‘रा-वन’ कुठे फसला?

>> Monday, November 7, 2011

जेनेरिक चित्रपटांचं आपल्याला पहिल्यापासूनच वावडं आहे. विशिष्ट प्रेक्षकवर्गाचा विचार करून चित्रपट काढणं आपल्याला रुचत नाही. प्रत्येक सिनेमा हा संख्या आणि आवड या दोन्ही बाबतीत अधिकाधिक मोठय़ा प्रेक्षकवर्गाला कवेत घेणारा ठरावा, ही आपल्या चित्रकर्त्यांची जुनीच अपेक्षा. त्यामुळे आपला हिंदी व्यावसायिक चित्रपट हा लहानांपासून थोरांपर्यंत सर्वाना चालेलसा अन् विनोदापासून कौटुंबिक मेलोड्रामापर्यंत आणि रोमान्सपासून हाणामाऱ्यांपर्यंत सारं काही असणारा बनला, यात आश्चर्य ते काय? नाही म्हणायला गेल्या दहाएक वर्षांत हे चित्र किंचित बदलायला लागलं आहे. टीव्हीवर जगभरचा सिनेमा पाहणाऱ्या, मल्टिप्लेक्समध्ये खिसा सल सोडायची तयारी असणाऱ्या प्रेक्षकांची बदलती आवड लक्षात घेऊन आजकाल एकेका चित्रप्रकाराला वाहिलेला सिनेमा हळूहळू डोकं वर काढताना दिसतो आहे. माफिया आणि भयपट तर आता अंगवळणी पडलेत. त्यांच्या जोडीला इतर काही चित्रप्रकारदेखील प्रतीक्षेत आहेत.
सुपरहीरोपट हा त्यातलाच एक. ‘क्रिश’, ‘रोबोट’नंतर उगवलेल्या तितक्याच बिग बजेट, मल्टिस्टारर ‘रा-वन’कडे पाहून हेच सिद्ध होतं. मात्र, ‘रा-वन’चा गोंधळ हा की, एका चित्रप्रकाराचा निश्चित ठसा असूनही त्याची सर्वाना खूश करण्याची हौस काही भागत नाही आणि पुन्हा तो अ‍ॅक्शन, कॉमेडी, मेलोड्रामा या पारंपरिक मसाला चित्रपटांच्या दुष्टचक्रातच अडकतो. मग सुपरहीरोच्या कारवायांच्या जोडीला आपल्याला बाप-मुलाच्या प्रेमाच्या बोधकथा, अश्लील विनोद, करवा चौथ आणि गणपतीचा महिमा हे सारं एकाच तिकिटात बघायला मिळतं किंवा बघायला लागतं.
‘रा-वन’ मुळातच सुपरहीरोपट या चित्रप्रकाराला खूप सोपा समजतो. त्यामुळे पटकथा भरगच्च करण्यासाठी आणखी एक तितकाच कठीण चित्रप्रकार तो वापरतो, तो म्हणजे कॉम्प्युटर गेम्सवर आधारित चित्रपटांचा. कदाचित अशा चित्रपटांचा प्रमुख प्रेक्षकवर्ग मुलं असल्याने आणि मुलांसाठी चित्रपट बनवणं सोपं असल्याचा गरसमज आपल्याकडे प्रचलित असल्याने तसं झालं असावं. खरं तर असं होऊ नये; कारण  लेखक-दिग्दर्शक अनुभव सिन्हा, तसंच निर्माता व प्रमुख कलाकार शाहरूख खान यांनी ‘रा-वन’च्या तयारीसाठी किती सुपरहीरोपट, गेिमगसंबंधित अन् इतर फॅन्टसी चित्रपट पाहिले, याची यादी आपण चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान ऐकलेलीच आह़े. त्याचा पुरावा म्हणून वरवरच्या नकला अन् संदर्भ इथे मुबलक प्रमाणात दिसतात. मात्र, या बाह्य़ाकारापलीकडे जाऊन खरोखर या चित्रपटांच्या गुणदोषांचा, रचनेचा जो अभ्यास आवश्यक होता, तो मात्र चित्रकर्त्यांनी केलेला दिसून येत नाही. ‘सुपरमॅन’, ‘द मूव्ही’ करणाऱ्या रिचर्ड डॉनरपासून क्रिस्टोफर नोलनच्या ‘द डार्क नाइट’पर्यंत अनेक मोठय़ा दिग्दर्शकांनी सुपरहीरो या संकल्पनेचा मुलांसाठीच नाही, तर मोठय़ांसाठीही लावलेला अर्थ इथे विचारात घेतला गेलेला नाही. किंवा पिक्सारच्या ‘द इन्क्रिडिबल्स’सारखा अगणित संदर्भ अन् उत्कृष्ट निर्मितीमूल्यांबरोबरच पठडीत न बसणारा, पण स्वतंत्र विचारदेखील देणं या मंडळींना आवश्यक वाटत नाही.
‘रा-वन’ ही सुपरहीरोपटाच्या लोकप्रिय संकेताप्रमाणे ‘ओरिजिन स्टोरी’ आहे. म्हणजे थोडक्यात- अमुक अमुक महानायक कसा अस्तित्वात आला, त्याची गोष्ट. इथे एक कॉम्प्युटर गेम डिझायनर बाप आहे (सज्जन, विनोदी, दाक्षिणात्य शाहरूख खान), शिव्यांवर थिसिस करणारी आई आहे (कधी विनोदी, कधी रोमॅन्टिक, कायम ग्लॅमरस करीना) आणि लुसीफर नावाने कॉम्प्युटर गेम खेळणारा, हीरोपेक्षा व्हिलन आवडणारा मुलगा आहे. बाप मुलावरच्या प्रेमाने एक असा गेम बनवतो, ज्यात नायक जी-वन हा खलनायक रा-वनपेक्षा कमी शक्तिशाली आहे. पुढे बरंच, पण प्रेक्षकांना न पटण्याजोगं स्पष्टीकरण देत रा-वन गेम सोडून प्रत्यक्षात अवतरतो़ आणि बापाच्या जिवावर उठतो. मग अर्थात बापाच्या रूपाची प्रतिकृती असणाऱ्या जी-वनलाही जिवंत होण्यावाचून दुसरा पर्याय उरत नाही.
सुपरहीरोची चांगली गोष्ट- मग ती कॉमिक्समध्ये असो वा चित्रपटात- एखाद्या मिथकाप्रमाणे असावी लागते. त्यातल्या लार्जर दॅन लाइफ असणाऱ्या व्यक्तिरेखेची जडणघडण, सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीबरोबर होणारा झगडा (बॅटमॅन किंवा हल्कप्रमाणे अनेकदा या दोन्ही प्रवृत्ती एकाच व्यक्तिरेखेचा भागही असू शकतात.), वरवरच्या आधुनिक रूपामागे जाणवणारी अभिजात रचना याला महत्त्व यावं लागतं. नियमितपणे िहदी चित्रपट पाहणाऱ्याच्या लक्षात येईल की, रा-वनची रचना मिथकाप्रमाणे नसून, राकेश रोशनच्या चित्रपटांनी लोकप्रिय केलेल्या फॉम्र्युलासारखी आहे. भोळा, खलनायकाशी लढण्याची ताकद नसलेला नायक, लवकरच खलनायकाच्या कुटिल कारवायांपायी ओढवणारा त्याचा मृत्यू (वा तसा आभास), भल्याचा पराजय होतोय असं वाटता वाटताच नायकाचा या ना त्या स्वरूपात होणारा पुनर्जन्म. ‘करन-अर्जुन’, ‘खून भरी माँग’, ‘कोयला’, ‘कहो ना प्यार है’ अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहता येतील. मग रोशन फॉम्र्युला, त्यांनीच ‘क्रिश’मध्ये बऱ्यापकी स्वतंत्रपणे आणलेला चित्रप्रकार आणि त्यांचा एकेकाळचा आवडता नायक यांना एकत्रितपणे पुन्हा पडद्यावर आणणाऱ्या या चित्रपटात नवे काय आहे? तर- काही नाही. निदान कॉम्प्युटर गेिमगचं उपसूत्र बरं म्हणावं का? तर तिथेही तपशिलाचा आनंद आहे.
‘रा-वन’मधला गेम हा त्याच्या सेटअपचा प्रमुख भाग आहे आणि आज घरोघरी गेिमग कन्सोल्स असल्याने नव्या गेिमगशी बहुतेकांचा परिचय आहे. १९९८ च्या ‘हाफ-लाइफ’पासून हे क्षेत्र अतिशय अद्ययावत आणि गुंतागुंतीच्या गोष्टी सांगणारं झालं आहे. तुलनेने इथला केवळ तीन लेव्हल असणारा कुस्तीसदृश गेम प्ले कालबाह्य़च नाही, तर हास्यास्पद आहे. इतक्या बाळबोध स्वरूपाच्या गोष्टविरहित खेळाला दहा खलनायकांची वैशिष्टय़ं एकत्र करणारा (कोणते दहा खलनायक, किंवा त्यांच्या वैशिष्टय़ांचा गोष्टीशी संबंध काय? असे प्रश्न अर्थातच विचारू नयेत! ) अन् संगणकाबाहेरच्या जगातही चालेलसा आर्टििफशिअल इन्टेलिजन्स असणारा खलनायक का हवा? कोण जाणे! असे कितीतरी प्रश्न आपण विचारू शकतो; ज्यांचा पटकथेने विचारच केलेला नाही.
‘रा-वन’च्या इफेक्टस्बद्दल बरंच काही बोललं गेल्याने मी फार काही बोलणार नाही. ते बरे, पण सरधोपट आहेत. आपण कोणत्या ना कोणत्या सिनेमात पाहिलेले. त्यामागे दिग्दर्शकाचा स्वत:चा विचार नाही. राकेश रोशन, संजय गाडवी आणि रोहित शेट्टी यांच्या चित्रपटांत या प्रकारचं काम झालेलं आहे. इथे बजेट थोडं अधिक आहे, इतकंच. चित्रपट उत्तम जमला की त्याचं प्रमुख श्रेय हे दिग्दर्शकाला जातं, त्याच न्यायाने चित्रपट फसण्यालाही जबाबदार तोच- हे ओघानेच आलं. अर्थात इथलं फसणं हे आíथकदृष्टय़ा नाही. कारण आजच्या मार्केटिंगच्या चमत्कारी युगात तो नफा मिळवू शकणार नाही असं मानणं, हे विशफूल िथकिंगच म्हणावं लागेल.
‘रा-वन’ फसतो तो दर्जाच्या पातळीवर! जेव्हा संहिता आणि सादरीकरणात काय आवश्यक अन् काय टाळण्याजोगं, यावर तो नियंत्रण ठेवू शकत नाही, जेव्हा सुपरहीरोपटाची खरी ताकद स्पेशल इफेक्टस्मध्ये नसून व्यक्तिरेखा आणि संघर्षांत असते, हे तो ओळखू शकत नाही, जेव्हा प्रचंड बजेट व तंत्रज्ञान हाती असतानाही संकल्पनेच्या पातळीवर तो पुरेसा विचार करणं आवश्यक मानत नाही. फॅन्टसीला वास्तवाचे नियम लावता येत नाहीत, हे खरं; पण फॅन्टसीचंही स्वत:चं तर्कशास्त्र असतं, हे ‘रा-वन’ विसरतो. रुजलेल्या चित्रप्रकारात चित्रकर्त्यांचं एखादं पाऊल चुकल्याने फार फरक पडत नाही. पण इथल्यासारख्या नव्या वाटेवर मात्र पुढल्या चित्रनिर्मितीची दिशाच चुकण्याची भीती असते. ‘रा-वन’च्या आíथक यशापासून धोका आहे तो हाच.
- गणेश मतकरी (लोकसत्तामधून) 

13 comments:

Vivek Kulkarni November 7, 2011 at 5:31 AM  

शाहरुख खान आणि अनुभव सिंह यांनी तुमचा सिनेमातिक मधला सुपर हिरो बद्दलचा लेख वाचला असता तर कदाचित रा वन वेगळा झाला असता पण बोल्लीवुडच्या लोकांचा वाचन जरा कमी असल्यामुळे असा चित्रपट तयार झाला. देउळ वर कधी लिहित आहात? वाट पाहत आहे.

हेरंब November 7, 2011 at 8:37 AM  

अगदी अगदी सहमत. चित्रपटातल्या हास्यास्पद गोष्टींची यादी न संपणारी आहे !! प्रामाणिकपणे सांगायचं तर बॉलीवुडमधे सुपरहिरोपट फ्लॉप गेल्याने मला अत्यंत वाईट वाटलं. कारण आपोआपच बाकीचे निर्माते आता सावध पावलं उचलणार :( .. त्याऐवजी हा चित्रपट सुपरहिट गेला असता तर या ज्यॉनरचे (बॉलीवुडचे असणारे आणि त्यामुळे) आपलेसे वाटणारे अनेक नवीन चित्रपट बघायला मिळाले असते. पण... !!

असो. Afterall Ra.one (and SRK and Asnubhav Sinha) deserved it !!!

ganesh November 7, 2011 at 8:43 AM  

thanks vivek and heramb for the comments. vivek, tyani wachun farak padnar nahi, they have a firm belief in what they do and thats the beginning of our problems. heramb , i am scared that they will get the money back and wont be declared a flop. then others will jump on the bandwagon and we will have some really bad superhero films.

aativas November 7, 2011 at 10:31 AM  

लोक कशासाठी सिनेमा पाहतात - या प्रश्नाच्या उत्तरावर बरच काही अवलंबून असत - म्हणजे त्या सिनेमाच यशापयश, त्याची पुढे होत राहणारी कॉपी वगैरे. इतक खोलात जाउन विचार करायला लावणारे (डोक्याला ताप देणारे) चित्रपट पाहणारे लोक किती? त्यामागची कारणही पटण्याजोगी आहेत अर्थातच.

त्यामुळॆ रा-वनच्या अधिक भिकार कॉपीज भविष्यकाळात येणारच नाहीत आणि जनता त्याला उचलून धरणारच नाही - असेही काही नाही!!

Mahendra Kulkarni November 7, 2011 at 4:47 PM  

मी वाचलो.. चित्रपट पाहिला नाही अजून.. :) आणि पहाणार पण नाही.

Vishalkumar November 8, 2011 at 11:05 PM  

नमस्कार ! पण याच ब्लॉग वरचे आधीच्या लेखातील वाक्य वापरुन म्हणतो. we deserve the movies which we get.
याचे उत्तर पण अगदी सरळ दिसतय. या लेखापूर्वीच्या 'राशोमान' वर इतक्या दिवसात एकही कमेंट आपण सर्वातील कोणीच केली. मी पण. रा वन साठी मात्र आवडीने वेळ काढतोय. 'सत्य' या कल्पने बाबत तत्वज्ञाच्या पातळी भाष्य करणारया राशोमान आणि कुरोसावा वर बोलण्यापेक्षा रा वन व शाहरुख , एनी टाईम फेवरेट. आणि रा वन तर सुपरहिट म्हणुन घोषित होणारच , यात शंका नको.
गणेशजी , राशोमान साठी सॉरी.

ganesh November 9, 2011 at 6:24 PM  

Aativas ,that's a real possibility, because ra-one is sure to recover the money and there is enough fan following for krish 2 to do well as well. With these 2 ,others will surely join the race. Mahendra, good for u. Vishal, LOL. Thanks for the concern.to be fair, i had given a link of the article on fb and got a few 'like's ( around 15), some comments there. I think 5 shared them on their wall as well. For some reason ,its easier to comment on fb for most people.

Nils Photography November 16, 2011 at 9:20 PM  

Nice Article...
Well,I am not going to watch this movie, I don't understand the action scenes of Bollywood movies, I literately died by laughing while watching the action scenes of movie 'CASH'(I watched that movie on TV).
Anyway, I have watched the interview of sharukh on one channel, he already said he don't expect much money or he not even want hit, he have made a investment in VFX and all that stuff so he can give this setup to other movies on rent , One more important thing he mentioned, he said , if Bollywood don't bring Hollywood kind of stuff or something new in our movies in coming years new generation wont watch Bollywood movies any more , , its his first step to bring Hollywood stuff in Bollywood...
Thank god, at least one person in Bollywood realized what we are going to expect from Bollywood in future.
I agree with his statement.

Suhrud Javadekar November 18, 2011 at 8:35 PM  

Mr India, Krish and Robot have been India's best superhero films, I think...Ra-One comes nowhere close...

प्रतिक शिंदे November 19, 2011 at 6:25 AM  

"चित्रपटातल्या हास्यास्पद गोष्टींची यादी न संपणारी आहे"
आणखी एक, करवा-चौथ दक्षिण भारतीय लोक साजरा करत नाहीत!

ganesh November 20, 2011 at 6:43 PM  

Thanks Nil, though i find it difficult to believe that SRK is only concerned for the benifit of Bollywood with no personal gain in mind. I just think he is smart,realized that it's not a great film and went on a backfoot. Suhrud, Krish was. Robot was more of an indian version of inspector gadget with very south indian special effects, really loud and artificial. And mr india was a regular masala film with invisibility thrown in. Say mr x in bombay meets bramhachari.

ganesh November 20, 2011 at 6:46 PM  

Pratik, LOL , whats a little confused regional festivity for a film with computer games coming alive and an AI being a better role model for a kid than his biological father !

Suhrud Javadekar November 20, 2011 at 8:19 PM  

I think SRK made a big mistake by giving the directorial responsibilities of Ra-One to a mediocre director like Anubhav Sinha...if Farhan or Rakesh Roshan had directed it, the film would've been far better!

Post a Comment

  © Blogger template Werd by Ourblogtemplates.com 2009

Back to TOP