक्षात तत्त्वचिंतनात्मक विषय केंद्रस्थानी असणा-या चित्रपटांच्या परंपरेतलाच एक आहे. अनेकदा. या चित्रपटांचं वैज्ञानिक रुप इतकं अस्सल असतं की `सायन्स फिक्शन` हा या चित्रपटाचा मर्यादित अजेंडा असल्याचा भास, ते पाहणा-याला व्हावा. प्रत्यक्षात त्यांची मजल एका विशिष्ट चित्रप्रकारापुरती अन् केवळ रंजनमूल्यांपुरती न राहता अधिक गहन विषयापर्यंत पसरलेली दिसते. क्लार्क/क्युब्रिकचा `२००१ः ए स्पेस ओडिसी`, फिलिप के. डिक/रिडली स्कॉटचा `ब्लेडरनर` वाचोस्की बंधूंचा `द मेट्रिक्स`, डिक/लिन्कलेटरचा `ए स्कॅनर डार्कली` अशी या चित्रपटांची अनेक उत्तम उदाहरणं देता येतील. क्रिस्टोफर नोलानचा नवा चित्रपट ही या यादीतली सन्माननीय भर ठरावा.
प्रसिद्ध गुन्हेगारी कथालेखक रेमन्ड चॅन्डलर यांनी आल्फ्रेड हिचकॉकबद्दल म्हटल्याचं ऐकिवात आहे, की त्याच्या कोणत्याही चित्रपटाचं रुपांतर, हे अखेरीस एका पाठलागात होतं. क्रिस्टोफर नोलानच्या चित्रपटांबद्दल उलट म्हणावं लागेल. त्याचे बहुतेक चित्रपट सुरुवातीपासूनच एका मोठ्या पाठलागासारखे `चेज मुव्हीज` असतात. मात्र त्यांच्या उलगडत जाण्याबरोबरच आपल्या लक्षात येतं, ते हा पाठलाग दुय्यम, केवळ एक रचना म्हणून वापरण्यात आल्याचं. नोलानचा आशय हा या रचनेपल्याड जाणारा, खूप गुंतागुंतीचा, अन् तरीही गुंतवणारा असतो.
`द इन्सेप्शन` मध्ये प्रत्येक गोष्ट नवी आहे अशातला भाग नाही. त्यात बराच कच्चा माल हा `मेट्रिक्स`च्या आधाराने, पण अधिक अद्ययावत कल्पना अन् तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मांडण्यात आला आहे. स्वप्नावस्था अन् वास्तव यांमधलं साम्य अन् विरोधाभास, स्वप्नातल्या मृत्यूचा वास्तवाशी जोडलेला संबंध, स्वप्नांमधून आतबाहेर करणा-यांचं तंत्र आणि तंत्रज्ञान, ट्रेनिंग, स्वप्नाच्या आवकाशात शक्य असलेले बदल, या सर्व संकल्पना मेट्रीक्समधे वापरण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गुरुत्त्वाकर्षणाला धाब्यावर बसवणा-या मारामा-या, स्लोमोशनचा उत्तम वापर, यादेखील गोष्टी मेट्रीक्समधे आहेत. मात्र फरक आहे, तो हे सगळं वापरण्याच्या तर्कशास्त्रात. मुळातंच मेट्रीक्सला पडलेले प्रश्नं आणि इन्सेप्शनला पडलेले प्रश्न हे सारखे नाहीत. मेट्रीक्स हा मानवाच्या मूलभूत पातळीवरल्या अस्तित्त्वाबद्दलच शंका उपस्थित करणा-या तात्त्विक, फिलॉसॉफिकल प्रश्नांना जवळ करणारा होता. इन्सेप्शनमधेही काही प्रमाणात अस्तित्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, पण तो मूलभूत पातळीवर, संपूर्ण मानवजातीला एकत्रितपणे पाहाणारा नसून अधिक व्यक्तिगत पातळीवरचा आहे. मात्र त्यापलीकडे जाऊन इन्सेप्शनचा भर राहतो, तो आपण ज्या मूल्यांवर विश्वास ठेवतो, त्यांच्या योग्यायोग्यतेशी संबंधित नैतिक, एथिकल प्रश्नांवर.
इन्सेप्शन आपल्या आशयाला सुसंगत रीतीने मांडण्यासाठी ब्लू-प्रिन्ट वापरतो. ती `हाइस्ट मुव्हीची`. एक जवळजवळ अशक्य वाटणारा चोरीचा आराखडा, नायकाने ती पार पाडून दाखवण्याचं आव्हान स्वीकारणं, मग आपल्याला हवी ती टीम उभी करणं, योजना आखणं, प्रत्यक्ष चोरी, त्यातून येणा-या अनंत अडचणी, अन् अखेर, असे या फॉर्म्युल्याचे टप्पे आहेत. इन्सेप्शन ते इमाने-इतबारे घेतो.
चित्रपटातला काळ हा नजिकचा भविष्यकाळ आहे. म्हणजे दिसायला, अथवा लोकांच्या वागण्याबोलण्याकडे पाहाता, तो तथाकथित फ्युचरिस्टिक नाही. पण या काळात, किंवा चित्रपटीय `when` मधे, चोरीची एक नवी शाखा अस्तित्वात आली आहे. ती म्हणजे डोक्यातल्या कल्पनांची, विचारांची चोरी. ती करायची, ती ज्याची कल्पना चोरायची त्याच्या थेट स्वप्नात जाऊन. या चोरांना एक्स्ट्रॅक्टर असं नाव आहे. अन् त्याचं स्वतःचं असं शास्त्र डेव्हलप झालेलं आहे. स्वप्नातला अवकाश उभा करणारे `आर्किटेक्ट`, विशिष्ट माणसांचा त्यांच्या सर्व लकबींसह आभास उभा करणारे `फोर्जर` माणसांना ठराविक वेळी/ठराविक वेळाकरता झोपवणारी अन् योग्य वेळी जागी करणारी गुंगीची औषधं पुरवणारे `केमिस्ट` यांची या उद्योगात महत्त्वाची भूमिका आहे.
चित्रपटाचा नायक आहे कॉब (लिओनार्दो डिकाप्रिओ) हा एक्स्ट्रॅक्टर. मात्र त्याच्यावर सायतो (केन वॉटानेब) या जपानी उद्योगपतीने सोपवलेली कामगिरी आहे, ती `एक्स्ट्रॅक्शन`ची नसून `इन्सेप्शन`ची. म्हणजे कल्पना चोरायची नसून, नवीन कल्पना पेरायची. या धंद्यातल्या लोकांच्या मते इन्सेप्शन अशक्य आहे. मात्र कॉबला ते शक्य वाटतं. त्याच्याच म्हणण्यानुसार त्याने यापूर्वी ते जमवलेलं आहे.
ज्याच्या मनात ही कल्पना पेरायची, तो असतो रॉबर्ट फिशर ज्युनिअर (सिलियन मर्फी). आपल्या वडिलांच्या प्रचंड कंपनीला बंद करून रॉबर्टने दुसरं काही करावं, अशी सायतोची इच्छा असते आणि हीच कल्पना रॉबर्टच्या डोक्यात बेमालूम पेरणं ही कॉबची कामगिरी. कॉबचं पूर्वायुष्य एका शोकांत घटनेने झाकोळलेलं असतं. रॉबर्टच्या कामगिरीचा मोबदला म्हणून सायतो आपली पापं धुवून काढण्याची एक संधी कॉबला देऊ करतो. मग वरवर अशक्य वाटणा-या कामगिरीसाठी चांगली टीम तयार कऱण्याचं काम सुरू होतं. मात्र प्रत्यक्ष कामगिरी, ही जीवावरच्या धोक्याची असते. कल्पना पुरेशी खोल रुजण्यासाठी स्वप्नातल्या स्वप्नातल्या स्वप्नात,म्हणजे तीन पातळ्या खाली जाणं आवश्यक असतं. फिशरचा सबकॉन्शस हा कॉबच्या टीमला प्रतिबंध करण्यासाठी स्वप्नातले विरोधक उभे करतो, मात्र त्यांच्यापासून वाचणं खूपच गरजेचं. स्वप्नातल्या इतक्या खोल पातळीवर आलेला मृत्यू, हा नायक मंडळींना कायमचं कोमात ढकलण्याचीही शक्यता असते.
इन्सेप्शनला तीन महत्त्वाच्या पातळ्या आहेत. प्रत्यक्ष अॅक्शनचा भाग, कामगिरीतलं अन् कॉबच्या भूतकाळातलं रहस्य आणि नैतिक प्रश्नांचा वेध. अर्थात नोलानने हे सगळं इतकं बेमालूमपणे एकमेकात मिसळलंय, की आपण काळजीपूर्वक पाहीपर्यंत या पातळ्यांचा वेगळेपणा आपल्याला चटकन जाणवत नाही. यातला पहिला मोठा नैतिक प्रश्न हा कामगिरीतच आहे. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात, जर हवी ती कल्पना घुसवता आली, तर व्यक्तिस्वातंत्र्याला काय अर्थ उरला? त्या व्यक्तीच्या हातून घडणा-या गोष्टींचा दोष मग कोणाकडे जाईल? या धाग्यावरून सुरुवात करीत इन्सेप्शन विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित करतो. स्वातंत्र्य म्हणजे काय? आपल्या वागण्याचा दुस-यावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो ? प्रत्यक्ष घडणारा गुन्हा अन् आपल्या मनातला त्याविषयीचा विचार यातलं अधिक भयानक काय? अप्रत्यक्षपणे अन् चुकून हातून अपराध घडला, तर त्याला शिक्षा कोणती? असे विविध मुद्दे इथे हजेरी लावतात. ब-याच प्रमाणात रॉबर्टच्या गोष्टीपेक्षा कॉबच्या भूतकाळाचा भाग इथे अधिक प्रभावी ठरतो. त्याचं कारण पटकथा ही जवळजवळ पूर्णपणे कॉबवर केंद्रीत झालेली आहे. त्यामुळे दृष्ट लागण्याजोगा नटसंच असून त्यांच्याकडे पुरेशा तपशिलात पाहीलं जात नाही. खासकरून स्वप्नांचा अवकाश डिझाईन करणारी आरीआडने (हार्ड कॅंडी अन जुनोमधली एलेन पेज) अन कॉबचा सर्वात जवळचा सहकारी आर्थर (ब्रिक अन द लुकआउटमधला जोसेफ गार्डन लेविट) यांच्या भूमिका त्यांना अधिक वाव देणा-या असत्या तर बरं झालं असतं.
इन्सेप्शनचा दृश्य भाग हा वेधक आहे यात शंकाच नाही. मात्र मी या भागाला मेट्रीक्सचीच पुढली पातळी म्हणेन. त्यामुळे केवळ हा दृश्य भाग पाहण्यासाठी जाणा-यांना हे नेत्रसुख जरूर मिळेल, पण चित्रपटाची संकल्पनांच्या पातळीवरली भव्यता चित्रपटाशी पूर्णपणे समरस झाल्याखेरीज त्यांना मिळणार नाही. डोळ्यांपेक्षा डोक्याचा अधिक वापर इथे अपेक्षित आहे. तसं झालं, तरच इन्सेप्शन पूर्णपणे आपल्यापर्यंत पोहोचेल.
अखेर एकच गोष्ट. ती म्हणजे चित्रपटाची अखेर. अनेकांना हा शेवट संभ्रमात टाकण्याची शक्यता जरुर आहे, कारण तो दोन परस्परविरोधी स्पष्टीकरणं एकाच वेळी पुढे करतो. यातला एक शेवट सांकेतिक अर्थाने सुखांत म्हणता येईल, तर दुसरा न्याय्य. जेव्हा अशा प्रकारचे परस्परविरोधी शेवट उभे केले जातात तेव्हा बहुतेक वेळा दिग्दर्शक त्याला स्वतःला कोणता शेवट अधिक पटतो याविषयी प्रेक्षकाला काही क्लूज सोडतो. मात्र त्याच शेवटाला धरून न राहता हवा तो शेवट निवडण्याची मुभादेखील देतो. इन्सेप्शनमध्ये ख्रिस्तोफर नोलान हेच करतो.चित्रपटातला अखेरचा शॉट कोणता आहे, अन् तो कोणत्या क्षणी संपवला जातो याचा विचार केला तर आपल्याला दिग्दर्शकाला काय अभिप्रेत आहे, हे कळू शकेल. मी मात्र तो सांगून टाकण्याचं पाप करू इच्छित नाही.
- गणेश मतकरी.

27 comments:
now i can watch the movie. i was waiting for the post. Thank you.
same with me.
हा चित्रपट चालणं अत्यंत गरजेचं आहे.सध्या सिक्वल,रीबूट करणाऱ्या हॉलीवूडला संपूर्णपणे चित्रपट हे माध्यम डोळ्यासमोर ठेवून केलेल्या original कल्पनाची गरज आहे.आणि स्पेशल ईफेक्टसाठी CGI चा कमीतकमी आणि आवश्यक तिथेच वापर केला तरी चालतो हे समजण्याची.
एलेन पेज ही एका अर्थाने प्रेक्षकांची प्रतिनिधी म्हणून वापरली आहे.मलापण असा वाटलं की जोसेफ गोर्डन लेवीट ला अजून फुटेज द्यायला हवा होत.दिलीप रावने पण मस्त अक्टिंग केली आहे.आधी अवतार त्याआधी रायमीचा ड्ऱॅग मी टू हेल आणि आता इनसेप्शन.मजा आहे लेकाची.
एकदा बघूनपण परत बघायचा आहे.जमला तर IMAX मध्ये.
तुम्ही ह्यावर लिहीण्याची वाट बघत होतो. आता नक्की पाहतो हा चित्रपट.
vivek ,sushama and mandar, u must see it. its one of this year's most important films.
Pratham, original idea and limited ,specific and brilliant use of cgi also applied to matrix. it did well but for all the wrong reasons.and most of the inspirations it spawned were pointless.including the other two parts of the series.
if we consider page's roles in juno and hard candy, she is wasted here. her and levitt's roles r sort of 'also ran' .they do have lot of footage, but thats it.
same with me, tumhi hyavar lihinyachich vaat pahat hote... aata lagech pahate. :)
strange ! waiting for reviews is understandable for the film of a unknown filmmaker.but with the exceptional track record of nolan .....isnt it obvious? Even a failure would be spectacular.
नोलान चा सिनेमा चुकवून कसा चालेल म्हणून परवाच पाहिला.. आणि नंतर या पिक्चरचा अर्थ काढण्यासाठी (किंवा माझी समज जुळवण्यासाठी) इंटरनेट धुंडाळले. पण मराठीत असा एखादा अप्रतिम ब्लॉग मिळेल असे वाटले नव्हते, मला मनापासून आवडला हा ब्लॉग. लागलीच आणखी ५-६ पोस्ट वाचले..
इंसेप्शन विषयी सांगायचे तर मला २ शक्यता वाटत होत्या, त्यातली एक म्हणजे कॉब स्वतःच 'सब्जेक्ट' असल्याची. आणखी एक अफलातून शक्यता कुठल्यातरी साईट वर वाचली (तिथे ७ शक्यता दिल्या होत्या) कि नोलानला प्रेक्षकांनाच "सब्जेक्ट" बनवायचे होते.. आणि खरेच मी एकट्याने सिनेमा पाहिल्यामुळे ती मला जाणवतीये.. कारण सिनेमा संपल्यावर मी भ्रमिष्टासारखा E-Square मध्ये ५ मिनिटे (की १ स्वप्नतास) बाहेरचा रस्ता शोधत फिरत होतो.. :)
तुमच्या ब्लॉगवरची ही पहिली पोस्ट की जी मी मुद्दाम वाचली नव्हती इतके दिवस. आणि चित्रपट पाहून आल्याशिवाय वाचणार नाही हेही पक्कं ठरवलं होतं. शेवटी आज बघायचा योग आला आणि आल्या आल्या तुमचा लेख वाचला..
काही कोडी सुटली नाहीयेत त्यामुळे पुन्हा बघावाच लागेल... (कदाचित अजून 'क्लोजली' बघणं अपेक्षित असावं ;) )
तुम्ही म्हणता तसा शेवट ओपन एंडेड वाटला. २-३ शक्यता.. मला कोब स्वतःच टार्गेट आहे असं वाटलं. दुसरा अर्थ म्हणजे मग सरधोपट सुखांत शेवट.. !!
I think this is the only film which arrives at the open ended conclusion and yet does not baffle people.
As far as I have seen, most of the people react harshly to open ended films. Some find it hard to comprehend that the film is over, others are dissatisfied because they feel cheated.
But not in case of Inception.
People actually clapped when the last shot cut to the black. There were many remarks about having to arrive at your own conclusion.
I think this is another achievement for Nolan
thanks ashish ,herambh ani pradip,
Ashish and Heramb, when u say that cobb himself could be a target , what r the things you are considering in the evidence? it will be interesting to discuss though if you r mentioning any crtical detail, just put a spoiler warning.
Pradip, your observation is interesting but i dont think its enirely true. i think it does baffle a certain percentage of people , but it also has a certain sense of finality. still, people are happpy because they expect a baffling ending and nolan serves just that.i believe its the first open ended film for nolan.
audience response is absolutely unmissable. spontaneous exclaimations r heard at least in two places. first in the hotel bar in level 2 where cobb sees his kids and a glass is broken almost simultaneously. and other at the end where they have already concluded the film in their own mind ,and expect nolan to comply. i saw the film in theatre twice with same response from the audience.
I like your point that people expect a baffling end and nolan gives just that. A new perspective indeed.
Why won't you consider Memento as open ended? It leaves so many question in your mind about everything we have seen when it ends.
pradip, memento has clear explainations for everything.about the original crime, role of teddy , tampering of evidence ,sammy jenkins case , death of protagonist's wife and his behaviour. there actually is no open end. almost all your questions have a clear answer in the end.tell me, why do u consider it an open end?
Given the nature of protagonists ailment.. Doesn't it make u wonder whether all that u have been hearing and watching is real or not?
I have seen it long ago but still I remember very clearly how I felt
Hi Ganesh,
This might sound weird, but following is one of the possibilities I came up with-
Cobb was really stuck in his dreamworld as Mal was always trying to say.
What Mal was telling him was right, but he was so convinced that she was wrong and the dream world had become his real world.
Even the Totem couldn't do anything. (If we assume that Totem was always right, we cannot ignore that it wasn't his at the first place, it was Mal's).
Mal tried to convince him several times but failed.
To know how Cobb's dreamworld must had become his reality we have to listen carefully to the old man in Yusuf's lab. He makes comments on Cobb's addiction to be in dreams.
And also Yusuf explains how Dream becomes reality for some people.
Finally they (Mal, her father, Ariadne, Arthur, Eames, Yusuf, Fischer, Saito) decided to do Inception on Cobb.
To make this happen, Mal committed suicide in Cobb's dream and framed him in her murder charges, he fled without watching his children's faces. Cobb was filled with regret and guilt this time. The strong emotion was to see his children's faces and to go home. In a way Mal had successfully turned his lucid-sweet dream into a nightmare.
They started in the Jumbo jet with still dreaming Cobb (in real world). Then the whole movie including the point when they start on their project on the same setup in Jumbo jet (in Cobb's dream) happens in Cobb's dream. When Cobb and Saito waked up from Limbo, Cobb found himself in the same setup but the difference was that now it was reality. And there is no way for him to figure out the difference.
It is like Penrose stairs, starting and end are same. A paradox, but only a clever architect like Ariadne can design these type of layers.
Now, Cobb is in real world, as it is as he thinks himself in his dreamworld. His dream world has been shattered and only emotion he now possesses is love for his children, that we can see by the fact that he completely ignored the top. We can assume that he had been freed from the addiction of his dreamworld as the team had managed to wash out the difference between his dreamworld and reality.
By this logic, there is actually no charges against Cobb, and Saito doesn't need to do anything.. anyways one phone call and clearance from Murder charges looks rather unconvincing.
Here it could be noticed that inception is not planting idea it could be it's literal meaning- beginning, making his dreamworld's start point as start point of reality.
yes i see the story of murder very nic film i can belive it directed by run lola run directer
Part 1 of 2
Hi ashish, this is a delayed response, but ur post wasn’t something i could casually reply to.
Plenty of spoilers----
I was present at a workshop about film appreciation a few years ago and shyamala tai vanarase was one of the lecturers. In her discussion she mentioned a very obvious point ,but one easily forgotten by people trying to analyse a film. She said that when we read a film ,we should check if the screenplay is really supporting the argument or we r just interpreting the text which is not in the film but would like it to be.many times ,even a most intelligent observer is seen over reading a film. I have an experience where a FTII lecturer (and i wont consider her a very intelligent observer too) tried to connect a simple look of a heroine in Ghatak’s Meghe Dhaka Tara ,with growing ‘Babu’ mentality in Kolkata.
While watching inception ,i thought it possible that what if Mal’s argument is truthful and Cobb’s is false. Though its a interesting point ,and it may be one of the ideas Nolan was considering at the time , I did not seriously consider it as the structure of the film doesn’t address its truthfulness one way or another. In fact ,the world in which cobb and mal are lost is essentially an empty world. Thats the world Mal believes to be true due to the inception carried out by cob. So if u consider Mal’s word as the truth , u have to imagine an empty world as the truth , which can’t be the case. Also, then u jeopardise the premise of inception, as the original planting of the idea has not actually taken place at all. Also if they r just trying to wake cobb up, that’s not inception at all. Then why should u call the film ‘the inception’?
I have also read some explanations on the net that entire film can be read as inception on cobb ,and whole thing is a dream, but it doesn’t explain the ending properly ,and doesn’t explain who is pulling it off, who is the architect etc. Net analysts either say that saito or fischer is an architect and dismiss who is actually pulling off the inception as not important. If we take no reference of reality, there is no reference to base our perspective on, and i doubt if that is nolan’s intention.
Yusuf and the person in the shop make interesting comments about reality and dream, but I take that as observations about the addiction , which may be considered as a subtext to the entire film. Addiction can, but may not be about just the drugs which yusuf supplies ,but goals ,relationships and many other things we may care to read into it considering the overall structure of the film .
Its true that the totem is mal’s but its realistic that cobb has started using it after her death. He has been shown using it. and he also explains the property ,that in a dream ,it can go on spinning without toppling.
Part 2 of 2
One of the major flaws in the film is that, it doesn’t explain the process of designing a dream. It’s what architect, a major player in the film, does. Ariadne is shown making the model and then working in some sort of dream space. I think it should be her dream she is designing it in , as the architect in first sequence claims its his dream. But that’s not the case ,as they r going in fisher’s dream. How r the designed levels transferred? matrix does a good job of explaining basic technicalities with cyberspace like matrix, parallel programming by humans for training,learning etc, what can be changed ,what can’t, what happens when u die etc. Inception is also not sure if people should wake up or go in coma when they die in a dream. It finds convenient answers along the way and does it’s best to explain them.
One of the reasons for ambiguity, is this lack of clarity in detailing.
I trust that there r only 2 possible conclusions. One is for the optimists , which is really a happy ending where he returns to US and his kids ,everyone is happy. But there r problems with this. It seems that the incidence of his leaving US has occurred a few years ago. The girl’s voice on the phone sounds older ,but the ending portrays them to be of the same age. also if it’s a reality there is no reason for Nolan to go back to the totem. He should follow decaprio with the kids. That it does not happen, supports that this is a dream. Cobb is lost in the subconscious , probably after he refused to take the musical kick and remained to stay in for finding saito. He is either lost alone or its a shared dream wjth saito. Another confusion here is since this was fiscer’s dream, where exactly is cobb lost? How can he travel to his own shared reality with mal through fiscer’s dream earlier ? But lets not go there. lets just say that as the last shot is cut before the totem topples ,it suggest that director does not support that this is a happy ending.
But to go back to descares /matrix analogy, if his mind believes that the dream is real, then we can actually say that even this is a happy ending. Though, of course its not reality, right?
If this post had a title- it would be – are you watching too closely?
Dear Ganesh,
Many thanks for your reply.
I understand that I assumed too many things because I wanted to prove my point. Much like a person trapped in dream trying to prove his dream as real. I was almost got haunted by this film.
I actually considered that it wouldn't be a mere coincidence that the Penrose stairs paradox has been explained in the film twice.
I really appreciate the way with which you elaborated your point. I am just another movie enthusiast and I really liked the way you treated my post, with respect.
You won't believe what happened with me, When my sister saw my long blog which also has some diagrams explaining the movie events. She hasn't watched Inception, and she hardly watches Hollywood movies. She mailed me this - "सत्यात जग रे आशिष".. hehehe.. true story..
Well this really explains how someone's passion can be interpreted as dreamworld by others.. :)
On a side note, please read my next post..
मी तुमचे नाव गुगल वर सर्च केले, तर पहिलीच लिंक "मॅग्नोलिआ" वर गेली..
तिथे अभिजीत बाठे आणि बाकीच्यांचे शब्दयुद्ध वाचून हलकासा अटॅक येवून गेल्यासारखे झाले.. :) true story..
मला इथे काही सांगावेसे वाटते, कारण तुम्ही ऐकणार्यांमधले आहात.. (अभिजीत बाठे यांना लिहायचे असते तर १० वेळा विचार केला असता).
तिथले पोस्ट वाचून, पहिले तर सगळा उत्साहाच गळाला, काय ते एकाच दिवसात ५-५ सिनेमे बघणे, आणि ती इटालीअन आणि फ्रेंच नावे.. नाही झेपणार आपल्याला कधी..
पण एक गोष्ट झाली.. डेविड धवन च्या सिनेमांबद्दल आदर वाढला.. कारण ते कधी समीक्षकांसाठी सिनेमे काढत नाहीत असा एकदम साक्षात्कार झाला.
'critic' व्हायचे येड कमी झाल्यासारखे वाटतय.
विठ्ठलाला माऊली म्हणत निरागसपणे वारी करणारे वारकरी आणि त्याची शास्त्रोक्त पूजा करणारे बडवे, यात कोण व्हावे असा प्रश्न पडावा अशीच अवस्था झाली..
आधीच्या पोस्ट मध्ये म्हंटल्याप्रमाणे, मला खरेच आनंद आहे कि मला हा ब्लॉग सापडला, आणि तुमच्यासारखे अनुभवी, विनम्र व्यक्तिमत्व भेटले या विश्वाला समजून घेण्यासाठी.
Ashish,
I know that the google search leads to magnolia comment page. Someone else also mentioned it earlier. Did u read all of it ? interestingly, Abhijit had based his comments on a single post and wasn’t aware of the other issues connected with the article. Later ,probably because rather than turning abusive or remaining quiet I answered patiently ,he got converted and is a regular reader of the blog. I have even met him . he is a good friend. (ur comment about AB is based on that page or some other experience ?)
Anyway, the references u mention about the world cinema, are they on that page ,or elsewhere? I don’t remember all that was said there. but its not a very good news that you are intimidated so much by it ,that u turn to David Dhawan. Let me say that i have nothing against him, and at some level ,his films do entertain. However most are not original , and can only entertain where they stick to the original source. eg- compare Hitch and Partner. Dhawan ,for obvious reasons , is himself a great follower of world cinema.
No one in the world makes films for critics, and good critics are so rare that they are almost a myth. One should aim to be alert and observant as part of the audience. That should be enough.
if the top is not Cobb's why is he shown to spin it time to time in the movie?also i guess there's ambiguity in sense that-we don't kno whether 4th dream is a Cobb's 4th ''level'' or limbo itself-since fischer dies in 3rd level he should reach limbo and then when Adriadne pushes him off the balcony he'd directly wake up on plane(reality).and not in 3rd level
Asclepius ,
if u read my 2 part post to ashish's comment, the issues u mention are adressed in that.
http://www.nolanfans.com/forums/viewforum.php?f=34&sid=ee9cf857f5022e6bf49e4eb30f4235a9
best way to lose yourself is to keep reading theoris and QnA posted here.
एकदम बढिया पिच्चर है बॉस..कथा लिहिणारा ग्रेट आहे आणि दिग्दर्शक सुद्धा ग्रेट.. लीओचे फ्यान तर आधीपासूनच आहोत
नमस्कार गणेश सर. तुमचा लेख वाचला. त्याबद्दलच थोडं विचारायचं होतं.
पाहिलं म्हणजे चित्रपटाच्या शेवटाबद्दल. आधी मला काय तो शेवट कळाला तो सांगतो. मला वाटतं की तो(कॉब) आता स्वप्नात नाहीये. तो त्याच्या मुलांना बघून एवढा आनंदी होतो की Totem बघायचं पण भान त्याला राहत नाही. आणि बरेच लोक म्हणतात की त्याच्या मुलांची age वाढलेली दिसत नाही. मला वाटतं की त्याचं काम हे फक्त काय २१ दिवसांचं असतं. आणि २१ दिवसात मुलं किती वाढणार? असो. हा मला कळालेला(मी घेतलेला) शेवट. मला विचारायचं होतं की मी बरोबर direction मध्ये विचार करतोय का ? आणि मला तुम्ही घेतलेला शेवट जाणून घ्यायला आवडेल.
दुसरं म्हणजे तुम्ही लेखात म्हटलं की आणखी एक शेवट न्याय्य आहे. तो कसा, हे ही जाणून घ्यायला आवडेल.
आणि सर्वात महत्वाचं म्हणजे चित्रपटाच्या नैतिक भागाबद्दल. तुम्ही ते लिहिलंच आहे लेखात. पण त्याव्यतिरिक्त आणखी काही आहे का?
आपल्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत आहे.
धन्यवाद.
-swapnilakawale@gmail.com
Post a Comment