सिटी लाईट्स (१९३१) - बोलपटांच्या काळातला मूकपट
>> Monday, May 9, 2011
एक माणूस, अतिशय साधा, अंगावर मळके कपडे, खिशात दमडी नाही, राहायला घर नाही अशी अवस्था. स्वभावाने चांगला, पण मनाच्या श्रीमंतीचा एरवीच्या जगात उपयोग नाही, हे जाणणारा.
एक मुलगी फुलं विकून घर चालवणारी. सुस्वभावी, नम्र पण दृष्टीहीन. एका बागेबाहेरचा कट्टा ही तिची फुलं घेऊन बसण्याची नेहमीची जागा. इथेच तिची गाठ त्या गरीब माणसाशी पडेल.
आता चित्रपटात अशी भेट घडवायची तर संवाद उपयुक्त, गरजेचे म्हणा ना! त्यातून मुलीला जर हा माणूस कोणी श्रीमंत असामी आहे असं भासवायचं असेल, तर फारच. मात्र हीच गोष्ट जर मूकपटात, संवादांच्या मदतीशिवाय घडवायची असेल तर?
चॅप्लिनच्या `सिटी लाईट्स`मधे सुरुवातीच्या प्रसंगात आपण हे सहजपणे घडताना पाहतो आणि इतक्या सोप्या पद्धतीने घडणा-या दृश्यामागे किती विचार केला गेला असेल याची कल्पनादेखील करू शकत नाही. चॅप्लिनची युक्ती साधी आहे. ट्रॅफिकच्या गदारोळात सापडलेला ट्रॅम्प (गरीब बिचारा ट्रॅम्प ही चॅप्लिनची खास ओळख या चित्रपटातही
वापरली जाते. ) रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या एका गाडीचा वापर फुटपाथपर्यंत पोचण्यासाठी करतो. एका बाजूने त्यात शिरून दुसरीकडून उतरतो. त्याचं उतरणं अन् गाडीच्या दाराचा आवाज, हा समोरच बसलेल्या फुलवालीचा गैरसमज होण्यासाठी पुरेसा असतो. प्रत्यक्ष दिसत नसल्याने ती अर्थातच त्याला कोणी श्रीमंत माणूस समजते.
दृश्य अनेक बाबींसाठी महत्त्वाचं अन् लक्षात राहण्यासारखं. त्यातली शब्द वगळणारी प्रभावी युक्ती, मूक दृश्यांत केलेला ध्वनीचा विशेष वापर, ट्रॅम्पच्या वागण्यातून स्पष्टपणे दिसणारे या व्यक्तिरेखेचे बारकावे, या दृश्यांशी समांतर असं चित्रपटाच्या अखेरचं दृश्य रचण्यातलं चातुर्य, अशा कितीतरी गोष्टी सांगता येतील. पण मला सर्वात महत्त्वाचं वाटतं, ते हे दृश्य करत असलेलं चॅप्लिनच्या चित्रपटांचं प्रतिनिधित्त्व. चॅप्लिनची सुरुवात जरी छोट्या छोट्या विनोदी शॉर्ट फिल्म्सपासून झाली असली तरी हा केवळ कॉमेडिअन नव्हे. विनोद हे त्याचं एक अंग आहे. त्याच्या पुढच्या काळातल्या `ए किंग इन न्यूयॉर्क`, `मॉसिए वर्दो`, `लाईम लाईट` सारख्या चित्रपटांतून हे अधिक स्पष्ट होईल. तो प्रेक्षकांना हसवून त्यांना विश्वासात घेण्यापुरता विनोदाचा वापर करतो. त्यामुळे त्याच्या ब-याच चित्रपटांतून विनोद हा उघड दिसला तरी तो तेवढ्यापुरता, प्रासंगिक असतो. त्याचे अनेक चित्रपट हे त्यापलीकडे जाणारे असतात. हे दृश्यही त्यातलंत. इथेही आपण ट्रॅम्पच्या कारवायांना हसत राहतो. मुलीने फुलं विकत घेण्याची विनंती केल्यावर त्याची होणारी पंचाईत मात्र प्रथमदर्शनीच बसलेल्या प्रेमाखातर तिला पैसे देतानाचा त्याचा आविर्भाव. तिने सुटे देण्याआधीच गाडीचा प्रत्यक्ष मालक गाडीत येऊन बसणं आणि निघून जाणं, तिला उघडच वाटणं की या श्रीमंत गि-हाइकाने सुटे आपल्याला बहाल केले. तिचा विश्वास कायम राहण्यासाठी पैशांची आधीच चणचण असलेल्या ट्रॅम्पने हळूच काढता पाय घेणं.हे सगळं त्याच्या सादरीकरणात विनोदी आहे, पण ट्रॅम्पचा खरेपणा, त्याच्या मनातलं प्रेम, प्रसंगातील विसंगती थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारं. हसत असतानाही आपल्याला या दोन्ही व्यक्तिरेखांविषयी आतून वाटायला लावणारं. त्यांच्या अडचणींशी समरस व्हायला लावणारं चॅप्लिनच्या कोणत्याही चित्रपटाचं हे विशेष म्हणावं लागेल.
`सिटी लाईट्स` दोन समांतर कथासूत्रांना धरून पुढे सरकतो. यातलं पहिलं आहे ते अर्थातच फुलवालीबरोबरचं प्रेमप्रकरण. ज्यात ट्रॅम्प आपल्या प्रेमाखातर तिला दृष्टी यावी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. दुसरं सूत्र आहे, ते ट्रॅम्पच्या एका अब्जाधीशाबरोबर झालेल्या चमत्कारिक मैत्रीचं. दारूच्या नशेत आत्महत्येचा प्रयत्न करू पाहणा-या या माणसाला ट्रॅम्प वाचवतो, अन् त्याचा जीवलग मित्र होतो. यातली गोम अशी की, अब्जाधीशाला ही मैत्री केवळ दारूच्या नशेत आठवते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ट्रॅम्पवर हजारो रुपये खर्चायला तयार असणारा अब्जाधीश, दिवसा मात्र त्याला पूर्णपणे विसरून जातो. हा भागदेखील अर्थातच खूप हसवणारा ठरतो, मात्र केवळ हसवणारा नव्हे. अखेर दोन्ही कथासूत्र एकत्र येतात, ते अंध मुलीच्या इलाजासाठी होणा-या प्रयत्नात.
सामान्यतः विनोदी चित्रपट हे आपल्या अडचणींना फार गंभीरपणे घेत नाहीत. जणू त्यातल्या पात्रांना त्या सुटणार हे माहीतच आहे. `सिटी लाईट्स`मधे येणा-या अडचणी मात्र ख-याखु-या आहेत. चित्रपट त्या सुटणार नसल्याची जाणीव आपल्याला अनेकवार करून देतो. बॉक्सिंग मॅच हे त्यातलं एक छोटं उदाहरण म्हणता येईल. अंध मुलीच्या घरभाड्यासाठी पैसे उभे करण्याचा उपाय, म्हणून ट्रॅम्प ही `फिक्स्ड` मॅच स्वीकारतो. मात्र आयत्यावेळी प्रतिस्पर्धी बदलल्याने त्याची पंचाईत होते. चित्रपटातल्या आणि चॅप्लिनच्या एकूण कामातल्या स्लॅपस्टिक विनोदाचं ही मॅच हे उत्तम उदाहरण मानता येईल. चित्रपट इथे चॅप्लिनला प्रतिस्पर्ध्याला मारायला थोडा वाव देतो. मात्र त्याचा अंतिम विजय होणं शक्य नाही हे वास्तव तो विसरू शकत नाही.
`सिटी लाईट्स`मधला अखेरचा प्रसंग अन् तो संपण्याची जागा हे चॅप्लिनच्या अभिनेता म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून दिसणा-या कसबाचं सर्वोत्तम उदाहरण मानता येईल. भल्याभल्यांच्या डोळ्यांत पाणी आणणारी ही अतिशय वाईट अवस्थेतली ट्रॅम्प अन् त्याला सहज ओळखू न शकणारी, आता दृष्टी मिळालेली मुलगी यांची भेट, हा चित्रपटाचा हाय पॉंइंट तर आहेच, वर प्रेक्षकाला शेवटचा अर्थ लावण्याची संधीदेखील तो देऊ करतो. तुमचा आय़ुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक आहे की नकारात्मक, तुम्ही रोमॅण्टिक आहात का सिनीक हे `सिटी लाईट्स` तुम्हाला विचारेल. तो सुखान्त आहे का हे तुम्ही स्वतःच पडताळून पाहाल. `सिटी लाईट्स` १९३१ सालचा चित्रपट आहे. म्हणजे बोलपट पूर्णपणे रूजल्यानंतरचा.
पुढे बोलपटांकडे वळलेल्या चॅप्लिनला अजून मूकपट सोडण्याचा धोका पत्करावासा वाटलेला नाही. तो स्वतःच दिग्दर्शक, निर्माता आणि स्टार असल्याने त्याला `सिटी लाईट्स` मूकपट बनवणं शक्य झालं. तांत्रिकदृष्ट्या पाहायचं, तर तो खराखुरा मूकपट नाही. म्हणजे त्यात साऊंड इफेक्ट्स आहेत. पहिल्या भाषणाच्या प्रसंगी बोलपटांची खिल्ली उडविण्यासाठी घातलेले गंमतीदार आवाज आहेत, मात्र संवाद येतात, ते पूर्णपणे टायटल कार्डसवर. गंमत म्हणजे एरवी बोलपटांच्या प्रेमात असलेल्या तेव्हाच्या प्रेक्षकाने चित्रपटाला डोक्यावर घेऊन चॅप्लिनच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं. त्याला केवळ `सिटी लाईट्स`चा विनोद जबाबदार नाही. या संपूर्ण कलाकृतीचं सौंदर्य, आर्थिक संकटातून जात असणा-या समाजाला प्रमुख व्यक्तिरेखेविषयी वाटणारा आपलेपणा आणि चॅप्लिनची स्टार पॉवर यांचा हा एकत्रित परिणाम होता.
- गणेश मतकरी.

9 comments:
अप्रतिम लेख... अनेक बारकावे समजावून सांगणारा !!
NEHAMI PRAMANE UTTAM LIKHAN JALA ..AHE CHITRAPATA BADDL BARECH DIWASA PASUN AYKUN HOTO ATA NAKKICH BAGHEN ...ABHARI AHE
Thanks heramb ani lalit
अप्रतिम लेख आणि चित्रपट सुध्या नुकताच बघितला ...भारीच आहे
छान.काय सांगायचंय याला प्राधान्य देऊन त्यासाठी साधन निवडायचं आणि निवडलेल्या साधनाचा पुरेपूर उपयोग कथेला पुढे नेणाऱ्या प्रसंगातून घडवायचा.हे माध्यम-अभिव्यक्ति संदर्भातलं सूत्र या चित्रपटावरच्या तुझ्या लेखनातून पुढे येतंय असं वाटतं.

खरोखर अप्रतिम लिहिलंय....
चित्रपटाचा शेवटचा प्रसंग पाहून खरंच डोळ्यांत पाणी आलं ! स्पर्शातून व्यक्त होणाऱ्या भावनेच सर्वोत्तम उदाहरण. चॅप्लिन चा "greatness" दाखवणार दृश्य
अप्रतिम लिहिलंय, पाहायलाच हवा असा सिनेमा...
ह्यातलं बरंच कथासूत्र नसीरूद्दीन शाहच्या 'सुनयना' मध्ये जसंच्या तसं घेतल्यासारखं वाचून तरी वाटतंय.
Post a Comment